June 30, 2015

अभंगवाणी - कानडा राजा पंढरीचा


कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा

परब्रह्म हे भक्‍तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव, जणु की पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा
गीत-ग. दि. माडगूळकर
संगीत-सुधीर फडके
स्वर-पं. वसंतराव देशपांडे ,  सुधीर फडके
चित्रपट-झाला महार पंढरीनाथ

No comments:

Post a Comment