ॐ नमः शिवाय मंत्र ऐकण्यासाठी इथे टिचकी मारावी
आज श्रावणातला पहिला सोमवार . श्रावणी सोमवार म्हणले की आवर्जून लक्षात रहाते ती हरिपूरची जत्रा. सांगली पासून हाकेच्या ( ३ - ४ किमी दूर ) अंतरावर असणारे , कृष्णा - वारणा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले हे समृद्ध गाव ' हरिपूर ' जरी शहरापासून अगदी जवळ असलेले तरी शहरीपणाचा मागमूस ही कुठे दिसत नाही.
भारताच्या नकाशावर ' हळदी ची पेवे ' असणारे ठिकाण म्हणून ही हे प्रसिध्द आहे. याच हरिपूर मध्ये संगमेश्वराचे एक पुरातन मंदीर आहे. आणि दर श्रावणी सोमवारी इथे मोठी यात्रा भरते. सांगली शहरातील बस स्थानका पासून हरीपुरला जायला रस्ता आहे. कृष्णा नदीला समांतर असणारा हा रस्ता. निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. रस्ताच्या दुतर्फा वड, पिंपळ , चिंचेची मोठी झाडी आहेत.

लहानपणी शेवटच्या श्रावणी सोमवारी शाळेला सुट्टी असायची. मित्रांचा घोळका करून रमत - गमत हरीपुरला जाण्यात जी मजा असायची ती अवर्णनीय. हरिपूर यायच्या आधी ' बागेतला गणपती ' हे ठिकाण आहे. गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेऊन पुढे निघायचे हा रितीरिवाज सांगलीकर अजूनही पाळतात . संगमेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले की मग जत्रेचा आनंद लुटायचा . संगमावर जाऊन नावेत बसायचे. जत्रेतील खेळली विकत घ्यायची यात चक्र, पीटपिते , चष्मा , धनुष्यबाण , टोप्या आणि इतर गोष्टींचा अंतर्भाव असायचा. सरतेशेवटी ' भेळ ' खायची आणि परत निघायचे.
असा हा सोहळा अनुभवायचा असेल तर एखाद्या श्रावण सोमवारी सांगलीला भेट नक्की द्या
' हर हर महादेव '
ah!.. u make me nostalgic!!
ReplyDelete