१ जानेवारी, २००९

नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!

काळ आणि वेळ हे कुणासाठी थांबत नाहीत। या सृष्टीची गती अव्याहत पणे सुरु आहे। परत एकदा आपण सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताला सज्ज झालो आहोत .
या वर्षात अनेक बरे वाईट अनुभवांची शिदोरी घेऊन आपण नवीन वर्षात एका नव्या जोमाने पदार्पण करणार आहोत.

हे वर्ष संपता संपता जागतिक मंदी, बेकारी, दह्शदवाद च्या रुपाने नवीन आव्हाने आपल्या समोर उभी राहिली आहेत. लोकसंख्या , जातीयवाद, प्रादेशिक वाद यांचा ही समर्थपणे मुकाबला करावयाचा आहे.

कवी मंगेश पाडगावकर यांच्या या ओळी या प्रसंगी आठवतात-

घावावचुन नसे देवपण
जळल्यावाचुन प्रकाश कोठुन?
अंधार दाटला घोर जरी

हा दीप तमावर मात करी !!





परिस्थिती कधीच कयम रहात नाही. सुखा नंतर दु:ख, दु:खानंतर सुख मिळत असते. व्हील ऑफ फॉर्चून हे कार्ड याचेच प्रतिक आहे. हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा नशीब, परिस्थिती तुम्हाला अनुकुल असेल असे दर्शवते.
येणारे नवीन वर्ष आपणास असेच प्रगती करणारे ठरो। सध्याची निराशवादी परिस्थिती बदलून तुमच्या आयुष्यात एका नवीन आशावादी जिवनाची सुरवात होवो।


आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!

४ टिप्पण्या:

  1. निनावी१:५९ PM

    आपण ह्या ब्लॉगचे चा>गले डिझाईन केले आहे.

    टॅरो कार्ड हा एक वेगळा प्रकार वाटतो आहे. या बद्दल मला आधी काही माहिती नव्हती.

    धन्यवाद

    वैभव

    उत्तर द्याहटवा
  2. निनावी२:०३ PM

    प्रत्येक जण आपले भविष्य घडवू शकतो. त्यामुळे भविष्य सांगणे या संकल्पनेवर विश्वास नाही

    तरी आपल्या ब्लॉगची रचना आवडली

    प्रथमेश

    उत्तर द्याहटवा
  3. वैभव प्रथमेश, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि आपल्याला ब्लॉग आवडला त्याबद्दल धन्यवाद

    प्रथमेश, आपण म्हणता त्याप्रमाणे प्रत्येकजण आपले भविष्य घडवत असतो. हे मान्य. टॅरो कार्ड फक्त या मार्गात जर काही अडथळे येत असल्यास ते दाखवतात व ते टाळून आपण वाटचाल करु शकतो. एक मार्गदशेक म्हणून आपण या पध्दतीचा चांगला उपयोग करु शकतो.

    उत्तर द्याहटवा
  4. वैभव प्रथमेश, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि आपल्याला ब्लॉग आवडला त्याबद्दल धन्यवाद

    प्रथमेश, आपण म्हणता त्याप्रमाणे प्रत्येकजण आपले भविष्य घडवत असतो. हे मान्य. टॅरो कार्ड फक्त या मार्गात जर काही अडथळे येत असल्यास ते दाखवतात व ते टाळून आपण वाटचाल करु शकतो. एक मार्गदशेक म्हणून आपण या पध्दतीचा चांगला उपयोग करु शकतो.

    उत्तर द्याहटवा