July 7, 2009

गुरुविण कोण दाखविल वाट

आज गुरुपोर्णीमा. आयुष्याच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत ज्यांनी इथंपर्यंत येण्याचे बळ दिले त्या सर्वांबद्दल याप्रसंगी आदर व्यकत करतो.

गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट

अजाणता मी पथिक एकटा
झांजड पडली, लपल्या वाटा
अवतीभवती किर्रर्र दाटले काटेबन घनदाट
दिशा न कळती या अंधारी
नसे आसरा, नसे शिदोरी
कंठ दाटला आले भरुनी, लोचन काठोकाठ
क्षणभंगुर हे जीवन नश्वर
नेतिल लुटुनी श्वापद तस्कर
ये श्रीदत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट