नित्य वाचे प्रभूनाम गाऊ पांडुरंगी सदा लीन राहू हा फेर जनन मरणाचा चुकविताही ना चुकण्याचा सुखेदु:खे समानच साहू कोणी ब्राह्मण कोणी महार करू नका असा अविचार एकमेकां म्हणू भाऊ-भाऊ सुख दारा घर सन्मान नको वृथाच हा अभिमान प्रभू पायी तनू-ध्यान वाहू
No comments:
Post a Comment