September 3, 2011

मारुतीस्तोत्र

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादीनाथ पूर्ण तारावयासी !
असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला !

तनू शिवशक्ती असे पूर्ण ज्याचे
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे !
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला !

गिळायासि जातां तया भास्करासी
तिथे राहु तो यउनी त्याजपाशी !
तया चंडकीर्णा मारितां तो पळाला
नमस्कार माझा तया मारुतीला !

खरा ब्रह्मचारी मनातें विचारी
म्हणोनी तया भेटला रावणारी !
दयासागरु भक्तिनें गौरविला
नमस्कार माझा तया मारुतीला !

सुमित्रासुता लागली शक्ती जेव्हां
धरी रूप अक्राळ विक्राळ तेव्हां !
गिरी आणूनी शिघ्र तो उठविला
नमस्कार माझा तया मारुतीला !

जगी भीम तो मारुती ब्रम्हचारी
समस्तांपुढे तापसी निर्विकारी !
नमूं जावयालागिं रे मोक्षपंथा
नमस्कार माझा तया हनुमंता !


1 comment:

  1. कृपया आपली संपर्क माहिती मला पाठवाल का ?
    कवी / प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे.
    पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
    चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१

    Email ID - kharichavata@gmail.com

    ReplyDelete