August 11, 2016

कन्यागत पर्व

आजपासून  ' कन्यागत पर्वास' सुरुवात होत आहे 
यानिमित्याने घेऊयात  नरसोबावाडीचे दर्शन 

न्य धन्य हो प्रदक्षिणा सद्‍गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी 
मृदंग-टाळ-ढोल-भक्त भावार्थे गाती
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती
कोटी ब्रह्महत्या हरिती करिता दंडवत
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला

No comments:

Post a Comment