मध्यंतरी पुण्याहून मुंबईला येताना एस टीची एशीयाड बस ' वनाज ' च्या थांब्याला आरक्षण असुनही न थांबता तशीच गेली होती आणि प्रचंड मनस्ताप झाला होता. एक प्रयत्न म्हणून पैसे परत मिळावेत यासाठी एक इमेल एसटीच्या संकेतस्थळावरील संपर्काच्या पत्त्यावर पाठवला होता. ( त्या इमेल मधे श्री. सुधाकर परिचारक - अध्यक्ष एस्.टी महामंडळ यांनी हा इमेल तुम्हाला लिहिण्यास सांगितले आहे आणि ताबडतोब आपल्या तक्रारिची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे असे ( खोटेच ) लिहिले)
यानंतर सुत्रे हलली. अनेल इमेल्स मुंबई - पुणे डेपोतून एकमेकांना पाठवले गेले. प्रतेक वेळी मला cc करण्यास कुणीही विसरले नाही . एकदा मला तिकिटाची प्रत आणि अर्ज कुर्ला डेपोत नेऊन देण्यास सांगितले , जे मला शक्य नाही असे मी कळवले. मात्र खालील इमेल आल्यानंतर तिकिटाची स्कॅन कॉपी पाठवून दिली आणि शेवटी तिकिटाचे पैसे परत मिळाले. यानिमित्याने कोण ते श्री श्रीकांत साहेब असतील त्यांचे धन्यवाद.
|
Jan 19 (11 days ago)
| |||
|
i received your complaint.
i am investigating the matter.
you will receive money in a week.
so kindly send your e ticket on my email address
thanking you
shrikant gabhane
depot manager
mumbai central
Great!तुम्ही केलेला पाठपुरावाच तुमचे पैसे परत मिळवण्यात कारणीभूत झाला.
ReplyDeleteमंगेश नाबर.