वरील शीर्षकाला काहीही अर्थ
नाही . अगदी खरे सांगतो केवळ आपल्या लिखाणाला ब-यापैकी प्रसिध्दी मिळावीम्हणून केलेला एक प्रयत्न किंवा सवंग लोकप्रियता वगैरे वगैरे असे जर वाटत असेल तर तसे नाही. म्हणलं तर खुप मोठा अर्थ यात दडला आहे. सूज्ञास सांगणे न लगे ! . वस्तुस्थिती आहे असेच म्हणावे लागेल. निमित्य आजपासून सुरु होणारे ८६ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन. अध्यक्षीय निवडणूकीपासून ते ग्रंथदिंडी पर्यंतचा वादादित प्रवास पार करून. आज परशुराम भूमीत या संमेलनाचे उदघाटन होत आहे त्यानिमित्याने माझ्यातर्फे चिपळूणवासीयांना हार्दीक शुभेच्छा. |
|
या शुभेच्छा देताना एक साहित्यीक
प्रेमी बरोबरच ' चिपळूण ' शहराबद्दल वाटणारी आपुलकीचा मोठा वाटा आहे. शिक्षण झाल्यानंतर जन्मगाव सांगली सोडून १९९७ साली प्रथम नोकरी साठी ज्या गावी राहिलो ते हे चिपळूण. या परशुरामाच्या भुमीतजगण्याची, धडपड करण्याची नवी उमेद मिळाली. आज साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन जरी राजकीय हस्तक्षेपामुळे ' परशुराम यांचे चित्र / कु-हाड गेलेली असली तरी त्यांचे विचार जनसामान्यांच्या मनातून सहजा सहजी जाणार नाहीत याची नोंद संबंधीतांनी अवश्य घ्यावी | |
असो. यानिमित्याने अनेक राजकीय
मंडळी ( सर्वच पक्षातील ) चिपळूण शहरात येतील . कदाचीत उपस्थिती साहित्यीकांपेक्षा त्यांचीच संख्या जास्त असू शकेल. आज संमेलनस्थळी व्यासपीठ हे साहित्यीकांपेक्षा राजकारणी मंडळीनी भरुन गेलेले असेल . जा कुठल्या वर्षी साहित्य संमेलनात राजकारणी प्रेक्षाकात आणि साहित्यीक व्यासपीठावर असतील तो दिवस मराठी साहित्य संमेलनासाठी सुदीन असेल. |
|
अमावस्येच्या शुभदिनी साहित्य संमेलनाची
सुरवात करुन आयोजकानी पुढारलेल्या महाराष्ट्राचे विषेश उदाहरण संपुर्ण जगासमोर ठेवले आहे .यानिमित्य आयोजकांचे विषेश अभिनंदन . |
|
( दैव भविष्या यावर विश्वास
नसलेले , स्वतःच्या मनगटाच्या ताकतीवर अनेक घटना घडवून आणू शकणारे आहेत, असतात आणि असतील यात काहीही वावगे नाही मात्र तरीही एखादे चांगले काम करायला जाताना अगदी वरील वर्गीकरणातील मंडळीही शक्यतो ' अमावस्येला' कुठले ही कार्य करायला जाणार नाहीत. ) |
|
वरील विशेष साहित्यीक मूल्य नसलेले
लिखाण आपण इथेपर्यंत येऊन वाचल्या बद्दल आपले आभार. शेवटी मनातील काही विचार आठ ओळीत लिहून आपली रजा घेतो. |
|
८६ व्या अ.भा मराठी साहित्य संमेलनास हार्दीक शुभेच्छा | |
हित साध्य करण्यासाठी | |
घेतले जातात मेळावे | |
अशी स्थिती असताना | |
मागे का रहावे ? | |
साहित्य संमेलनात उपस्थिती | |
राजकीय नेत्यांची नवी रीत | |
साहित्यीक मात्र जमू लागले | |
मैदानात भीत भीत | |
अमोल केळकर | |
जाने ११, २०१३ |
No comments:
Post a Comment