September 27, 2011
September 22, 2011
September 16, 2011
September 12, 2011
गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला !!
काल अनंत चतुर्दशी दिवशी पहिल्यांदाच मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक पहाण्याचा योग आला तो ही मराठी माणसाचे काही टक्का वास्तव्य राहिलेल्या गिरगावातून . आमचे स्नेही श्री. सच्चिदानंद वाकणकर यांच्यामुळे हे शक्य झाले. फडके मंदिरा शेजारी त्यांची सासुरवाडी. त्यांनी तर मुक्कामालाच बोलावले होते. मात्र ते शक्य नसल्याने निदान काही तास तरी जाऊ असे ठरवले आणि संध्याकाळी ४ च्या सुमारास पोचलो. सर्वत्र उत्साह होता. भर पावसात ही बाप्पचा जयघोष सर्वत्र दुमदुमत होता. अनेक राजे महाराजांचे या वेळी दशेन घेण्याचे भाग्य लाभले. गिरगावचा महाराजा, सुतार गल्ली , खेतवाडी गल्ली १ ते १२ , खंबाटा लेन, भुलेश्वरचा गणपती असे अनेक गणपती एकामागून एक येत होते. अनेकांनी आपल्या बाल्कनीच्या जागेत स्वता:ची व्यवस्था करुन घेतली होती आणि पहाटे लालबागचा राजा येऊन गेल्यानंतरच त्यांचा मुक्काम हलणार होता. मिरवणूकीतील सामील भक्तांना गोळ्या, पाणी, प्रसाद देण्यात अनेक जण मग्न होते. काही गणपती मुर्तींची अत्यंत देखणी सजावट केली होती, विश्वकपावर आरुढ गणपती, नागावर आरुढ गणेश, बाल गणेशाचे दर्शन घेतले जात होते. या सगळ्या सजावटीत रामदेव बाबांचे देखावे , अण्णा हजारे आणि बाजूल उध्दव आणि राज साहेब या प्रसंगाचे कटआउट्स लक्षणीय होते.
एकंदरीत ते ३-४ तास एक वेगळाच अनुभव घेतला आणि पुढील वर्षी आणखी जास्त कालावधी थांबायचा विचार करुन ' बाप्पा मोरया'च्या गजरात गिरगाव सोडले.
September 6, 2011
रूप गणेशाचे - २१ अंकाचे महात्म !!
आमचे स्नेही श्री शरद फाटक यांनी एक अतीशय चांगला इमेल पाठवला, तो जसा आहे तसा या ब्लॉगच्या वाचकांसाठी देत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या भारतीय संस्कृतीत गणपतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपती हे अति
प्राचीन दैवत आहे, वैदिक देव आहे, आदिदेव आहे. कोणत्याही शुभकार्यारंभी अग्रपूजेचा प्रथम मान गणपतीलाच मिळाला आहे. श्रीगणेश हा सुख देणारा, दु:ख हरण करणारा, दुष्टांना शासन करणारा आणि भक्तांना आनंद देणारा, कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान असलेला देव आहे. दरवषीर् कोट्यवधी लोक अष्टविनायकांचं, साडेतीन पिठांचं आणि पुराणोक्त गणेशाचं मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. त्या
गणरायांच्या २१ नाव, रूप, त्याला आवडणारी फुलं, फळं, नैवेद्य आदींविषयी..............
*महाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ गणपती*
१. मयुरेश्वर-मोरगाव, पुणे,
२. सिद्धिविनायक-सिद्धटेक, अहमदनगर,
३.बल्लाळेश्वर-पाली, रायगड,
४. वरद विनायक-महाड, रायगड,
५. चिंतामणी-थेऊर, पुणे,
६. गिरिजात्मक-लेण्यादी, पुणे,
७. विघ्नेश्वर-ओझर, पुणे
८. श्रीमहागणपती-रांजणगाव, पुणे,
९. मंगलमूतीर्-चिंचवड, पुणे,
१०. कसबा गणपती-पुणे,
११. सिद्धिविनायक-सारसबाग, पुणे,
१२. गणेश-कढाव, रायगड,
१३. टिटवाळा-महागणती-ठाणे,
१४. पुळ्याचा गणपती-रत्नागिरी,
१५. हेदवीचा दशभुज-रत्नागिरी,
१६.वक्रतुंड-आवास, रायगड,
१७. मोदकेश्वर-नाशिक,
१८. मुद्गल गणेश-परभणी.
१९.चिंतामणी-कळंब, यवतमाळ,
२०. श्रीसिद्धिविनायक-प्रभादेवी,
२१. श्रीसिद्धिविनायक-सीताबडीर्, नागपूर.
*देशातील प्रसिद्ध २१ गणपती*
ॐकार गणेश-प्रयाग, महोत्कट-काश्मीर, विघ्नराज-आंध्र प्रदेश, श्वेता गणेश-केरळ,
गणेशजी-बंगाल, मंगलमुर्ती-मध्य प्रदेश,ढुंढीराज-काशी, बदरी गणेश-हिमालय,
गणेशबर्फ लिंग-हिमालय, नरक विमोचन गणेश-आसाम, ब्रह्मागणेश-बिहार,
सीतामढीचा गणेश-बिहार, षड्भूज गणेश-पंजाब, बली गणपती-राजस्थान,
दुर्गकूट गणेश-गुजराथ,पंचमुखी गणेश-मध्य प्रदेश, खांडोळ्याचा गणेश-गोवरा,
गोकर्णाचा गणेश-कर्नाटक,भदाचलम गणेश- आंध्र, कावेरीकांत विनायक- मदास,
कल्पगणपती- ओरिसा.
*जगातील प्रसिद्ध २१ गणपती*
पंचगणपती, नृत्यगणपती, सोळा हातांचा गणपती आणि हेरंब गणेश-नेपाळ,
गणेश-कंबोडिया, द्वारपाल गणेश-तिबेट, महापियेन गणेश-ब्रह्मादेश,
गुढविद्या गणेश-चीन, मंगलमुर्ती-मेक्सिको, गणेश-तुर्कस्तान, गणेश- सिलोन,
गणपती-बानिर्ओ,गणेश-अफगाणिस्तान, गणपती-बाली बेट,
बोरीचा गणपती-इण्डोनेशिया, गणेश-जावा,
लेखक गणेश-सयाम,
गुरू गणेश-कंबोडिया, गणपती-रोम, इटली,
श्री गणेश-जपान,
योद्धा गणेश-इराण.
*गणपतीला आवडणाऱ्या २१ वस्तू*
१) मोदक, २) नारळ, ३) चंदकोर, ४) ओम् ५) खेटव, ६) स्वस्तिक, ७) एकदंत, ८) विडासुपारी,
९) दूर्वा, १०) नागबंद, ११) मुद्गर, १२) शूल, ३) खट्वाग, १४) परशु, १५) पाश, १६) मोर,
१७) अनंत फूल, १८) अंकुश, १९) कमळ, २०) उंदीर, २१) केवडा.
*गणपतीची २१ नावं*
१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष. ४ गजवक्र, ५. लंबोदर,
६. विकट, ७.विघ्नराजेंद, ८. धुम्रवर्ण, ९. भालचंद, १०. विनायक,
११. गणपती, १२. गजानन, १३.ओंकार, १४. मयुरेश्वर,१५. धुम्रकेत,
१६. महोदर, १७. विघ्नराज, १८.ब्रह्माणस्पती, १९, जगदीश, २०. श्रीगणेश, २१. अदिदेव.
*पूजेसाठी २१ पानं*
दुर्वा, मधुमालती, बोर, माका, बेल, धोतरा, आघाडा, तुळस, डोलरी, कण्हेरी, शमी,
अर्जुन, रुई, विष्णुकांत, जाई, डाळींब, देवदार, केवडा, मारवा, पिंपळ, अगस्ती.
*२१ फुलं*
जास्वंदी, पांढरं कमळ, तांबडं कमळ, जाई, मधुमालती, सोनचाफा, केवडा, बकुळ, उंडी,
सुपारी, नागकेशर, मोगरा, धोतरा, कण्हेरी, प्राजक्त, चवई, नांदुरकी, गोविंद,मोहोर, शतपत्र.
*२१ पुराणं*
गणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रह्मावैवर्त पुराण, अग्नि पुराण, पद्म पुराण, पद्मपुराण उत्तर, नारद पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, लिंंग पुराण उत्तरार्ध, वराहपुराण, वराह पुराण उत्तरार्ध, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण,ब्रह्माांड पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण ब्रह्माखंड, स्कंद पुरा अवंतीखंड, स्कंद पुराण प्रभासखंड.
*ठार मारलेले २१ राक्षस*
नारांतक, देवांतक, मधु, कैटभ, त्रिपुरासूर, सिंदुरासूर, व्यामोसूर, लोभासूर,मोहासूर, मदासूर, कमलासूर, विघ्नासूर, मत्सरासूर, देभासूर, अनसासूर, क्रोधासूर,मायासूर, कामासूर, मेषासूर, मलकासूर.
*गणपतीच्या २१ मूर्ती*
१. बाल गणपती,
२. तरुण गणपती,
३. भक्ति विघ्नेश्वर,
४ वीरू-विघ्नेश,
५. शक्तिगणेश.
६. लक्ष्मी-गणपती,
७. उच्छिष्ट गणपती,
८. महागणपती,
९. उर्ध्व गणपती,
१०.पिंगळा गणपती,
११. हेरंब गणपती,
१२. प्रसन्न गणपती,
१३. ध्वज गणपती,
१४.उन्मत-उच्छिष्ट गणपती,
१५. विघ्नराज,
१६. भुवनेश गणपती,
१७. नृत्य गणपती,
१८.हरिदा गणपती,
१९ भालचंद,
२०. शर्पकर्ण,
२१ एकदंत
September 3, 2011
मारुतीस्तोत्र
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
तनू शिवशक्ती असे पूर्ण ज्याचे
तया चंडकीर्णा मारितां तो पळाला
सुमित्रासुता लागली शक्ती जेव्हां
जगी भीम तो मारुती ब्रम्हचारी
अनादीनाथ पूर्ण तारावयासी !
असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला !
तनू शिवशक्ती असे पूर्ण ज्याचे
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे !
तिच्या भक्तीलागी असा जन्म झालानमस्कार माझा तया मारुतीला !
गिळायासि जातां तया भास्करासी
तिथे राहु तो यउनी त्याजपाशी !तया चंडकीर्णा मारितां तो पळाला
नमस्कार माझा तया मारुतीला !
खरा ब्रह्मचारी मनातें विचारी
म्हणोनी तया भेटला रावणारी !
दयासागरु भक्तिनें गौरविलानमस्कार माझा तया मारुतीला !
सुमित्रासुता लागली शक्ती जेव्हां
धरी रूप अक्राळ विक्राळ तेव्हां !
गिरी आणूनी शिघ्र तो उठविलानमस्कार माझा तया मारुतीला !
जगी भीम तो मारुती ब्रम्हचारी
समस्तांपुढे तापसी निर्विकारी !
नमूं जावयालागिं रे मोक्षपंथानमस्कार माझा तया हनुमंता !