काल गेलो होतो दर्शनाला. रात्री १० वाजता चिंचपोकळीला उतरलो. स्टेशन
गर्दीने ओसंडून गेले होते. मुंबईत खरं म्हणजे रात्री 'अप' च्या दिशेचा
प्रवास म्हणजे आरामाचा पण छ.शि. ट ला जाणा-या गाड्या भरभरुन वहात होत्या. दादर, परळ, करी रोड, चिंच पोकळी, भायखळा या स्थानकांना जत्रेचे स्वरुप आले होते. कालचा गणेशोत्सवाचा तिसराच दिवस. अजुनही अनेकांच्या घरी बाप्पा आहेत, आपापल्या गावातून अनेकजण परतायचे आहेत. तरीही भक्तांची गर्दी जाणवण्या एवढी होती .
ठरल्यावेळी ऑफीसमधील आम्ही सहकारी स्टेशनवर इंडीकेटरखाली जमलो आणि परळ बाजूच्या जिन्याने लालबागकडे निघालो. बाहेर पडताच वाटले सर्वत्र दिवाळी आहे. आजुबाजूच्या जून्या चाळीत ( ज्या काही शिल्लक आहेत त्यात ) सगळीकडे आकाश कंदील लावले होते, इमारती, रस्ते यावरील रोषणाई मन वेधून घेत होती. सर्वत्र उत्साह होता. यानिमित्याने गेल्या दहा वर्षातील मुंबईच्या वास्तव्यात पहल्यांदाच गणेश उत्सवातील रात्रीची मुंबई अनुभवायला मिळणार होती. . पाच एक मिनिटात राजाच्या स्वागत कक्षापाशी पोहोचलो. आपण कोणी व्हिआयपी वगैरे नसल्याने अर्थात सामान्य लोकांना ' राजाचे ' दर्शन घेण्यासाठी असलेली रांग तेथे उभ्या असलेल्या पोलीस मामांनी अगदी तत्परतेने दाखविली .
हीच ती ' मुख दर्शनाची ' रांग . या रांगेत चालायला लागल्यापासून ते प्रत्यक्ष ' लालबागच्या राजाचे दर्शन ' घेऊन तेथील स्वयंसेवकाने धक्का मारुन बाहेरचा रस्ता दाखवण्या पर्यंतचा प्रवास फक्त १५ मिनिटे. हा प्रवास फक्त अनुभवायचा. शब्दात न सांगता येण्यासारखा.
लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन तेथे जवळच असलेल्या मुंबईच्या राजाचे ( गणेश गल्ली ) दर्शन घेतले. पशुपतीनाथ मंदीराची प्रतिकृती आणि नेहमीप्रमाणे अतीभव्य गणेशमुर्ती होती.
यानंतर तेजूकाया मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही करी रोड स्टेशन कडे मार्गस्थ झालो आणि रात्री पर्यंत घरी सुखरुप पोहोचलो. हा सर्व ३-४ तासांचा सोहळा कायमचा स्मरणात राहील असा . बोरकरांनी वर्णन केलेल्या कवितेतील या ओळीसारखी अवस्था सध्या आहे.
माझे सुख मोठे ,सुख मोठे
ठेऊ कळेना कोठे
माझे सुख मोठे !!

No comments:
Post a Comment