|
श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी
करुणाकरा । जयजयाजी यतिवरा । भक्तजन संतापहरा । सर्वेश्वरा गुरुराया ॥१॥ |
लीलावेषधारी दत्ता । सर्वसाक्षी
अनंता । विमलरुपा गुरुनाथा । परब्रह्म सनातना ॥२॥ |
तुझे चरित्र अगाध । केवी
व...र्णू मी मतिमंद । परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे ॥३॥ |
तुझ्या गुणांचे वर्णन । करिता
भागे सहस्त्रवदन । निगमागमासहि जाण । नसे पार लागला ॥४॥ |
तुझे वर्णावया चरित्र । तुजसम
कवी पाहिजेत । तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे ॥५॥ |
वर्णिता समर्थांचे गुण । नाना
दोष होती दहन । सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि ॥६॥ |
अक्कलकोटी वास केला । जना
दाखविल्या अनंत लीला । उद्धरिले कैक पाप्यला । अदभुत चरित्र स्वामींचे ॥७॥ |
असो कोणे एके दिवशी । इच्छा
धरोनी मानसी । गृहस्थ एक दर्शनासी । समर्थांच्या पातला ॥८॥ |
करोनिया श्रीची स्तुती । माथा
ठेविला चरणावती । तेव्हा समर्थ त्याते वदती । हास्यवदने करोनी ॥९॥ |
फकिराते देई खाना । तेणे पुरतील
सर्व कामना । पक्वान्ने करोनी नाना । यथेच्छ भोजन देईजे ॥१०॥ |
गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली
नाना पक्वान्ने । फकीर बोलाविले पाच जण । जेवू घातले तयाते ॥११॥ |
फकीर तृप्त होवोन जाती ।
उच्छिष्ट उरले पात्रावरती । तेव्ह समर्थ आज्ञापिती । गृहस्थाते सत्वर ॥१२॥ |
शेष अन्न करी ग्रहण । तुझे
मनोरथ होतील पूर्ण । परी त्या गृहस्थाचे मन । साशंक झाले तेधवा ॥१३॥ |
म्हणे यवन यती अपवित्र ।
त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट । याती मध्ये पावेन कष्ट । कळता स्वजना गोष्ट हे ॥१४॥ |
आला मनी ऐसा विचार । तो समर्थास
कळला सत्वर । म्हणती हा अभाविक नर । विकल्प चित्ती याचिया ॥१५॥ |
इतक्यामाजी साहजिक । कोणी
भ्रमिष्ट गृहस्थ एक । येवोन स्वामीसन्मुख । स्वस्थ उभा राहिला ॥१६॥ |
दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणोन
। भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन । द्रव्य मेळवाया साधन । त्याजवळी नसे परी ॥१७॥ |
त्यासी देखोन समर्थ । म्हणती हे
उच्छिष्ट घे त्वरित । तो निःशंक मनांत । पात्रावरी बैसला ॥१८॥ |
त्यासी बोलले समर्थ । तु
मुंबापुरी जाई त्वरित । सफल होतील मनोरथ । द्रव्यप्राप्ती होईल ॥१९॥ |
स्वामीवचनी भाव धरिला । तात्काळ
मुंबईस आला । उगाच भटको लागला । द्रव्य मिळेल म्हणोनी ॥२०॥ |
प्रभात समयी एके दिवशी । गृहस्थ
निघाला फिरायासी । येऊन एका घरापाशी । स्वस्थ उभा राहिला ॥२१॥ |
तो घरातून एक वृद्ध बाई । दार
उघडोन घाईघाई । बाहेर येवोनिया पाही । गृहस्थ पडला दृष्टीसी ॥२२॥ |
तिने बोलाविले त्याला । आसनावरी
बैसविला । दहा हजारांच्या दिधल्या । नोटा आणून सत्वरी ॥२३॥ |
गृहस्थ मनी आनंदला । बाईते
आशीर्वाद दिधला । द्रव्यलाभ होता आला । शुद्धीवर सत्वर ॥२४॥ |
समर्थाचे वचन सत्य । गृहस्था
आली प्रचीत । वारंवार स्तुती करीत । स्तोत्र गत स्वामीचे ॥२५॥ |
समर्थांचे लीला विचित्र । केवी
वंदू शके मी पामर । ज्या वर्णिता थोर थोर । श्रमित झाले कविराज ॥२६॥ |
कोणी दाता नृपवर । दान कराया
भांडार । मोकळे करी परी शक्त्यनुसार । याचक नेती बांधोनी ॥२७॥ |
षड्रस अन्नाचे ढीग पडले ।
क्षुधित जन तेथे आले । त्यांनी त्यातून भक्षिले । क्षुधा शांत होई तो ॥२८॥ |
स्वामीचरित्र भांडारातून ।
रत्ने घेतली निवडोन । प्रेमादरे माळ करोन । श्रोतयांचे कंठी घातली ॥२९॥ |
श्री स्वामीचरणसरोजी ।
विष्णुभ्रमर घाली रुंजी । अत्यादरे चरण पूजी । स्तोत्र गातसे ॥३०॥ |
इति श्री स्वामीचरित्र सारामृत
। नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । विसावा अध्याय गोड हा ॥३१॥ |
॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥ |
No comments:
Post a Comment