या टॅरो कार्डाचा अर्थ आहे कौटूंबीक आनंदाचे वातावरण, उत्साह असा आहे.
यासंबंधी वपुर्झातील हा उतारा वाचण्यासारखा आहे.
जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म.
आयुष्य एक सतारीसारखं वाद्य आहे.
ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करुन घेणं, हाच धर्म.
तो धर्म समजला तर छोट्या बीजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो.
त्यावर पक्षी येऊन बसतात. गातात. त्यांचे संसार बहरतात.पैशाशिवाय. पक्ष्यांचं धन वेगळंच असतं.
गाणं हेच त्यांचं आयुष्यभरचं कार्य.
पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात.
स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा,
एक तरी पक्ष्याची हाऊसिंग सोसायटी आहे का ?
तसं असतं तर झाडाझाडांवर राजीव, संजय, इंदिरा नावाच्या
अनधिकृत कॉलनीज दिसल्या असत्या.
बघा, असं होतं. 'पक्ष्यांचा' हा शब्द वापरल्याबरोबर मी भरकटले.'पाखरु' म्हणायला हवं होतं
पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी,
पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की
घर आपण होऊन काटक्या टाकतं.
म्हणून झाडंही नोटिसा पाठवत नाहीत.
मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षा करुन
आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं
सृष्टीतलं हे नातं ओळखता आलं, की सतार
योग्य हातात पडली, असं समजावं. हाच धर्म.
- व.पु. काळे
माझ्या ब्लॉग चे अनुयायी झाल्याबद्दल धन्यवाद. मी ही सिटी हायस्कूल ची च आहे..1998 ची बॅच.तुमची कोणती बॅच आहे?
ReplyDelete१९९०- १९९१ ( १० वी पास )
ReplyDeleteमाझा इ मेल आहे
amolkelkar@rediffmail.com