३० जून, २०१२

पांडुरंगाष्टक



आमचे स्नेही श्री  प्रसाद  रेडकर  यांच्या कडून हे मिळालेले हे ! ! पांडुरंगाष्टक ! !
  महायोगपीठे तटे भीमरथ्या: | वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्दै: |
समागत्य तिष्ठंन्तमानन्दकन्दं | परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||1||
तडिद्वाससं नीलमेघावभासं | रमामंदिर सुंदर चित्प्रकाशम् |
वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं | परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||2||
प्रमाण भवाब्धेरिंदं मामकांनां | नितंब:कराभ्यां धृतो येन तस्मात् |
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोष: | परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||3||
स्फुरत्कौस्तुभालंकृत कंठदेशे | श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् |
शिवं शांतमीड्यं वर लोकपालं | परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||4||
शरच्चंद्रबिंबानन चारूहासं | लसत्कुंडलाक्रांन्तगंडस्थलांगम् |
जपारागबिंबाधरं कंजनेत्रं | परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||5||
किरींटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं | सुरैरर्चित दिव्यरत्नैरनध्यै: |
त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावंतसम् | परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||6||
विभंु वेणुनाद चरंतं दुरंत | स्वयं लीलया गोपवेषं दधानम् |
गवा वृदकानन्दनं चारूहासं | परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||7||
अजं रूक्मिणिप्राणसंजीवनं तं | परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् |
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं | परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||8||
स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये | पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम्|
भवांभोनिधिं तेSपि तीतर्वाSन्तकाले । हरेरलयं शाश्वतं प्राप्नुवन्ति ॥९॥
॥इति श्रीमतशंकराचार्य विरचितं श्रीपांडुरंगाष्टकं संपूर्णम् ॥

२९ जून, २०१२

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीच्या  सर्व भाविकांना शुभेच्छा !!


२७ जून, २०१२

श्रीमदभगवद् गीता ( अध्याय १२ वा )

  श्रीमदभगवद् गीता  ( अध्याय १२ वा )

  दररोज संध्याकाळी आपल्या नित्य पठणाया अध्यायाचे ही वाचन करावे




२५ जून, २०१२

आधुनिक जन्म पत्रिका


  काल पुण्याला एका बारशाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे कार्यक्रमासाठी केलेल्या सजावटीत ही  पत्रिका बघायला मिळाली.
 
 छान संकल्पना. 
( अर्थात  योग्य भावात , योग्य गुण वैशीष्ठे लिहिली असती तर जास्त संयुक्तीक झाले असते )  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
असो
 
छोट्या बाळाला  ( कु. वैदेही मंदार मराठे )   भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा
 अमोल केळकर

२४ जून, २०१२

२३ जून, २०१२

कन्या राशीचा मंगळ

कन्या राशीचा मंगळ

नुकताच ( २१ जूनला )  मंगळाने  कन्या राशीत प्रवेश केला आहे.  कन्या ही बुधाची रास  यादृष्टीने  मंगळ  आपल्या शत्रूच्या राशीत आला आहे. श्री. व. दा भट यांनी त्यांच्या असे ग्रह - अशा राशी या पुस्तकात '  कन्या राशीतील मंगळावर स्वतंत्र धडाच लिहिलेला आहे. यात त्यानी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.


मेष व वृश्चिक  लग्नास मंगळ हा  लग्नेश होऊन तो जेंव्हा कन्या राशीत असतो तेंव्हा प्रकृतीच्या दृष्टीने  तो हमखास अशुभ फलदायी ठरतो.


कन्या राशीत मंगळ असता शत्रू  राशीतील मंगळ यादृष्टीने काही ठळक परिणाम निश्चित देतो. अशा वेळी मंगळ ज्या दोन स्थानांचा अधिपती होतो त्या दो स्थानापैकी  एखाद्या स्थानाचे  हमखास अशुभ फल मिळते. मंगळ लग्नेश, अष्टमेश, षष्ठेश, राश्याधीपती असेल तर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी


कन्या राशीचा लग्नी मंगळ  हा शारीरिक पीडा, अपघात या दृष्टीने वाईट फळ देऊ शकतो. लग्नी कन्येचा मंगळ असून त्याचा शनि, हर्षल नेपच्यूनशी  प्रथम दर्जाचा योग युति, केंद्र  प्रतियोग असेल व लग्नेश बुधाला राशीबल नसेल तर ती परिस्थीतीही अपघाताला पोषक होऊ शकते.


( सध्या शनी ही  कन्या राशीत आहे, मात्र  सध्यातरी या राशीत त्यांची युती होणार नाही )


आरोग्याच्या दृष्टीने ही कन्येतील मंगळाचा विचार करावा.  कुंडलीतील इतर ग्रहमान विशेष्तः चंद्र , बुध, शुक्र  हे भावनाबुध्दी दर्शक ग्रह हर्षल, नेपच्यून , शनि  ह्या ग्रहांच्या  प्रथम दर्जाच्या कुयोगात असून  मंगळ कन्या राशीत असेल तर मनोविकृती - भग्नव्यक्तिमत्व , मानसिक असंतुलन, नैराश्य ह्या गोष्टी आढळतात.

 

तुळ लग्नाच्या कुंडलीत  कन्यचा मंगळ व्ययात  हा ही एक जबरदस्त योग आहे.  अशावेळी शुक्र, सप्तमस्थान पापग्रहयुक्त असेल तर वैवाहीक जीवनात त्रास संभवतात संसारिक सुख कमी मिळते. कारक ग्रह शुक्रावर फलाची तिव्रता अवलंबून असते.


( संदर्भ - ' असे ग्रह - अशा राशी  ' लेखक  श्री व.दा भट )







२२ जून, २०१२

श्री नीलसरस्वती स्तोत्रम्


श्री नीलसरस्वती स्तोत्रम् !!

आज शुक्रवार , वाचन करूयात   श्री नीलसरस्वती स्तोत्राचे









 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
( श्री उपाध्ये यांच्या भक्तीसागर पुस्तकातून साभार )

२१ जून, २०१२

बावनश्लोकी गुरुचरित्र


 श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन !
 पर्वत म्हणजे श्रीगुरुभुवन !
 आपण नये आतां येथून !
 सोडूनि चरण श्रीगुरुचे  !!


 
तूं भेटलाशी मज तारक !

दैन्य गेलें सकळहि दु:ख !
सर्वाभीष्ट लाधलें सुख !
श्रीगुरुचरित्र  ऐकता  !!



( संपुर्ण पोथी वाचण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा )

गुरु पुष्यामृत

आज  सकाळ पासून गुरु पुष्यामृत योगावर  सोने खरेदीबाबत अनेक जहिराती पहाण्यात आल्या , त्याबाबत एक खुलासा

गुरुवारी ' पुष्य ' नक्षत्र असले की गुरु - पुष्यामृत योग होतो.

आज गुरुवार दिवस भर चंद्र पुनर्वसू नक्षत्रात आहे आणि पहाटे ४ वाजून १७ मिनिटानी पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे.( आता इंग्रजी कालगणनेनुसार रात्री १२ नंतर पुढील दिवस म्हणजे शुक्रवार सुरु होईल पण आपल्या पध्दतीत सुर्योदयाला नवीन दिवस सुरु होतो) थोडक्यात काय पहाटे ४.१७ ते सुर्योदय होईपर्यंत ' गुरु पुष्यामृत योग आहे.

आता या कालावधीत कुठला सोनार उघडा असतो ( म्हणजे दुकान उघडे ठेवतो ) हे पहाणे कुतुहलाचे ठरेल असो.
 

२० जून, २०१२

बुधस्तोत्र



आज बुधवार. पठण करुयात ' बुधस्तोत्राचे '

प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणांप्रतिमं बुधम् !
सौम्यं सौम्यगुणोपेतं  तं बुधं प्रणमाम्यहम् !!

उत्पातरुपी जगतां चंद्रपुत्रौ महाद्यूति: !
सूर्यप्रियकरो विद्यान् पीडं हरतु मे बुधः !!

शिरीषपुष्पसंकाशः कपिशीलो$थवा पुनः !
सौम्यपुत्रौ बुधश्चैव सदा शांतं प्रयच्छतु !!

श्यामः शिरालश्च कलानिधिज्ञः कौतूहलो
 कोमलवाग्विलासी !
रजोधिको मध्यमरुपदृग्स्यात् आताम्रनेत्री
द्विजराज पूत्रः !!

बुधं बुध्दिप्रदातारं सूर्यरश्मिसमन्विम् !
यजमानहितार्थाय बुधमावयाम्यहम् !!

अहो चंद्रसुतः श्रीमान् जगधारण्यसमूद् भवः !
अत्रिगोत्रश्चतुर्बाहु: खड्गखेटधारकः !!

गदाधरो नृसिंहस्थः  स्वर्णनामः  शमन्वितः !
कृष्णवृक्षस्य पत्रेषु इंद्रविष्णू प्रपूजितः !!

ज्ञेयो बुधः पंडितश्च  रोहिणेयश्च सोमजः !
कुमारो राजपुत्रश्च शैशवः शशिनन्दनः !!

गुरुपुत्रश्च तारेयो विबुधो बोधनस्तथा !
सौम्यः सर्वगुणोपेतो रत्नदानफलप्रदा !!

एतानि बुधनामानि प्रातः काले पठेन्नरः !
बुध्दिर्विवृध्दतां याती बुधपीडा न जायते !!

!! इति श्रीबुधस्तोत्रम् संपुर्णंम्  !!

१८ जून, २०१२

श्रीशिवकवच ( मराठी )





हे शिवकवच धारील !  शंभू अनुग्रह करील !
भीती भय नुरेल !  मरणाधीन तयासी !!

सर्व दु:खदारिद्र्यहारी ! अखेल कल्याणकारी !

हे शिवकवचधारी !  देवही तया पूजती !!


( श्री शिवकवच वाचण्यासाठी चित्रावर टिचकी मारावी

१७ जून, २०१२

Motivational Quote of the Day


"There are no secrets to success. It is the result of preparation, hard work, and learning from failure."
Colin Powell

१२ जून, २०१२

रात्र वै-याची आहे ....


  दहावीत ९५ % टक्के किंवा त्यापुढे मार्क मिळाले नाहीत तर आपल्या पाल्याला उज्वल भवितव्य नाही
 असा समज कुणीही पालकानी ( इथून पुढे काही दिवस तरी ) करु नये.

 ( ग्रहांची ) दशा बदलली की दिशा ही बदलते. असो

याबबतीत आम्ही मात्र एकदम नशिबवान होतो. दहावी , बारावी ( किंवा कुठलीही परिक्षा असो)  आमची गाडीने कधीच ८० % चा धक्का गाठला नाही. रडत रखडत आम्ही ७० -७५ च्या स्पीडनेच जायचो. म्हणून आमच्या आई - वडिलांनी कधीच नाके मुरडली नाहीत किंबहूना प्राप्त परिस्थीत योग्य  संधीचा विचार करुन पुढे जाण्यास प्रोत्साहीत केले. त्यामुळे अगदी फ्री सीट मधे ( डोनेशन न देता ) आम्ही इंजीनिअरींग, एम बी ए झालो. २० वर्षापुर्वी  १० वीचा रिझल्ट लागला तेंव्हा कुढल्या तरी वृत्तपत्राच्या कार्यालयातून मार्क समजले  आणि पडलेल्या कमी मार्कामुळे थोडा मुड गेला होता. (  मार्क मुदामच सांगत नाही, अगदी मराठी विषयात ही काठावर पास झालो होतो ). त्यावेळी चांगले आठवते काकांनी संध्याकाळी पेढे घेऊन सांगलीच्या गणपतीला आणि केळकर महाराजांकडे आशीर्वाद घेण्यासाठी नेले होते.  जे मिळाले नाही त्याचे दु:ख करत बसू नये अधीक जोमाने पुढील प्रयत्न करावेत , नाउमेद होउ नये ही शिकवण लहानपणा पासून मिळत गेली. असो उद्याच्या दहावीच्या निकालानिमित्याने हे सगळं आठवले.

आणखी एक,  उद्या संपुर्ण दिवस बुधाचे नक्षत्र आहे. वार बुधवार आहे. बुध जोरदार पणे रुलिंग मधे आहे. शासनाची निकाल सांगणारे संकेतस्थळ  उघडायला उशीर होणे, संकेतसथळ उघडण्यासाठी २-३ वेळेला प्रयत्न केल्यावर पेज येणे, वारंवार नंबर टाकून ही निकाल न दिसणे, अनवधानाने चुकीचा निकाल फिड झाला असणे, निकालात चुका असणे असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ संकेत स्थळावरील निकालावर विसंबून राहू नये. प्रत्यक्ष गुण पत्रिका पडताळून पहावी.


समस्त दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचे पुढील भवितव्य घडवण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडण्यात सज्ज झालेल्या पालकांना अगामी लढाईसाठी हार्दीक शुभेच्छा

( शुभेच्छूक ) अमोल केळकर

१० जून, २०१२

रवीचा नक्षत्र प्रवेश आणि पावसाचे वाहन





वरील कोष्टकात बाकी ० ( शून्य) आल्यास वाहन हत्ती - खूप पाऊस


बाकी ३ आल्यास वाहन बेडूक - खुप पाऊस


बाकी ६ आल्यास वाहन उंदीर - अल्प पाऊस






आजकाल हे कितपत अनुभवास येते हा एक ऒत्सुक्याचा विषय होईल.

९ जून, २०१२

शनी देवता स्तोत्र

शनी मंत्र ऐकण्यासाठी खालील बटणावर टिचकी मारावी




हेचि दान देगा शनि
जडो चित्त तुझे चरणी
माझे चित्त तुझे चरणी
शनि माझी कामधेनू
शनि माझा कल्पतरू
शनि सुखाची साऊली
शनि मायेची माऊली
माझी श्रध्दा शनिवरी
तेचि नेति पैलतिरी
मी आहे तुझा दास
तुझे चरणी माझा वास
नवग्रहा मधे थोर
तुझा महिमा अपार
तुझी कृपा ज्यासी झाली
तोचि झाला भाग्यशाली
तुझे नाम घेता मुखी
होई जिवनात सुखी
मारुतीची भक्ती बरी
त्यासी शनिदेव तारी
भेटी आलो शनिवारी
माझे दु:ख तू निवारी




 चित्र सौजन्य : - शनि महिमा पुस्तक - वसुधा वाघ )

८ जून, २०१२

सार्थ श्री महालक्ष्मी स्तोत्र


नित्यं पठति यो भक्त्या त्वलक्ष्मीस्तस्य नश्यति !
ॠणं च नश्यते तीव्रं वियोगं नैव पश्यति!!

७ जून, २०१२

संकष्टी चतुर्थी - ७ जून २०१२


आज गुरुवार संकष्टी चतुर्थी , चंद्रोदय १० वा ०३ मिनीटे.

दर्शन घेऊयात साता-यातील पंचमुखी गणपतीचे 


 

४ जून, २०१२

शिव रक्षा




आज सोमवार. नियमीत वाचन करुयात
 ' शिव रक्षा ' स्तोत्राचे 


३ जून, २०१२