February 23, 2010

आजचे कार्ड - ७ ऑफ पेन्टॅकल

पेन्टॅकल सूट हा पृथ्वी तत्त्वाचा आहे. ७ ऑफ पेन्टॅकल हे कार्ड आपल्याला सध्याच्या परिस्थितीचा परत अंदाज घ्यावा असे सुचवते. काही वेळा एकादी गोष्ट घडवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेले असतात . मात्र त्याचे रिझल्ट्स , फळे अजूनही मिळाली नसतात. अशावेळी जेंव्हा हे कार्ड रिडिंग मधे येते त्यावेळेला संयम राखा योग्य वेळ आल्यावर काम घडेल . ती घटना घडण्याची अजून वेळ आलेली नाही असे सुचवते .थोडक्यात 'इंतजार का फल मिठा होता है ' असेच काही से.
चित्रात दाखवलेला शेतकर्‍याने पिक येण्यासाठी आवश्यक ते सर्व काम केले आहे. आता फक्त वाट बघणे एवढेच त्याच्या हातात आहे आणि तो तेच करत आहे.
काही वेळा अशा वेळी फारच निराश वाटते. प्राप्तपरिस्थितीत सारासार विचार करुन दुसर्‍या मार्गाचा अवलंब करणे शक्य आहे का ? हे बघावे असे ही हे कार्ड सुचवते.नेहमीच्या जीवन पध्दतीत आपणाला आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. हे कार्ड रिडिंग मधे आल्यास आपण थोडा आपणासाठी वेळ काढावा. चालू रुटीनमधे काही बदल करता येईल का हे पहावे. नोकरीत बदल, नवीन व्यवसाय, बदली, नवीन गाव या सारखे चाकोरीबाहेरचे निर्णय घेता येतील का ? असा विचार करायला लावणारे हे कार्ड आहे.

1 comment:

  1. Please read my blog and let me know what you think!

    http://bestvacationdestinations.blogspot.com/

    ReplyDelete