July 8, 2010

' ऑक्टोपसच्या अंतरंगात'

सध्या मी माझ्या ब्लॉगचे नाव 'भविष्याच्या अंतरंगात ' बदलण्याचा विचार करत आहे. ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' किंवा असेच काहीसे . आपणास आणखी काही सुचत असल्यास कृपया कळवावे।


सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे। स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत. यात पॉल ज्या टॅक मधे अस्तो तेथे त्याच्या खाद्याचे दोन बॉक्स सोडण्यात येतात . एका बॉक्सवर जर्मनीचा झेंडा तर दुसर्‍या बॉक्स वर जर्मनी विरुध्द संघाचा झेंडा लावण्यात येतो. ऑक्टपस ज्या बॉक्स मधला खाऊ खाईल तो संघ सामना जिंकेल असे अनुमान काढण्यात आले. आणि त्याचप्रमाणे घडले।




चला आता ऑक्टोपस बाजारात कुठे मिळतो ते पाहतो. माझ्या ब्लॅगचे नाव ' भविष्याच्या अंतरंगात ' बदलून ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' ठेवतो. ऑक्टोपसचा एक नवा वॉलपेपर घरातील भिंतीवर लावुन ठेवावा लागेल आता. तसेच जहिरातीची ' ऑक्टोपस कन्सल्टन्सी ' या नवीन नावने ५०० पत्रक छापतो. भविष्य पाहून घेणार्‍या पहिल्या १० जणांना ऑक्टोपसची छोटी मुर्ती किंवा गळ्यातला ताईत सप्रेम भेट मिळेल. ऑफर वल्ड कप संपेपर्यंत मर्यादित.