May 23, 2011

श्री व्यंकटेशस्तवन !!!!

व्यंकटेश हे नाम चांगले ! म्हणुनि आवडी चित्त रंगले !
ध्यान मानसीं लागली स्तुती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! १ !!

व्यंकटेश हे स्वामी राजसा ! पावसी मला हाचि भरंवसा !
क्षणाक्षणा तुझी मांडली स्तुती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! २ !!

व्यंकटेश हे कुळदैवता ! तूंचि माउली सद्गुरु पिता !
इष्ट मित्र तूं धनाढ्य संपत्ती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ३ !!

व्यंकटेश रे तूजवेगळें ! दीन शीणतो दाविं पाउलें !
विश्वचालका भाकितों किती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ४ !!

कमलजापती कमललोचना ! नाभिकमलही भक्तदर्शना !
भक्तवत्सल ब्रीद साधती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ५ !!

दुष्ट दुर्मती दैत्य मारिले ! अपार संकटी भक्त तारिले !
आजि कां तरी सांडली रिती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ६ !!

ह्रुदय फूटला कंठ दाटला ! म्हणुनि लोचनीं पूर लोटला !
अजुनि अंत गा पाहशी किती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ७ !!

साधना तरी काय मी करूं ! भक्ति कोणती सांग आचरूं !
तीर्थही बहू हिंडलों क्षितीं ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ८ !!

लक्ष्मीपती छंद लागला ! स्वामी संकटीं शीघ्र पावला !
भेट दीधली कृष्णजीपती ! पाव सत्त्वरे लक्ष्मीपती !! ९ !!

श्री व्यंकटेशा किती चाळवीसी ! तुझी पादपद्में कधिं दाखवीसी !
तुझ्या भेटिची आस मोठी जिवाला ! कधी भेटसी व्यंकटेशा दयाळा !! १० !!

मुरारी जगन्नाथ नारायणा हो ! कृपासागरा अच्युता माधवा हो !
मधूसूदना श्रीधरा भाग्यवंता ! नमस्कार हा व्यंकटेशा समर्था !! ११ !!
* * * * * * * * * ** * * * * ****** * * * * * * ** * * * * ** * * * *
व्यंकटाद्रिसमं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचन !
व्यंकटेशसमो देवो न भूतो न भविष्यति !!

No comments:

Post a Comment