२३ जून, २०१२

कन्या राशीचा मंगळ

कन्या राशीचा मंगळ

नुकताच ( २१ जूनला )  मंगळाने  कन्या राशीत प्रवेश केला आहे.  कन्या ही बुधाची रास  यादृष्टीने  मंगळ  आपल्या शत्रूच्या राशीत आला आहे. श्री. व. दा भट यांनी त्यांच्या असे ग्रह - अशा राशी या पुस्तकात '  कन्या राशीतील मंगळावर स्वतंत्र धडाच लिहिलेला आहे. यात त्यानी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.


मेष व वृश्चिक  लग्नास मंगळ हा  लग्नेश होऊन तो जेंव्हा कन्या राशीत असतो तेंव्हा प्रकृतीच्या दृष्टीने  तो हमखास अशुभ फलदायी ठरतो.


कन्या राशीत मंगळ असता शत्रू  राशीतील मंगळ यादृष्टीने काही ठळक परिणाम निश्चित देतो. अशा वेळी मंगळ ज्या दोन स्थानांचा अधिपती होतो त्या दो स्थानापैकी  एखाद्या स्थानाचे  हमखास अशुभ फल मिळते. मंगळ लग्नेश, अष्टमेश, षष्ठेश, राश्याधीपती असेल तर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी


कन्या राशीचा लग्नी मंगळ  हा शारीरिक पीडा, अपघात या दृष्टीने वाईट फळ देऊ शकतो. लग्नी कन्येचा मंगळ असून त्याचा शनि, हर्षल नेपच्यूनशी  प्रथम दर्जाचा योग युति, केंद्र  प्रतियोग असेल व लग्नेश बुधाला राशीबल नसेल तर ती परिस्थीतीही अपघाताला पोषक होऊ शकते.


( सध्या शनी ही  कन्या राशीत आहे, मात्र  सध्यातरी या राशीत त्यांची युती होणार नाही )


आरोग्याच्या दृष्टीने ही कन्येतील मंगळाचा विचार करावा.  कुंडलीतील इतर ग्रहमान विशेष्तः चंद्र , बुध, शुक्र  हे भावनाबुध्दी दर्शक ग्रह हर्षल, नेपच्यून , शनि  ह्या ग्रहांच्या  प्रथम दर्जाच्या कुयोगात असून  मंगळ कन्या राशीत असेल तर मनोविकृती - भग्नव्यक्तिमत्व , मानसिक असंतुलन, नैराश्य ह्या गोष्टी आढळतात.

 

तुळ लग्नाच्या कुंडलीत  कन्यचा मंगळ व्ययात  हा ही एक जबरदस्त योग आहे.  अशावेळी शुक्र, सप्तमस्थान पापग्रहयुक्त असेल तर वैवाहीक जीवनात त्रास संभवतात संसारिक सुख कमी मिळते. कारक ग्रह शुक्रावर फलाची तिव्रता अवलंबून असते.


( संदर्भ - ' असे ग्रह - अशा राशी  ' लेखक  श्री व.दा भट )







२ टिप्पण्या: