September 12, 2011

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला !!




काल अनंत चतुर्दशी दिवशी पहिल्यांदाच मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक पहाण्याचा योग आला तो ही मराठी माणसाचे काही टक्का वास्तव्य राहिलेल्या गिरगावातून . आमचे स्नेही श्री. सच्चिदानंद वाकणकर यांच्यामुळे हे शक्य झाले. फडके मंदिरा शेजारी त्यांची सासुरवाडी. त्यांनी तर मुक्कामालाच बोलावले होते. मात्र ते शक्य नसल्याने निदान काही तास तरी जाऊ असे ठरवले आणि संध्याकाळी ४ च्या सुमारास पोचलो. सर्वत्र उत्साह होता. भर पावसात ही बाप्पचा जयघोष सर्वत्र दुमदुमत होता. अनेक राजे महाराजांचे या वेळी दशेन घेण्याचे भाग्य लाभले. गिरगावचा महाराजा, सुतार गल्ली , खेतवाडी गल्ली १ ते १२ , खंबाटा लेन, भुलेश्वरचा गणपती असे अनेक गणपती एकामागून एक येत होते. अनेकांनी आपल्या बाल्कनीच्या जागेत स्वता:ची व्यवस्था करुन घेतली होती आणि पहाटे लालबागचा राजा येऊन गेल्यानंतरच त्यांचा मुक्काम हलणार होता. मिरवणूकीतील सामील भक्तांना गोळ्या, पाणी, प्रसाद देण्यात अनेक जण मग्न होते. काही गणपती मुर्तींची अत्यंत देखणी सजावट केली होती, विश्वकपावर आरुढ गणपती, नागावर आरुढ गणेश, बाल गणेशाचे दर्शन घेतले जात होते. या सगळ्या सजावटीत रामदेव बाबांचे देखावे , अण्णा हजारे आणि बाजूल उध्दव आणि राज साहेब या प्रसंगाचे कटआउट्स लक्षणीय होते.
एकंदरीत ते ३-४ तास एक वेगळाच अनुभव घेतला आणि पुढील वर्षी आणखी जास्त कालावधी थांबायचा विचार करुन ' बाप्पा मोरया'च्या गजरात गिरगाव सोडले.

No comments:

Post a Comment