२५ मार्च, २०१२

आनंद पोटात माझ्या मायेना ....................



आज पहिल्यांदाच या ब्लॉग वर एका पत्रिकेविषयी भाष्य करताना विशेष आनंद होत आहे.   याचे कारण की  ती माझी स्वतःची पत्रिका आहे.  आणि  खूप वर्षापासून पाहिलेले एक स्वप्न आज प्रत्यक्ष घडत आहे.  वयाची आज ३५ शी पार करत असताना आजपर्यंत  ' परदेशवारी '  हे फक्त आमच्यासाठी स्वप्नच बनून राहिले होते.  नुसती इतरांची  प्रवास वर्णने ऐकणे, मित्र मंडळी -  नातेवाईक यांना  विमानतळावर पोचवणे, आणायला जाणे,  इतर लोकांसाठी परदेशवारी कधी घडेल यासाठी प्रश्नकुंडली मांडणे  अगदी फार फार तर मुंबईहून नवी मुंबईला परतताना वाशी ब्रीज वरुन  मुंबई विमानतळावर उतरणारी विमाने पाहणे  एवढाच काय तो आमचा संबंध. मात्र लहानपणापासून एक सुप्त  इच्छा परदेशात जायची राहिली होती.  साधारण २००७ सालापासून एक्सपोर्ट मार्केटिंग मधे कामाला लागल्यापासून आशा उंचावल्या होत्या आणि शेवटी आज  २५ मार्च २०१२   रोजी माझे परदेशवारीचे स्वप्न पुर्ण होत आहे.
कंपनीच्या कामासाठी दिनां २५ मार्च ते ३० मार्च जर्मनीत ( Dusseldorf  ) मुक्काम    ३१ मार्चला परत मायदेशी परतायचे आहे.
--------------------------------------------------------
पत्रिकेबद्दल बोलायचे झाले तर
शेवटी शनी महाराजांनी आम्हाला परदेश दाखवला.  शनी महाराज घटना उशीरा घडवून आणतात पण  नक्की घडवून आणताता याचा प्रचिती आली. २०१५ पर्यंत शनी महादशा आम्हाला आहे . शनी महाराज स्वतः १२ व्य स्थानात आहेत ( शनी स्वतः च्याच नक्षत्रात आणि स्वतःच्याच उपनक्षत्रात आहे ) .
परदेशी जायचा ' योग ' आहे  का हे पहायचे झाले तर व्ययाचा उपनक्षत्र स्वामी ३,९, १२ यापैकी एका स्थानचा कार्येश व्हायला हवा . १२ उप. न. स्वामी स्वतः शनी आहे  आणि तो १२ व्या स्थानाचा कार्येश आहे.
एखादी घटना घडण्यासाठी महादशा  स्वामीही अनुकुल हवा

महादशेच्या शेवटच्या कालखंडात शनी महाराजांनी आमच्यावर कृपा केली आणि आमचे तिकिट निघाले.अंतर्दशा - विदशा  - गुरु  ची आहे जाची ५ वी दृष्टी १२ व्या स्थानावर आहे. आज २५ तारखेला जेंव्हा आम्ही स्विस कंपनीच्या झुरीचला जाणा-या विमानात   बसत आहोत , तेंव्हा चंद्र मेष राशीत  
'अश्विनी' नक्षत्रात ( पत्रिकेतील ९ व्या स्थानात ) आहे. 




   ज्यावेळी आमच्या ज्योतीषाचा दुरायन्वेही काही संबंध नव्हता त्यावेळी श्री. धोंडोपंत आपटे यांनी आमची पत्रिका बघून परदेशगमन २०१२ साली होईल असे सांगीतले होते तसेच त्यांनीच आम्हाला जोतिषाचे धडे घेण्याचा अमुल्य सल्ला दिला होता. या बद्दल त्यांचे ही आभार

शनी महाराजांची कृपा अशीच अखंड राहो !

शेवटी एवढच म्हणावेसे वाटते की 

आनंद पोटात माझ्या मायेना ....................

1 टिप्पणी: