January 31, 2013

January 30, 2013

संकष्टी चतुर्थी

आज  संकष्टी चतुर्थी  

चंद्रोदय ९.२१ वाजता

दर्शन घेऊयात  मोरगावच्या  ' मयुरेश्वराचे '

   
क-हेच्या तीरी एकसे मोरगाव
तिथे नांदतो  पहा मोरया देव !
चला जाऊ यात्रे महापुण्य आहे
मनी इच्छिले मोरया देत आहे !!!

January 29, 2013

श्रीशंकर स्तोत्रम्

श्रीशंकर स्तोत्रम्

पठण करुयात श्री . प. पू. वासुदेवानंदसरस्वतीविरचित श्रीशंकर स्तोत्राचे 


January 28, 2013

श्रीशंकर स्तोत्रम्

श्रीशंकर स्तोत्रम्

पठण करुयात श्री . प. पू. वासुदेवानंदसरस्वतीविरचित श्रीशंकर स्तोत्राचे

January 27, 2013

श्रीनागनाथ स्तोत्रम्

श्रीनागनाथ  स्तोत्रम्

पठण करुयात श्री . प. पू. वासुदेवानंदसरस्वतीविरचित  श्रीनागनाथ  स्तोत्राचे 
 

January 26, 2013

बलसागर भारत होवो ! विश्वात शोभुनी राहो


बलसागर भारत होवो।
विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।
 
हे कंकण करि बान्धियले
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे ठरले
मी सिध्द मरायाला हो।
बलसागर भारत होवो ।।1।।
 
वैभवी देश चढवीन
सर्वस्वी त्यास अर्पिन
तिमिर घोर संहारीन
या बन्धु सहाय्याला हो।
बल सागर भारत होवो ।।2।।
 
हातात हात घालून
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो।
बलसागर भारत होवो ।।3।।
 
करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारत गीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो।
बलसागर भारत होवो ।।4।।
 
या उठा करू हो सार्थ
सम्पादु दिव्य पुरूषार्थ
जीवन हे ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो।
बलसागर भारत होवो ।।5।।
 
मी माय थोर होईल
वैभव दिव्य शोभेल
जगतास शान्ति देईल
तो सोन्याचा दिस येवो।
बलसागर भारत होवो ।।6।।

- साने गुरूजी

January 25, 2013

विश्वेश्वरादिस्तुति

विश्वेश्वरादिस्तुति

पठण करुयात श्री . प. पू. वासुदेवानंदसरस्वतीविरचित  विश्वेश्वराच्या स्तुतीचे




January 24, 2013

श्री स्वामी समर्थ



                                   श्री स्वामी समर्थ 

January 23, 2013

मृत्युंजयगर्भीत स्तोत्रम्

मृत्युंजयगर्भीत स्तोत्रम्

श्री . प. पू. वासुदेवानंदसरस्वतीविरचित मृत्युंजयगर्भीतया  स्तोत्राचे पठण करुयात



January 22, 2013

श्री शंकरापराधक्षमापन स्तोत्रम्

श्री  शंकरापराधक्षमापन स्तोत्रम्

श्री . प. पू. वासुदेवानंदसरस्वतीविरचित या  स्तोत्राचे पठण करुयात

January 21, 2013

अनादिकल्पेश्वर स्तोत्रम्

अनादिकल्पेश्वर स्तोत्रम्

श्री . प. पू. वासुदेवानंदसरस्वतीविरचित अनादिकल्पेश्वर स्तोत्राचे पठण करुयात

January 20, 2013

सरस्वती स्तोत्र

सरस्वती स्तोत्र

श्री . प. पू. वासुदेवानंदसरस्वतीविरचित सरस्वती स्तोत्राचे पठण करुयात


January 18, 2013

समंत्रकम गणपतीस्तोत्रम



January 17, 2013

श्री स्वामी समर्थ


                                                              श्री स्वामी समर्थ

January 16, 2013

January 15, 2013

विनायक चतुर्थी

विनायक चतुर्थी  ( अंगारक योग )

आज मंगळवार, १५ जानेवारी  विनायक चतुर्थी .
 पठण करुयात श्री वासूदेवानंदसरस्वतीरचित गणपती स्तोत्राचे



January 14, 2013

ब्रह्मसंस्कृती संस्थेचा कीर्तन सोहळा


स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती निमित्य  
ब्रह्मसंस्कृती संस्था, विवेकानंदनगर ( बेलापूर, नवी मुंबई )  यांच्यातर्फे    
दिनांक १८ जाने  ते २० जाने २०१३ या कलावधीत 
 कीर्तनकार श्री रामचंद्र भिडे  पुणे यांच्या  कीर्तनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.


वेळ संध्याकाळी ७ ते ९ वा
ठिकाण : श्री अम्बिका योग कुटीर वनौषधी केंद्र सेक्टर ९ नॉर्थ ,स्वामी विवेकानंद नगर (  सिबीडी , बेलापूर नवी मुंबई)

मित्र व परिवारासह सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा हि विनंती !

मकर संक्राती

                                               मकर  संक्राती

सालाबादाप्रमाणे आज रवी ग्रह मकर राशीत प्रवेश करत आहे.( सकाळी ७.०० वा)


तिळ गुळ घ्या - गोड बोला

January 13, 2013

काशीविश्वेश्वर स्तोत्रम्

काशीविश्वेश्वर स्तोत्रम्

पठण करुयात श्री . प. पू. वासुदेवानंदसरस्वतीविरचित  काशीविश्वेश्वर स्तोत्राचे 

January 12, 2013

संक्षिप्त शनी महात्म्य

संक्षिप्त शनी महात्म्य

ग्रहसंकेत २०१२  दिवाळी अंकातून साभार  



January 11, 2013

राजकारणाचा दांडा ....... साहित्यास काळ

 

  वरील शीर्षकाला काहीही अर्थ नाही  . अगदी खरे सांगतो केवळ आपल्या लिखाणाला ब-यापैकी
प्रसिध्दी मिळावीम्हणून केलेला एक प्रयत्न  किंवा सवंग  लोकप्रियता  वगैरे वगैरे  असे  जर वाटत
असेल तर   तसे नाही. म्हणलं  तर  खुप मोठा अर्थ यात दडला आहे.
  सूज्ञास सांगणे न लगे ! .  वस्तुस्थिती आहे असेच म्हणावे लागेल. निमित्य  आजपासून सुरु होणारे
 ८६ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन.
अध्यक्षीय निवडणूकीपासून ते ग्रंथदिंडी पर्यंतचा वादादित प्रवास पार करून.
आज परशुराम भूमीत  या संमेलनाचे उदघाटन होत आहे  त्यानिमित्याने 
  माझ्यातर्फे चिपळूणवासीयांना हार्दीक शुभेच्छा.
या शुभेच्छा देताना एक साहित्यीक प्रेमी  बरोबरच  ' चिपळूण ' शहराबद्दल वाटणारी  आपुलकीचा
 मोठा वाटा आहे.  शिक्षण झाल्यानंतर जन्मगाव सांगली सोडून १९९७ साली प्रथम नोकरी साठी ज्या
गावी राहिलो ते हे चिपळूण. या परशुरामाच्या भुमीतजगण्याची, धडपड करण्याची नवी उमेद  मिळाली.
आज साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन जरी राजकीय हस्तक्षेपामुळे
 ' परशुराम यांचे  चित्र / कु-हाड गेलेली असली तरी  त्यांचे विचार जनसामान्यांच्या मनातून सहजा
 सहजी जाणार नाहीत याची नोंद संबंधीतांनी अवश्य घ्यावी

असो.  यानिमित्याने अनेक राजकीय मंडळी ( सर्वच पक्षातील ) चिपळूण शहरात येतील . कदाचीत
उपस्थिती साहित्यीकांपेक्षा त्यांचीच संख्या जास्त असू शकेल. आज संमेलनस्थळी व्यासपीठ हे
 साहित्यीकांपेक्षा राजकारणी मंडळीनी भरुन गेलेले असेल .
 जा कुठल्या वर्षी  साहित्य संमेलनात राजकारणी प्रेक्षाकात आणि साहित्यीक व्यासपीठावर
 असतील तो दिवस मराठी साहित्य संमेलनासाठी सुदीन असेल.

अमावस्येच्या शुभदिनी साहित्य संमेलनाची सुरवात करुन आयोजकानी पुढारलेल्या महाराष्ट्राचे
 विषेश उदाहरण संपुर्ण जगासमोर ठेवले आहे .यानिमित्य आयोजकांचे विषेश अभिनंदन .

 ( दैव  भविष्या यावर विश्वास नसलेले , स्वतःच्या मनगटाच्या ताकतीवर अनेक घटना घडवून
आणू शकणारे आहेत,  असतात आणि असतील यात काहीही वावगे नाही  मात्र तरीही  एखादे
चांगले काम करायला जाताना  अगदी वरील वर्गीकरणातील मंडळीही शक्यतो ' अमावस्येला'  कुठले
ही कार्य करायला जाणार नाहीत. )

वरील  विशेष साहित्यीक मूल्य नसलेले लिखाण आपण इथेपर्यंत येऊन वाचल्या बद्दल आपले आभार.
शेवटी मनातील काही  विचार आठ ओळीत लिहून आपली रजा घेतो.


८६ व्या अ.भा मराठी साहित्य संमेलनास हार्दीक शुभेच्छा


    हित साध्य करण्यासाठी
    घेतले जातात मेळावे
   अशी स्थिती असताना
    मागे का रहावे ?

   साहित्य संमेलनात उपस्थिती
   राजकीय नेत्यांची नवी रीत
    साहित्यीक मात्र जमू लागले
    मैदानात  भीत भीत

अमोल केळकर
जाने ११, २०१३

श्री साईसच्चरित्र ! अध्याय त्रेपन्न

श्री साईसच्चरित्र ! अध्याय त्रेपन्न
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

January 10, 2013

श्री दत्तगुरु पंचकम


आज गुरुवार. वाचन करुयात श्री प.पू. वासुदेवानंदसरस्वती रचीत दत्तपंचकम

January 9, 2013

स्वामी स्वरुपानंद जयंती उत्सव

भक्त

आम्ही स्वामींचे हो भक्त
नाही आम्हा कधी खंत !

परमहंस सद् गुरुमूर्ति
माझ्या मनींची विश्रांती !

'रामकृष्णहरि' मंत्र
साथी आमुचा दिनरात्र !

नित्यकर्मे प्रपंचाची
हीच माला हो जपाची !

सो S हं ध्यान ज्ञानियाचे
अहो माझ्या माऊलीचे !

आठवा हो स्वरुपानंद
अवघा आनंदीआनंद !


रचना: सौ पार्वती गं आपटे
            सांगली

January 8, 2013

श्री साईसच्चरित्र ! अध्याय बावन्न

श्री साईसच्चरित्र ! अध्याय बावन्न
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

January 7, 2013

ग्रहांचे नक्षत्र - राशी प्रवेश

  ग्रहांचे  नक्षत्र / राशी प्रवेश

जानेवारी २०१३ मधील  ग्रहांचे  नक्षत्र , राशी प्रवेश खालीलप्रमाणे

श्री साईसच्चरित्र ! अध्याय एक्कावन्न

श्री साईसच्चरित्र ! अध्याय एक्कावन्न
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

January 6, 2013

श्री साईसच्चरित्र ! अध्याय पन्नास

श्री साईसच्चरित्र ! अध्याय पन्नास
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

January 5, 2013

श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकुणपन्नास

श्री साईसच्चरित्र ! अध्याय एकुणपन्नास
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

January 4, 2013

श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठ्ठेचाळीस

श्री साईसच्चरित्र ! अध्याय अठ्ठेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)


January 3, 2013

जोतिषशास्त्रावरील ब्लॉग....


मराठीतून लिहिले जाणारे आणी जोतिष या विषयावर ज्यात माहिती लिहिलेली आहे असे  ब्लॉग:-


१)  धोंडोपंत उवाच - हा ब्लॉग माहित नसलेली माणसे सापडणे जरा अवघडच आहे
२)  नक्षत्र  -  श्री दिपक पिंपळे
३)  कृष्णमुर्ती जोतिष - श्री नानासाहेब पाटील
४) राजीव उपाध्ये यांची चिंतनिका - श्री राजीव उपाध्ये
५) वास्तुशास्त्र जोतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग  - श्री संजीव नाईक
६)  भविष्याची गुरुकिल्ली - श्री  दिपक पाटील

आणखी काही ब्लॉग असल्यास अवश्य निदर्शनास आणून द्यावेत . ही सुची वाढवता येईल 

--------------------------------------------------------------------------

श्री संतोष यांनी  त्यांच्या पहाण्यात आलेले खालील ब्लॉग  दिले आहेत

अमोल,

मला जालावर सापडलेले काही ज्योतिष विषयक ब्लोग.

http://destinyahead.blogspot.com - रवींद्र शिंदे

http://nakshatrajyotishindia.blogspot.com - नक्षत्र ज्योतिष

http://tejastrology.blogspot.com - तेजस साळसकर

आपला,
संतोष

 

श्री साईसच्चरित्र ! अध्याय सत्तेचाळीस

श्री साईसच्चरित्र ! अध्याय सत्तेचाळीस
(https://www.shrisaibabasansthan.org या संकेतस्थळावरुन ...)

जानेवारी २०१३ - दिनविशेष

  जानेवारी २०१३  - दिनविशेष

जानेवारी महिन्यातील प्रत्तेक दिवसाचे दिनविशेष  खालील दिलेल्या तक्त्यात पाहता येईल .  सदर तक्क्ता दा.कृ. सोमण यांच्या छोट्या पंचागातून घेतला आहे.
 
 

January 1, 2013

अंगारकी चतुर्थी व्रतकथा

अंगारकी चतुर्थी व्रतकथा


यापुर्वी प्रसिध्द केलेली 'अंगारकी चतुर्थी व्रतकथा  ' इथे परत देत आहे.खालील चित्रावर टिचकी मारताच  नवीन खिडकी उघडेल. तिथे वाचता येईल


अंगारकी संकष्टी



 आज  अंगारकी संकष्टी

चंद्रोदय ९ वा ४० मिनिटे
दर्शन घेऊयात  प्रभादेवीच्या सिध्दिविनायकाचे

 प्रारंभी विनती करू गणपति , विद्या दयासागरा।
अज्ञानत्व हरुनि बुद्धि मति दे , आराध्य मोरेश्वरा।।
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे , देशांतरा पाठवी।
हेरंबा गणनायका गजमुखा , भक्ता बहु तोषवी।।

 


श्री सिद्धि विनायक नामावलि

||श्री सिद्धि विनायक नामावलि ||

ॐ विनायकाय नमः |    ॐ विघ्नराजाय नमः |
ॐ गौरीपुत्राय नमः |     ॐ गणेश्वराय नमः |
ॐ स्कन्दाग्रजाय नमः |  ॐ अव्ययाय नमः |
ॐ पूताय नमः |      ॐ दक्षाध्यक्ष्याय नमः |
ॐ द्विजप्रियाय नमः |    ॐ अग्निगर्भच्छिदे नमः |
ॐ इंद्रश्रीप्रदाय नमः |   ॐ वाणीबलप्रदाय नमः |
ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः |   ॐ शर्वतनयाय नमः |
ॐ गौरीतनूजाय नमः |  ॐ शर्वरीप्रियाय नमः |
ॐ सर्वात्मकाय नमः |  ॐ सृष्टिकर्त्रे नमः |
ॐ देवानीकार्चिताय नमः |  ॐ शिवाय नमः |
ॐ शुद्धाय नमः |     ॐ बुद्धिप्रियाय नमः |
ॐ शांताय नमः |   ॐ ब्रह्मचारिणे नमः |
ॐ गजाननाय नमः |   ॐ द्वैमातुराय नमः |
ॐ मुनिस्तुत्याय नमः |   ॐ भक्त विघ्न विनाशनाय नमः |
ॐ एकदंताय नमः |    ॐ चतुर्बाहवे नमः |
ॐ शक्तिसंयुताय नमः |  ॐ चतुराय नमः |
ॐ लंबोदराय नमः |   ॐ शूर्पकर्णाय नमः |
ॐ हेरंबाय नमः |   ॐ ब्रह्मवित्तमाय नमः |
ॐ कालाय नमः |  ॐ ग्रहपतये नमः |
ॐ कामिने नमः |
ॐ सोमसूर्याग्निलोचनाय नमः | ॐ पाशांकुशधराय नमः |
ॐ छन्दाय नमः |ॐ गुणातीताय नमः |
ॐ निरंजनाय नमः |ॐ अकल्मषाय नमः |
ॐ स्वयंसिद्धार्चितपदाय नमः |ॐ बीजापूरकराय नमः |
ॐ अव्यक्ताय नमः |ॐ गदिने नमः |
ॐ वरदाय नमः | ॐ शाश्वताय नमः |
ॐ कृतिने नमः | ॐ विद्वत्प्रियाय नमः |
ॐ वीतभयाय नमः | ॐ चक्रिणे नमः |
ॐ इक्षुचापधृते नमः | ॐ अब्जोत्पलकराय नमः |
ॐ श्रीधाय नमः | ॐ श्रीहेतवे नमः |
ॐ स्तुतिहर्षताय नमः | ॐ कलाद्भृते नमः |
ॐ जटिने नमः |  ॐ चन्द्रचूडाय नमः |
ॐ अमरेश्वराय नमः |  ॐ नागयज्ञोपवीतिने नमः |
ॐ श्रीकांताय नमः |  ॐ रामार्चितपदाय नमः |
ॐ वृतिने नमः |  ॐ स्थूलकांताय नमः |
ॐ त्रयीकर्त्रे नमः |  ॐ संघोषप्रियाय नमः |
ॐ पुरुषोत्तमाय नमः |  ॐ स्थूलतुण्डाय नमः |
ॐ अग्रजन्याय नमः |  ॐ ग्रामण्ये नमः |
ॐ गणपाय नमः |   ॐ स्थिराय नमः |
ॐ वृद्धिदाय नमः |   ॐ सुभगाय नमः |
ॐ शूराय नमः |   ॐ वागीशाय नमः |
ॐ सिद्धिदाय नमः |   ॐ दूर्वाबिल्वप्रियाय नमः |
ॐ कान्ताय नमः |   ॐ पापहारिणे नमः |
ॐ कृतागमाय नमः |   ॐ समाहिताय नमः |
ॐ वक्रतुण्डाय नमः |   ॐ श्रीप्रदाय नमः |
ॐ सौम्याय नमः |   ॐ भक्ताकांक्षितदाय नमः |
ॐ अच्युताय नमः |   ॐ केवलाय नमः |
ॐ सिद्धाय नमः |   ॐ सच्चिदानंदविग्रहाय नमः |
ॐ ज्ञानिने नमः |   ॐ मायायुक्ताय नमः |
ॐ दन्ताय नमः |  ॐ ब्रह्मिष्ठाय नमः |
ॐ भयावर्चिताय नमः |  ॐ प्रमत्तदैत्यभयदाय नमः |
ॐ व्यक्तमूर्तये नमः |  ॐ अमूर्तये नमः |
ॐ पार्वतीशंकरोत्संगखेलनोत्सवलालनाय नमः |
ॐ समस्तजगदाधाराय नमः | ॐ वरमूषकवाहनाय नमः |
ॐ हृष्टस्तुताय नमः |  ॐ प्रसन्नात्मने नमः |
ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः |
||इति श्रीसिद्धिविनायकाष्टोत्तरशतनामावलिः ||
( संग्रहीत )