June 17, 2015

अधिक महिन्याची आरती

ओवाळू आरती !  आता पुरुषोत्तम प्रभूला !
नियम व्रते पाळिती ! पावतो सत्वर भक्ताला  !! धृ  !!

दरवर्षाचा दशदिवसांचा ! मळ काढून केला !
अधिक महिना ! तीस दिनांचा ! काळ मेळ बसविला  !!
मंगलकार्ये ! वर्ज्य त्यामधी ! पुण्यकर्म करती !
मलमासाला ! कृष्णकृपेने ! पुरुषोत्तम मानिती !!
अंधाराचा नाश कराया ! दिव्य दीप लाविला !
नियम व्रते पाळिती ! पावतो सत्वर भक्ताला  !! १  !!

गुण सुंदरिला ! द्रौपदीला अन चंद्रकलाराणीला !
अधिकमासव्रत ! पुण्याईने ! प्रसन्न प्रभू झाला !
स्नान, दान , जप ! मौन भोजने कुबुद्धी सारावी !
दुर्व्यसनांचा ! त्याग करावा ! चैन सर्व सोडावी !
निर्मळ गुरुजी पुण्यप्रद हा ! मार्ग दावी सकला !
नियम व्रते पाळिती ! पावतो सत्वर भक्ताला  !! २  !!

( अधिकमास महात्म्य  पुस्तकातून साभार )

ज्यांना या पुस्तकाची पीडीफ कॉपी   पाहिजे असेल त्यांनी कृपया  a.kelkar9@gmail.com वर संपर्क करा
संकलन : अमोल केळकर 

No comments:

Post a Comment