| |||||||||||
| |||||||||||
July 31, 2011
पत्रिका बनवून पाहिजे असल्यास
July 28, 2011
सर्वरोगशमनार्थ स्तोत्रम् !
भूतप्रेतपिशाच्चाद्या यस्य स्मरणमात्रतः ! दूरादेव पलायंते दत्तात्रेयं नमामि तम् ! १ !
यन्नामस्मरण दैन्यं पापं तापश्च नश्यति ! भितिग्रहार्तिदु :स्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम् ! २ ! दद्रुकस्फोटककुष्ठादि महामारी विशुचिका ! नश्यंत्यंन्येsपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम् ! ३ !
संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदा: ! शाम्यंति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तम् ! ४ ! सर्पवृश्चिकदष्टानां विशार्तानां शरीरिणाम् ! यन्नाम शांतिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामि तम् ! ५ ! त्रिविधोत्पातशमनं विधिधरारिष्टनाशनम् ! यन्नाम क्रूरमिनिघ्नं दत्तात्रेयं नमामि तम् ! ६ ! वैर्यादिकृतमंत्रादिप्रयोगा यस्य किर्तनात् ! नश्यंति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तम् ! ७ ! यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ! य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तम् ! ८ !
जयलाभयशः कामदातुर्दत्तस्य यः स्तवं ! भोगमोक्षप्रदस्येमं पठेत् दत्तप्रियो भवेत् ! ९ !
श्री गुरुदेव दत्त : !!
July 25, 2011
वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
चिरंजीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुने !
रुपवान्वित्तवांश्चैव श्रिया युक्तश्च सर्वदा ! १ !
मार्कण्डेय नमस्तेस्तु सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं प्रसीद भगवन्मुने ! २ !
चिरंजीवी यथा त्वं तु मुनिनां प्रवरो द्विज !
कुरुष्व मुनीशार्दुल तथा मां चिरजीविनम ! ३ !
मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं अस्माकं वरदो भव ! ४ !
जय देवि जगन्मातर्जगदानन्दकारिणि !
प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठीदेवते !५!
त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च !
ब्रह्माविष्णुशिवै:सार्थं रक्षां कुर्वन्तु तानि मे ! ६ !
प्रार्थनेचा अर्थ : हे मुनिश्रेष्ठा , तू ज्याप्रमाणे दीर्घायुषी रुपधनबुध्दीने युक्त आहेस तसा मी सुध्दा होवो. हे आदरणीय मुनिश्वरा, दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी माझ्यावर प्रसन्न हो. सात कल्पांपर्यंत जीवन असणार्या महाभाग्यवान मार्कंण्डेय ऋषीश्वरा, आयुष्य, आरोग्य आणि यशासाठी आम्हाला वर देणारा हो. विश्वाची माता असणार्या, विश्वाला आनंदित करणा-या , माझे कल्याण करणा-या हे षष्ठीदेवी तुला नमस्कार असो. तू माझ्यावर प्रसन्न हो. त्रैलोक्यात ब्रह्माविष्णूमहेशासह स्थावर सचेतन आणि जे जे सजीव प्राणी आहेत ते माझे रक्षण करोत.
July 23, 2011
श्री सरस्वती - द्वादश - नामावली
श्री सरस्वती - द्वादश - नामावली
विद्या अभ्यासांत यश मिळण्यासाठी तसेच केलेला अभ्यास लक्षांत रहाण्यासाठी , परीक्षेत चांगले यश मिळण्यासाठी खाली दिलेला पाठ फलदायी आहे
प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती !
तृतीयं शारदा देवी , चतुर्थं हंसवाहिनी !
पंचमं जगती ख्याता, षष्ठं वाग्वीश्वरी तथा !
सप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी !
नवमं बुधमाना च दशमं वरदायिनी !
एकादशं चन्दकांन्तिं द्वादशं भुवनेश्वरी !
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः !
जिव्हाग्रे वसते नित्यं ब्रह्मरुपा सरस्वती !
सरस्वती महाभागे , विद्ये कमललोचने !
विश्वरूपे विशालाक्षि, विद्यां देहि नमोस्तु ते !
July 18, 2011
संकष्टी चतुर्थी - १८ जुलै २०११
आज संकष्टी चतुर्थी , चंद्रोदय तात्री ९. वा २१ मिनीटे. दर्शन घेऊयात इंदोरच्या बडागणपतीचे
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
ॐ गं गणपतये नम :
July 16, 2011
स्वप्नपूर्ती वधू-वर केंद्र
सांगलीतील आमचे स्नेही श्री गिरिश देशपांडे गेली अनेक वर्षे 'स्वप्नपूर्ती ' नावाचे वधू-वर केंद्र चालवत आहेत. त्यांच्याकडे अनेक उत्तम स्थळे आहेत. अनेक वाचकांच्या माहिती साठी मुद्दाम इथे लिहिले आहे. जे इच्छूक आहेत त्यांनी अवश्य त्यांच्याशी संपर्क करावा.
श्री गिरीश देशपांडे
स्वप्नपूर्ती वधू-वर केंद्र
सांगली
इमेल : kgkdeshpande@gmail.com
संकेतस्थळ: http://www.swapnapurtilagna.com/
फोन नंबर : ९६३७०६६१९१
July 15, 2011
गुरुविण कोण दाखविल वाट ---
आज गुरुपोर्णिमा - आतापर्यंतच्या आयुष्यात जे काही इथपर्यंत पोचलो आहे ते आयुष्यात वेगवेगळ्या वेळी भेटलेल्या 'गुरुंच्या ' मार्गदर्शनामुळेच. या सर्वांचे मी आभार मानतो. आपले आई - वडील, शाळेतील शिक्षक, याच बरोबर निसर्ग / नियती हाही मोठा गुरु म्हणून माझ्या आयुष्यात आला आहे. अनेक गोष्टी शिकायला मिळत राहतील
आज गुरु पोर्णीमेनिमित्य या सर्वांना वंदन !!!
आज गुरु पोर्णीमेनिमित्य या सर्वांना वंदन !!!
July 14, 2011
देवा वाचलो तुझ्या कृपेने --
' देवा वाचलो तुझ्या कृपेने ' काही शेकडा अभागी मुंबईकर सोडून लाखो मुंबईकरांचा मनात येणारे हे विचार. प्रतेक वेळेला ती १००-२०० माणसे बदलणार बाकी सर्व परिस्थीती आहे ती. काल दादर, झवेरी बाजार, ओपेरा हाउस . ऊद्या काय ??????? हा प्रश्न मनात घेऊनच तमाम मुंबईकर सकाळी ऑफीसला निघणार. मनात हाच विचार अरे कबुतरखान्याच्या त्या बस स्टॉप वर आतापर्यंत हजारो वेळा आपण गेलो आलो आहोत. काल आपण नव्हतो ही देवाची कृपा. परमेश्वरा सांभाळ रे असेच.
आजच्या धो धो पडणा-या पावसाने सगळे पुरावे नष्ट होतील मात्र तमाम मुंबईकरांच्या मनातील भीती अधिकच गडद होईल. आता अतिरेक्यांचे वाढदिवस, शुक्रवार, १३ तारिख या सर्वांचे मिडिया पुरेपुर विश्लेष्ण करुन विट आणेल. प्रश्ण तसेच राहतील, उद्या काय या प्रश्णाचे उत्तर अनुत्तरितच राहिल. चौकशी समिती, रिपोर्ट, मुख्यमंत्र्याचे जनतेल आव्हान, हे अगदी नेहमी प्रमाणे जसे अगदी मागल्या वर्षीचा पेपर आहे तसा परत.
ज्या क्षणी सरकार ताब्यात असलेल्या अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकत नाही तोपर्यंत वचक रहाणार नाही. आणि ज्या वेळेला हे घडेल त्यावेळेला तमाम मुंबईकर हा सोहळा शिवजयंती तसेच गणपती उत्सव सारखाच साजरा करेल.
खालचे वाक्य अजून कितीदा लिहावे लागणार देव जाणे !
या स्फोटात मृत झालेल्या व्यक्तिंच्या आत्म्याला शांती लाभो. माझी विनम्र आदरांजली !!
आजच्या धो धो पडणा-या पावसाने सगळे पुरावे नष्ट होतील मात्र तमाम मुंबईकरांच्या मनातील भीती अधिकच गडद होईल. आता अतिरेक्यांचे वाढदिवस, शुक्रवार, १३ तारिख या सर्वांचे मिडिया पुरेपुर विश्लेष्ण करुन विट आणेल. प्रश्ण तसेच राहतील, उद्या काय या प्रश्णाचे उत्तर अनुत्तरितच राहिल. चौकशी समिती, रिपोर्ट, मुख्यमंत्र्याचे जनतेल आव्हान, हे अगदी नेहमी प्रमाणे जसे अगदी मागल्या वर्षीचा पेपर आहे तसा परत.
ज्या क्षणी सरकार ताब्यात असलेल्या अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकत नाही तोपर्यंत वचक रहाणार नाही. आणि ज्या वेळेला हे घडेल त्यावेळेला तमाम मुंबईकर हा सोहळा शिवजयंती तसेच गणपती उत्सव सारखाच साजरा करेल.
खालचे वाक्य अजून कितीदा लिहावे लागणार देव जाणे !
या स्फोटात मृत झालेल्या व्यक्तिंच्या आत्म्याला शांती लाभो. माझी विनम्र आदरांजली !!