जन्मसंपत् विपत् क्षेमः प्रत्यरः साधको वधः
मैत्रं परममैत्रंच जन्म चेति पुनः पुनः
जन्म नक्षत्रापासून नऊ नक्षत्रांपर्यंत प्रतेक नक्षत्राला विशेष संज्ञा आहेत .
पहिले जन्म - उत्पत्तिकारक
दुसरे संपत् - संपत्तिकारक, धनदायक
तिसरे विपत् - संकटदायक
चवथे क्षेम - शुभकारक
पाचवे प्रत्यर - अत्यंत अशुभ
सहावे साधक - साधकता दर्शक
सातवे वध - मृत्यू अगर वधकारक
आठवे मैत्र - मित्रता दर्शक
नववे परममैत्र - परम मित्रतादर्शक
ह्याप्रमाणे दहावे नक्षत्र परत जन्म , अकरावे संपत् याप्रमाणे मोजावीत
सत्तावीस नक्षत्रांची तीन जन्म , तीन संपत् तीन विपत् याप्रमाणे विभागणी होईल
समजा एखाद्याचा जन्म ' शततारका ' नक्षत्रावर झाला असेल तर याच्यासाठी कोष्टक खालील प्रमाणे असेल
जन्म - शततारका , आद्रा , स्वाती ( राहूची ऩक्षत्रे )
संपत् - पुर्वा.भाद्रपदा , पुनर्वसु , विशाखा ( गुरुची नक्षत्रे )
विपत् - उत्तरा. भाद्र. , पुष्य , अनुराधा ( शनीची नक्षत्रे )
क्षेम - रेवती , आश्लेषा , जेष्ठा ( बुधाची नक्षत्रे )
प्रत्यर - अश्विनी, मघा , मूळ ( केतूची नक्षत्रे )
साधक - भरणी , पुर्वा , पुर्वाषाढा ( शुक्राची नक्षत्रे )
वध - कृतीका , उत्तरा , उत्तराषाढा ( रवीची नक्षत्रे )
मैत्र - रोहीणी , हस्त , श्रवण ( चंद्राची नक्षत्रे )
परममैत्र - धनिष्ठा , मृग , चित्रा ( मंगळाची नक्षत्रे )
गोचरीने शुभ ग्रह वरील नक्षत्रातून जात असताना त्या प्रमाणात फळ मिळते.
विपत, प्रत्यर , वध - या नक्षत्रातऊन सर्व साधारण पणे अशुभ ग्रह गोचरीने भ्रमण करताना वाईट फळ मिळू शकते.
No comments:
Post a Comment