July 2, 2025

मनोहर पादुका - नरसोबावाडी

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कृष्णा पंचगंगा संगमावर तपश्चर्येसाठी बारा वर्षे राहिले. त्यानंतर ते गाणगापूरला गेले. जाण्यापूर्वी त्यांनी एका पाषाणावर मनोहर पादुका प्रकटवल्या त्या योगिनींच्या स्वाधीन गेल्या आणि भैरंभट नामक वृद्ध ब्राह्मणास तेथे पूजक म्हणून नेमले. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या उक्ती नुसार प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय पादुकांच्या रूपाने तेथे अखंड वास्तव्य करीत आहेत.
 पादुका 'चंद्रकांत' नावाच्या पाषाणावर प्रकटविलेल्या आहेत. अशा पाषाणावर जेव्हा चंद्रकिरण पडतात तेव्हा त्यापासून अमृताचे क्षरण होत असते. भगवान श्री दत्तात्रेय हे सूर्य चंद्राचेच नव्हेत तर सकळ विश्वाचे अधिपती आहेत. त्यामुळे पादुका धारण करणाऱ्या या पाषाणातून नित्य अमृतबिंदूंचे क्षरण होत असते.

श्रींच्या मनोहर पादुकांवर वीस शुभचिन्हे आहेत. वाडी मध्येच होऊन गेलेले श्रेष्ठ पुजारी 'श्रीगुरुभक्त'; म्हणजेच विठ्ठल अपानभट ढोबळे पुजारी यांनी या शुभ चिन्हांची नावे एका आरतीमध्ये दिलेली आहेत.

उभयपादुकांवरील प्रत्येक अंगुलीवर एक एक चक्र आहे. प्रत्येक चक्राखाली तीन उभ्यासमांतर रेषा आहेत. याशिवाय दोन्ही पावलांवर टाचे पासून अंगुलीपर्यंत वक्ररेषा आहेत. उजव्या पावलावर ध्वज, वज्र, अंकुश, स्वस्तिक, छत्र, जम्बुफळ, यव ,अष्टकोन, पद्म आणि गात्र (चाबूक) अशी चिन्हे आहेत.  डाव्या पावलावर त्रिकोण, गोष्पद अर्धचंद्र, धनु, कमंडलू, मत्स्य, शंख, अमृतपात्र आणि चक्र अशी चिन्हे आहेत. या पादुका संनिध श्रीलक्ष्मीचे अखंड वास्तव्य आहे.

विश्वातील यच्चयावत शुभचिन्हे व अनंतकोटी तीर्थे या चरणांवर अधिष्ठित आहेत. या मनोहर पादुकांच्या रूपाने श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत राहणारे भगवान श्री दत्तात्रेय हे साक्षात परब्रम्ह आहे.
संदर्भ-
पुण्यभूमी_नृसिंहवाडी

साभार : फेसबुक 

June 25, 2025

अभंगवारी - अधिक देखणे तरी


अधीक देखणें तरी निरंजन पाहाणें ।
योगराज विनवणें मना आलें वो माये ॥१॥
देहबळी देउनि साधिलें म्यां साधनीं ।
यानें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥
अनंगपण फ़िटलें मायाछंदा सांठवलें ।
सकळ देखिलें आत्मस्वरुप वो माये ॥३॥
चंदन जे जेविं भरला अश्वत्थ फ़ुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥
पुरे पुरे आतां प्रपंचा पाहाणें ।
निजानंदीं राहणें स्वरुपीं वो माये ॥५॥
ऐसा सागरु ।
रखुमादेविवरु विठ्ठलु निर्धारु ।
म्यां देखिला वो माये ॥६॥

June 23, 2025

अभंगवारी - अवघा रंग एक झाला





अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग।। धृ ।।
मीतूपण गेले वाया।


पाहता पंढरीच्या राया।। 1 ।।

नाही भेदाचे ते काम। पळोनी गेले क्रोध काम।। 2 ।।
देही असोनी विदेही। सदा समाधिस्थ पाही।। 3 ।।
पाहते पाहणे गेले दूरी। म्हणे चोखिया ची महारी।। 4 ।।

June 22, 2025

अभंगवारी- अगा वैकुंठीच्या राया

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥

अभंगवारी- देवा तुझा मी सोनार

देवा तुझा मी सोनार |
तुझे नामाचा व्यवहार || धृ ||

मन बुध्दीची चाकरी |
रामनाम सोने चोरी || १ ||

नरहरि सोनार हरीचा दास |
भजन करी रात्रंदिवस || २ ||

अभंगवारी- माझा भाव तुझे चरणी

माझा भाव तुझे चरणी |
तुझे रूप माझे नयनीं || धृ ||

सापडलो एकामेकां |
जन्मोजन्मी नोहे सुटका || १ ||

त्वां मोडिली माझी माया |
मी तो जडलो तुझिया पायां || २ ||

त्वां मज मोकविले विदेही |
मी तुज घातले हृदयीं || ३ ||

नामा म्हणे गा सुजाना |
सांग कोणे ठकविलें कोणा ? || ४ ||

श्री दत्त करुणा त्रिपदी- संजीव अभ्यंकर

श्री. दत्त करुणा त्रिपदी
आजकाल मन फार हळवं झालय. येणारा प्रत्येक दिवस काही ना काही संकट दाखवित आहे. पहलगाम हल्ला, ऑपेरेशन सिंदूर, युद्धविराम, हगवणे प्रकरण, अहमदाबाद दुर्घटना, केदारनाथ हेलिकॉप्टर क्रॅश, पेरू भूकंप, इंडोनेशिया वोलकॅनिक एरपशन, अतिवृष्टीने होणारी हानी, इस्राएल-इराण युद्ध आणि सर्वात कहर म्हणजे भविष्यवेत्यांच्या भविष्यवाण्या,1941 चे आणि 2025 चे कॅलेंडर सारखेच. नक्कीच ह्या वर्षी युद्ध, नैसर्गिक आपत्ती असे संकट येणार, परत अमूक दिवशी होणाऱ्या ग्रहांच्या युतीमुळे येणारे संकट तारीख-वार वेळेसहित सांगितले जाते. या सर्व प्रकारांनी मनःशांती ढळली जात आहे. येणारा दिवस काय घेऊन येणार ह्या चिंतेने सर्वच पोखरले जात आहेत. 
प्रत्येक प्रश्नाला, समस्येला उत्तर असतेच. फक्त त्याचा शोध,जाणीव आपल्याला व्हायला हवी. मला तर ह्या प्रश्नाचे उत्तर देवकृपेनें प्राप्त झालेले आहे. माझ्या मते ह्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी दत्त भक्तांना फार परिश्रम करण्याची गरज नाही. 'श्री.दत्त करुणा त्रिपदी' आपले मन शांत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ह्यात दत्त महाराजांकडे आपण केलेल्या चुकांची माफी मागितली जाते आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना केली जाते. दत्त महाराजांच्या चरणी ही प्रार्थना केल्याने आपल्या जीवनातील अडचणी, संकटे आणि दु:ख दूर होतात. करुणा त्रिपदी पठण केल्याने मन शांत होते आणि मानसिक ताण कमी होतो, असे मानले जाते. तसेच याच्या पठणाने दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वादाचा लाभ मिळतो. ही करुणा त्रिपदी दत्त संप्रदायात खूप महत्वाची मानली जाते आणि दत्तभक्त नेहमी याचे पठण करतात. ह्या करुणा त्रिपदीची रचना श्री टेंबे स्वामी महाराज यांनी केली आहे. टेंबे स्वामी 'वासुदेवानंद सरस्वती' म्हणूनही ओळखले जाते. ते दत्तात्रेयांचे अवतार म्हणून ही ओळखले जातात.
करुणा त्रिपदी च्या निर्मिती बाबत एक कथा वाचनात आली ती अशी. नरसोबाची वाडी येथे पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, तेथील पुजाऱ्याच्या हातून चुकून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली पडली. झाल्या प्रकरणाने सर्व लोक अपशकुन झाला म्हणून अत्यंत घाबरले व तेथील पुजारी मार्गदर्शनासाठी वासुदेवानंद सरस्वती स्वामी ह्यांना भेटण्यास गेले आणि घडलेली घटना त्यांना सांगितली. पुजाऱ्यां कडून ही घटना ऐकल्यावर स्वामी अत्यंत व्यथित होऊन ध्यानास बसले. ध्यानात त्यांनी दत्त महाराजांना या घटनेबाबत सांगितले, तेंव्हा दत्त महाराजांनी सांगितले, "हे लोक नियमांनुसार वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तिथे राहायचा कंटाळा आला आहे. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी!" ध्यानातून बाहेर आल्यावर स्वामींनी पुजाऱ्यांना खडे बोल सुनावले. नियमाप्रमाणे वागण्यासाठी  नियमावली करून दिली. आणि परत असा अनुचित प्रकार घडला तर ते हस्तक्षेप करणार नाही अशी ताकीदही त्यांना दिली.
झाल्या प्रकाराने स्वामी अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांची मनःशांती ढळली, मनाच्या या करुण अवस्थेत त्यांनी क्षमा याचनेसाठी 3 पद्याची रचना केली तीच करुणा त्रिपदी होय. ती तीन पदे पुढीलप्रमाणे-  
1. शांत हो श्री गुरुदत्ता 
2. श्री गुरुदत्ता जय भगवंता 
3. जय करुणाघन निजजनजीवन.
ह्या तिन्ही पदांमध्ये स्वामींनी दत्तगुरुंची करुणा भाकली व झालेल्या अपराधाची क्षमा मागितली आहे. ही त्रिपदी अत्यंत भावपूर्ण, रसाळ व मंत्रमुग्ध करणारी रचना आहे. मनापासून प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून घेतल्यास त्रिपदी म्हणताना डोळ्यातून अश्रू ओघळतात. यातून श्रीस्वामी महाराज, भगवान श्रीदत्तप्रभू देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून निरंतर सेवा करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हां सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन त्यांनी भगवंतांची प्रार्थना केली.
आजच्या घडीला श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये, दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही करुणात्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच आहे. साक्षात् दत्तावतार श्री. स्वामींचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने, आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, करुणात्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की प्राप्त होतेच. मंत्ररुप प्रसादीक व दत्त भक्तांस प्रत्यक्ष प्रमाण असणार्‍या ह्या श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्र ग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३, अध्याय ९२ ह्यात करुणा त्रिपदीचे महत्व विशद केले आहे.
ह्याचा संक्षिप्त भावार्थ असा आहे:- 
'काही आपत्ति आल्यास जो नित्य एकविस वेळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने, मनात कोणती ही शंका न आणता ह्या त्रिपदीचे पठण करेल त्याच्या आपत्तिचे पुर्ण निरसन होइल. तसेच पुर्ण श्रध्दावंत अंत:करणाने जो ह्या त्रिपदीचे एकवीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दुर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्याधीतून मुक्ती लाभेल. भक्तांसाठी करुणा त्रिपदीचे हे तत्कलिक फळ होय.'
आपण कुठेही असो, प्रवासात, घरी-दारी न चुकता आपल्या पठणात आपण करुणा त्रिपदी ठेवली पाहिजे. आर्तभावनेने त्रिपदी पठण केल्यास दत्त महाराज आपल्या हाकेला नक्कीच धावून येतील आणि आपल्याला मनःशांतीचा लाभ होईल. करुणा त्रिपदी म्हंटल्यानंतर कळपात चुकलेल्या वासराला अचानक त्याची आई दिसाल्यावर जसा आनंद होतो तसाच आनंद आपल्या भरकटलेल्या मनाला योग्य रस्ता सापडल्याचा होतो. दत्त प्रभूंची सेवा म्हणून जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत करूणा त्रिपदीचा प्रचार प्रसार आपण करु आणि तणावमुक्त, शांत जीवन जगण्याचा मार्ग आपण मनापासून अंगीकारू.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
             -©सौ. प्रांजली नवीन कुलकर्णी.

June 18, 2025

अवघा तो शकुन ! हृदयी देवाचे चिंतन



आज संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ होत आहे. संत गजानन महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ यांच्या पालख्या मार्गस्थ आधीच झाल्यात. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही एक दोन दिवसात निघेल. असंख्य वारकरी   'तन-मन- धनाने' या सोहळ्यात वेगवेगळ्या प्रकारे सामील होतील. गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी निर्माण झालेली  ' Nigativity',विचित्र मानसिक अवस्था, भिती, ग्रह योग, या सगळ्या परिस्थितीला सामोरे जायची शक्ती मिळणार आहे ती भक्ती मार्गातूनच
म्हणूनच
 तुका म्हणे हरिच्या दासां
शुभकाळ अवघ्या दिशा !

हा आलेला विचार मनाला उभारी देतो. भले शरीराने आपण देहू, आळंदी ते पंढरपूर नसू ही जात

तुका म्हणे सोपी केली पायवाट !
उतरावया भवसागर रे !

सोशल मिडीया, न्यूज चँनेल्स, वृत्तपत्रे यातून हा अनुपम्य सोहळा आपण अनुभवणार आहोत

काय या संतांचे मानू उपकार !
मज निरंतर जागविती !!

पांडुरंग ध्यानी,पांडुरंग मनी !
जागृतीं स्वप्नीं पांडुरंग !!
मनाची एवढी एकरूपता २४x ७ सर्वांना जमेलच असं नाही पण वृत्ती तशी ठेवण्याचा प्रयत्न करावयाचा

तुका म्हणे  जैसें दास केले देवा
तैसें हे अनुभवा आणि मज !!

आषाढी एकादशीपर्यंतचे अनेक खेळ या वाळवंटी रचत, या सोहळ्याची सांगता चंद्रभागेच्या तिरी , पंढरपूर या भक्तांच्या माहेरी होईल
पण कायमस्वरूपी, 

तुका म्हणे जीवा !
नको सोडू या केशवा !!

*हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा*🙏

#देवा_तुझ्या_द्वारी_आलो 📝
१८/०६/२५


श्री शनीवज्रपंजर कवच

शनिवार/ पुष्य नक्षत्र/ ३१.०५.२०२५




शनि जयंती

शनी जयंती/ सोमवती अमावस्या 


May 25, 2025

श्रीमत् भगवत् गीता १.१

( साभार ISCON खारघर whatsapp समुह )



May 16, 2025

दिनविशेष :- संकष्टी चतुर्थी

शुक्रवार / १६ मे २०२५/ मुळ नक्षत्र/ संकष्टी चतुर्थी

हिमकुंद मृणालाभं दैत्यानां  परमं गुरुम् !
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्!







May 12, 2025

तीर्थराज मणिकर्ण

मनाली जवळचे  अतीशय सुंदर तीर्थक्षेत्र. भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते. पार्वती नदीचा उगम आहे. 
गरम पाण्याची कुंडं ( कडकडीत गरम पाणी)  आहेत आणि यासंबंधी सुंदर आख्यायिका आहे.

! ! ॐ नम: शिवाय ! !








February 24, 2025

अन्योन्य योग




ज्योतिष शास्त्रात हा एक विशेष योग आहे. अनेक पत्रिकेत तो बघायला मिळतो. साधारण पणे या योगाचे शुभ फळ सांगितले आहे
हा योग कसा होतो? तर
एक ग्रह, दुस-या ग्रहाच्या राशीत असताना जर तो दुसरा ग्रह पहिल्या ग्रहाच्या राशीत असेल तर हा योग होतो.
 अगदी सध्याचे उदाहरण बघा

शुक्र - मीन राशीत ( गुरु ग्रहाच्या राशीत)
गुरु ग्रह - वृषभ राशीत ( शुक्र ग्रहाच्या राशीत)
तेंव्हा सध्या जन्माला आलेल्या बालकांच्या पत्रिकेत गुरू-शुक्र 'अन्योन्य योग' झाला आहे

हाच योग मला आजच्या विजया एकादशी आणि परवाच्या माहाशिवरात्रीत दिसून येतोय

सोमवार- महादेवांचा दिवस- एकादशी
बुधवार - श्रीविष्णूंचा दिवस - महाशिवरात्री

अन्योन्य महोत्सव

श्री महादेव व श्री विष्णू यांची अखंड कृपा आपणा सर्वांवर राहो 🙏🙏

( गंमत म्हणजे गुरू-शुक्र एकमेकांचे शत्रू तर शंकर आणि विष्णू यांचे भक्त ही एकमेकांना शत्रू मानत असंत)

ॐ नम: शिवाय ! गोविंदाय नमो नम!

#देवा तुझ्या द्वारी आलो 📝
#विजया एकादशी 🙏
#महाशिवरात्री 🙏
#अन्योन्य योग 🙏 

February 22, 2025

श्री दासनवमी

.जय जय रघुवीर समर्थ !

 

January 20, 2025

देवा तुझ्या द्वारी आलो ४

.पंढरपूर
प्रज्ञापूर  ( अक्कलकोट)



January 19, 2025

January 18, 2025

देवा तुझ्या द्वारी आलो

.मारुती मंदिर सांगली
औदुंबर श्रीदत्तगुरु
विठोबा मंदिर, माधवनगर


 

January 17, 2025

देवा तुझ्या द्वारी आलो १

बागेतील गणपती, सांगली
संस्थानचा गणपती, सांगली
कैवल्यधाम, सांगली


January 11, 2025

Emperor कार्ड

हिंदू देव देवता आणि टॅरो कार्ड यांच्यातील साम्य दर्शवणारे दुसरे कार्ड

January 5, 2025

Strength टॅरो कार्ड

.७८ टॅरो कार्ड्स मधे अशी काही कार्ड आहेत जी मला आपल्या हिंदू देव- देवतां प्रमाणेच   Application, Affirmative wise सारखी वाटतात. म्हणजे ज्या उद्देशाने आपण त्या देवतेची उपासना करतो , अगदी तोच उद्देश हे कार्ड दाखवते.

उदाहरणादाखल दिलेले हे चित्र पहा.मेजर अर्केना मधील ८ वे कार्ड 'स्ट्रेन्थ ' आणि आपली देवी.
अगदी नंबर, अर्थ, चित्र उद्देश सगळं सारखं



( टॅरो कार्ड अभ्यासक)  अमोल
०५/०१/२५ 

January 2, 2025

पू. षाढा नक्षत्र

रवी- पू.षाढा नक्षत्र ( २९ डिसेंबर ते ११ जाने)