February 29, 2016

गजानन महाराज प्रकट दिन - मानस पूजा

गजानन महाराज प्रकट  दिन - १ मार्च 

मानस पूजा 



February 26, 2016

संकष्टी चतुर्थी

आज संकष्टी  चतुर्थी 🌺
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची  माहिती संकलीत करण्याच्या  उद्देशाने चालू केलेल्या   या लेखन मालेच्या  पाचव्या  भागात  आज आपण माहिती घेऊ  सांगलीच्या पटवर्धन संस्थानच्या गणपतीची :-📝🙏
सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै.आप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर इ.स. १८४३ साली बांधले. " श्री गणपती " हे सांगली संस्थानचे आराध्य दैवत असून सांगलीकर नागरिकांचेही श्रध्दास्थान आहे.
कृष्णा काठावर असलेले एक दुमदार गांव म्हणजे सांगली ! पूर्वीचं एक छोटे संस्थान असलेले हे गांव आज महानगरीत रूपांतरित झाले आहे. गांव मोठं झालं, त्यातील श्रध्दासुध्दा अधिक गतीने विकसित होत आहेत.
सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान / राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं. अन् त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला. सांगलीची त्यावेळची वस्ती एक हजार होती. आज काही लाखांत झाली आहे.
पटवर्धन घराण्याचं मूळ दैवत गणपती ! त्यामुळे संस्थान स्थापनेबरोबरच गणपती मंदिर बांधण्याची कल्पना साकारू लागली. मिरज संस्थानातून विभक्त होताना श्रीमंत आप्पासाहेबांजवळ ताम्र धातूची सिहांसनारूढ धातूची गणपतीची मूर्ती होती. ``संस्थान चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होऊ देत. मी तुझी एका मंदिरात प्रतिष्ठापना करेन `` असा विश्वास या मूर्तीसमोर व्यक्त करून संस्थानची उभारणी सुरू झाली. सध्याच्या माळबंगल्यातील " स्वानंद भुवनाजवळ"  गणपती मंदिर बांधण्याचे निश्चित झाले होते. पण तेथे पाण्याची कमतरता आहे हे दिसून येताच, पाण्याची मुबलकता असलेल्या कृष्णाकाठावर गणपती मंदिर स्थापण्याचे निश्चित झाले.
कृष्णानदीचा परिसर सुंदर ! पाण्याची मुबलकता ! पण नदीकाठावर नेहमी पुराचा धोका अन् गाळाची जमीन त्यामुळे मंदिराचे बांधकामात वेगळाच विचार करावा लागला. गाळ मातीवर मंदिर उभारणी करताना प्रथम खोलगट भाग वाळू आणि चुन्याने भरून काढला आणि प्रत्यक्ष मंदिराचे बांधकाम भक्कम अशा पायावर केले गेले. त्यामुळे पूर्वी सांगलीत पुराचे पाणी जरी शिरले तरी मंदिर उंचावर बांधल्यामुळे पुराचा धोका राहिला नाही.
संस्थान निर्मितीनंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे १८११ मध्ये गणपती मंदिराच्या बांधकामास सुरूवात झाली. यापूर्वी गणेशदुर्ग या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम १८०४-०५ मध्ये सुरू झाले असल्यामुळे बांधकाम साहित्याबद्दल चोखंदळपणे चौकशी झाली. नदीकाठावरील मंदिर भक्कम असावे यासाठी गणपती मंदिर बांधकामासाठी ज्योतिबाचे डोंगरावरून काळा कठीण दगड आणला गेला. मंदिर बांधकाम ३०-३२ वर्षांत झाले. गणपती मंदिराचे आवारात मध्यभागी प्रशस्त असे श्री गजाननाचे मंदिर बांधले असून बाजूला श्री चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरीदेवी, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे बांधली आहेत. यामुळे या रम्य परिसरात ``गणपती पंचायतन``, असा सहसा न दिसणारा एक मनोहारी अविष्कार साकारला गेला आहे. या पाचही मंदिरातील देवांच्या मूर्ती शुभ्र संगमरवरी आहेत. पुण्याचे  चिंतामण दीक्षित यांच्याशी विचार विनिमय करून मूर्तीबाबतचे सर्व तपशील, मूर्ती कशा असाव्यात ठरविण्यात आले. स्थानिक कारागीर, मुकुंदा आणि भिमाण्णा पाथरवट यांनी अतिशय कौशल्यपूर्णरीत्या मूर्ती साकारल्या. मूर्तीच्या सिंहासनासाठी सोने, चांदी, पंचरत्ने इ. मौल्यवान गोष्टी वापरल्या आहेत. १८४४ मध्ये चैत्र शुध्द १० शके १७६९ या दिवशी गणपती मंदिर `अर्चा ` समारंभ अतिशय थाटात संपन्न झाला. अनेक शास्त्री पंडितांना मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित केले होते. पाचही मंदिरात अतिशय धार्मिकतेने आणि राजवैभवाच्या दिमाखात मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. पूर्वी आप्पासाहेबांजवळ जी ताम्रमूर्ती गणेशाची होती तिचीपण शेजारीच स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे गणपती मंदिराची स्थापना झाल्यावर राहिलेली कामे अधूनमधून चालूच होती.
 ८ मार्च १९४८ ला सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. यानंतरही दुसर्‍या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धनांनी मंदिराच्या सभामंडपाचे व भव्य अशा महाद्वाराचे काम पूर्ण केले.
गजानन मंदिरात अष्टखांबी विशाल सभा मंडप असून गणपतीचा गाभारा काळया गुळगुळीत ताशीव दगडापासून बनविलेला आहे. मंदिरात श्री गजाननासमवेत ऋध्दीसिध्दींनाही पूजेचा मान मिळालेला आहे. सभामंडपात मध्यभागात असंख्य लोलकांचे झुंबर आहे. सभोवताली हंड्या तसेच अनेक फोटो विराजमान झाले आहेत.
सांगलीकर राजेसाहेबांनी `श्री गणपती पंचायतन संस्थान ` हा खाजगी ट्न्स्ट स्थापन केला. या ट्न्स्ट मार्फत नित्यनेमाने व पारंपारिक पध्दतीने मंदिरातील सर्व पूजा अर्चा होत असते. मंदिरात रोज सकाळी काकडआरती, सूर्योदय व सूर्यास्तानंतर एक तासाने आरती, शेजारती आणि मंत्रपुष्प असतो. पहाटे चौघडा सनईचे साक्षीत गायन असते. प्रत्येक महिन्यात विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शिवरात्र, शुध्द सप्तमी, शुध्द अष्टमी, शुध्द चतुर्दशी या सहा तिथींना छबिना असतो. पूर्वी मंदिराकडे अठरा हत्ती होते. 
एकूणच गणपती मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असून पूर्वीपासून तेथे स्वच्छता अन् मंगलमय वातावरण असल्याने मंदिर अतिशय प्रसन्न वाटते. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, राजस्थानी लाल-गुलाबी पाषाणापासून साकारल्याने मंदिराची शोभा अधिकच वाढविते.
मधेच काही काळ मंदिराचा परिसर काहीसा उदासवाणा दिसू लागला होता. जुन्याची डागडुजी करून मंदिर पूर्वीच्याच श्रध्देने सर्वांना बोलावित होतं. २००२ वर्ष उजाडलं ! अन् मंदिराचे नव वैभव अधिक तेजाळून निघाले. श्रीमंत विजयसिंह पटवर्धन यांनी कार्यबाहुल्यातून वेळ काढून सांगलीकडे दृष्टिक्षेप टाकला अन् पाहता पाहता मंदिर नवतेजाने उजळू लागले. पूर्वीच्या जुन्या झालेल्या वास्तूत नवलाईचा हात फिरू लागला. जुन्या पडक्या झालेल्या इमारतीचे जागी नवीन बदल साकारू लागले. सर्व परिसरालाच एक नवं चैतन्य लाभले. आता संकष्टी आणि वर्षातील सर्व सण समारंभाचे वेळेस मुख्य मंदिरातील फुलांची आरास सर्वांंची नजर खेचून घेते. मंदिराच्या आवारात कापडी मंडप, छत, स्वच्छता, कामगारांची नियुक्ती आणि नारळ वाढविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था झाल्याने सभामंडप अधिक देखणा झाला आहे. दर्शनासाठी स्त्री - पुरूषांसाठी स्वतंत्र ओळी तयार केल्याने सर्वांनाच दर्शनाचा उत्तम लाभ होतो. सुविधा केल्या आहेत. मंदिराच्या आवारात पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय इ. सोयी असून रोज अन्न छत्र चालू केले आहे त्यामुळे गरजूंची चांगली सोय झाली आहे. सर्व मंदिराचे कळसाचे रंगकाम केल्याने मंदिराला नवरूप प्राप्त झाले आहे. तसेच दर्शनी भागात रंगीत कारंज्याची रोेषणाई अन् पुष्करणी निर्माण केल्याने पूर्वीचा हा काहीसा उदास वाटणारा परिसर नवतेजाने उजळून निघाला आहे. आवारात सुंदर बाग, पाठशाळा, हेरंब कार्यालय, अशा सुविधा पण आहेत. मुंबईतील सिध्दी विनायक मंदिर व बालाजी मंदिराप्रमाणे इंटरनेटवरून मागणी केल्यास दर्शन, प्रसाद इ. सुविधा पुरविण्याचा ट्न्स्ट विचार करीत आहे.
पूर्वीपासूनच गणपती मंदिर हे सर्व जातीच्या लोकांना आपले श्रध्दास्थान वाटत असल्याने, मंदिराचा झालेला कायापालट पाहून सर्वांनाच आनंद होत आहे.


---प्रा. सौ. सरोज गोळे, विश्वस्त ज्ञानदीप फौंडेशन, सांगली
---- संकलन  अमोल 📝
For blog article on whatsapp contact on 9819830770

February 24, 2016

संग्रहीत माहिती - शनी - मंगळ युती


संग्रहीत माहिती  - शनी  - मंगळ  युती
तरुण भारत : - खजाना पुरवणी  २४/२/२०१६

For blog article on whatsapp contact on 9819830770

February 18, 2016

श्री गजानन विजय अध्याय - ध्वनीफीत - 2,3,4

  श्री गजानन विजय अध्याय  २  - ध्वनीफीत 
श्री गजानन विजय अध्याय  ३
श्री गजानन विजय अध्याय  ४
                                               

February 17, 2016

गजानन विजय अध्याय १ - ध्वनीफीत

गजानन विजय अध्याय १ -  ध्वनी फीत  इथे ऐका
 whatsapp वर ही ध्वनीफीत पाहिजे असल्यास संपर्क करा  9819830770



February 16, 2016

श्री गजानन विजय सर्व अध्याय एकत्रित स्वरूपात

श्री गजानन  विजय सर्व अध्याय  एकत्रित स्वरूपात 

अध्याय १ 

अध्याय   

अध्याय  

अध्याय  

अध्याय

अध्याय

अध्याय

अध्याय

अध्याय

अध्याय १०

अध्याय ११ 

अध्याय १२

अध्याय १३

अध्याय १४
अध्याय १५

अध्याय १६

अध्याय १७

अध्याय १८ 

अध्याय १९ 

अध्याय २० 

अध्याय २१ 

" गण गण गणात बोते " 

February 15, 2016

लेखन वर्तमान पत्रात छापून येईल का?



आज  एका वर्त्तमान पत्रासाठी  लेख पाठवला . मार्च महिन्यात लेख छापून  येणे अपेक्षित आहे . एक अभ्यास म्हणून   आपला लेख छापून  येईल का हा प्रश्ण  सोडवायचे ठरवले . 

जेंव्हा मनात हा प्रश्ण  आला  तेंव्हाची रुलिंग कुडली पाहिली  ( १५ फेब्रुवारी २०१६ ,  प्रश्ण मनात यायची वेळ  १० वाजून ३५ मिनिटे  ). सकाळी १०.७ ते १२.० पर्यंत मेष  लग्न आहे . मनात प्रश्ण आला त्यावेळची  ( १०. ३५वा )  ची नवमांश कुंडली काढली तर वृषभ रास  नवमांश नवमांश कुंडलीत लग्नी येईल 

आता नियम वापरू,
 नवमांश कुंडलीतील  तृतीयेश
( लेखनाचे स्थान )  प्रश्ण वेळच्या कुंडलीत  लाभ स्थानाचा कार्यश असेल तर  लेख छापून येईल  , तो  तृतीयेश  वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असायला नको 
इथे नवमांश कुंडलीचा  तृतीयेश ' चंद्र  '  त्याचे कार्येशत्व पाहू 



चंद्र ( रविच्या  नक्षत्रात  ) -  २, ४ ( ५, ११ ) , ८  
रवि वक्री कधीच नसतो 
इथे चंद्र  लाभ स्थानाचा  बलवान कार्येश आहे त्यामुळे लेख छापून यायला हरकत नाही 

बाकी परमेश्वराची ( आणि त्या वृत्तपत्राच्या संपादकांची ) मर्जी 

अर्थात उत्तर बरोबर आलं आहे  का चुकीच हे नक्कीच सांगू  

धन्यवाद 

February 13, 2016

- संक्षीप्त शनी महात्म्य


 ज्याना साडेसाती आहे, शनी महादशा आहे त्यांनी दररोज  आणि  इतरांनी  दर शनिवारी आवर्जून  वाचावे 


श्री गणेशाय नमः
उज्जयनी या नगरमध्ये जो विक्रम राजा
न्याय नीतीने राज्य करी तो आनंदी हि प्रजा
अशाच एके समयी त्याने पंडित पाचारुनी
ग्रहश्रेष्ठ तो कोण असे? मज सांगावे ज्ञानी
रवि ग्रहाची पूजा करिता विघ्ने ती पळती
आधिव्याधि नि दरिद्र दु:खे त्या स्मरता शमती 
सोमाची ती ताकद भारी पोषी वनराजी
शंभूच्या तो भाळी विलसे नच कोणा गांजी II
मंगळ ग्रह तो क्रूर परंतु पुजकास मानी
दु :खे निरसुनि  वाचवी दीना द्रव्या देउनी II 
बुध ग्रहाचा प्रताप मोठा सर्व ग्रह माजी
विघ्ने पळती मुळापासुनी जो मोदे पूजी I 
गुरु ग्रहाची फार थोरवी प्रिय पूजकासी
शुक्राचे ते पूजन करिता भाव दु:खे नाशी II 
पंडितांनी सर्व ग्रहांची तारीफ ती कथुनी
शनिदेवाचे वर्णन करता रायाचे कानी II 
शब्दची पडले शनि देवाची दृष्टी पितयावर
पडता भरले क्षणात त्याच्या कुष्ठची अंगावर II 
सारथी होता तोही झाला क्षणात पांगुळा
अश्वाचे ते डोळे जाऊन झाला घोटाळा II
वाक्य ऐकुनी नृपतीने त्या टाळी वाजवली
शनि देवाची हसून त्याने टवाळीच केली II 
त्याच वेळी विमानातुनी जाता शनिराजा
खाली उतरले पाहता विनये कर जोडी राजा II 
हात जोडूनी शनिदेवाला वदला तो नृपती
तुम्हा निंदिले क्षमस्व न धरा राग मजवरती II 
बोल ऐकुनी शानिश्वराना राग बहु आला
बारावा मी आलो आता कन्या राशीला II 
चमत्कार हा तुला दाखवीन क्षणात एका मी
रूप पालटूनी शनिदेव आले कथा असे नामी II 
वारू विकाया आणले त्यांनी उज्जयनी नगरा
अबलख वारुवरी बैसला विक्रम राव खरा II 
टाच मारीता  वारू गेला जैसा कि वारा
दाट वनी  त्या नृपतीने धरला कि आसरा II 
वारू गुप्त तो होता नृपती निद्रिस्तचि झाला
प्रभात होता तामालीन्द्पूर या नगरा गेला II 
तामालीन्द्पूर नगरामध्ये  वैश्याची तनया
मोहित झाली विवाह करण्या पाहुनी तो राया II 
हेतू आपुला कथुनी मुलीने बाबांच्या कानी 
द्यावे धाडुनी अतिथीला त्या इच्छा-वर म्हणुनी II 

आज्ञे परी तो अतिथी गेला पुत्रीच्या महाली 
मध्यरात्रीला आरती घेउनि आली ती बाळी II 
शनिदेवाच्या मायेने तो निद्रीस्ताची झाला 
मान वळवूनी पाहीना तो वैश्य कन्यकेला II 
भिंतीवरच्या चित्रामधल्या निर्जीव हंसाने 
खुंटीवरचा मौक्तिक हारची गिळला प्रेमाने II 
राती सौख्य ते नसे लाभले वैश्य कन्यकेला 
चोरी करुनी अतिथिने त्या हर पहा नेला II 
वैश्याने मग अतिथीला त्या नेले बांधुनिया 
राया करवी हात पाय ते दिधले तोडूनिया II 
कर-चरणाविन दीन कष्टला राया तो भारी 
उज्जायनीची तेलीण चाले तमालिंद नगरी II 
तिने पहिले नीजनृपतीला दया बहु आली 
तेल-घाणीवर नेते यांना विनंती हळू केली II 
सदय होऊनी दिली मान्यता चंद्रसेनानी 
तेलीणिची विनयशील ती विनंती ऐकुनी II 
घाण्यावरती नृपतीने तो दीप राग म्हणता 
दीप उजळले नगरामध्ये ते हा हा म्हणता II 
राग ऐकुनी पद्मावती ती प्रसन्न मनी झाली 
विवाह करण्या विक्रमासवे ती उत्सुक झाली II 

इतुक्या अवसरी शनिदेव ते आले त्या स्थानी 
पाद- हस्त  अन दिव्य तेज ते दिधले तोषोनी II 
शनिदेव ते प्रसन्न झाले राव विक्रमाला 
इच्छावर तो मागून घेण्या सांगितले त्याला II 
भूपति बोले गांजू  नको तू मनुष्यप्राण्याला 
हीच विनंती मनापासुनी केली देवाला II 
वाक्य ऐकुनी राजाचे श्री शनिदेव वादती 
परपीडेच्या   कष्टाची तुज जाण असे पुरती II 
विक्रमासी हास्यविनोदे शनिदेव वदले 
दानव देवा छळले भारी, तुज थोडे छळले II
देव दैत्य ते कसे गांजिले श्रवण करी राया 
प्रातः काळी  वाकून केले नमनचि गुरुराया II 
हात जोडूनी विनंती केली श्रीगुरुनाथाला 
साडेसात वर्षे येतो तुमच्या राशीला II 
शानिदेवाचे बोल ऐकुनी गुरुदेव म्हणती 
साडेसात वर्षे येत होईल दीन स्थिती II 
सव्वा प्रहरचि यावे म्हणुनी सांगितले गुरुनी 
बोल गुरुचे मान्यचि केले श्री शानिदेवानी II 
वाक्य ऐकुनी गुरुदेवांनी विचार मनी केला 
स्नान संध्यादि कर्मामध्ये दवडीन हि वेळा !!
स्नान करुनी गंध लावूनी दिसता गुरुराजे 
फकीर वेषे येउनि शनिने दिधली खरबुजे II 
तीच खरबुजे पंचामध्ये बांधुनी श्रीगुरूनी 
रस्ता धरला नगराचा झणी मोठ्या हर्षानी II 
त्या नगरीचे राजपुत्र अन प्रधानपुत्र वनी 
शिकारीस ते गेले होते दो घोडयावरुनी II 
प्रहर झाला तरी नाच आले म्हणुनी रायानी 
धुंडायासी सैन्य धाडिले बघ रानोरानी II 
सैन्य निघाले तोच पहिला विप्र एक त्यांनी 
झोळी होती हाती त्याच्या घेतली काढोनी II 
झोळी बघता त्यात निघाले शिरकमळे दोन्ही 
प्रधान राजपुत्राची ती घेतली काढोनी II 
शिरकमळे ती विप्रासहितचि राजाच्या महाली 
विप्र कृती ती यथासांग मग त्याला ऐकवली II 
राजाने मग आज्ञा केली द्यावे सुळी याला 
म्हणुनी सेवके लोखंडाचा सूळ उभा केला II 48
विप्राला त्या घेउनि जाता नगराबाहेरी 
विनंती केली देऊ नका सुळी सव्वा प्रहर तरी II 
विप्राला त्या घेउनि जाता विप्र काय बोले 
अपराधी मी नसे मुळी मज शनिने गांजीयले II 

एक प्रहर मज वाट बघुनी द्यावे झणि फाशी 
म्हणुनी लागला विप्र सविनये सेवक-चरणाशी II 
विप्रवचन ते श्रवण करुनी राज्यासेवकांनी 
मान्यची केले बोल तयाचे मोठ्या प्रेमानी II 
हा हा म्हणता सव्वा प्रहरचि निघोनिया जाता 
राजपुत्र अन प्रधानपुत्रही आले अवचीता II 
त्यांना पाहुनी रायाने मग विप्र पाचारुनी 
द्रव्य देऊनी सोडविले त्या वंदनही करुनी II 
शनिदेवाच्या मायेने मी कष्ट दिले फार 
म्हणुनि लोळला तोच नृपती गुरुचे पायावर II 
झोळी काढुनी पाहता ती खर्बुजेच होती 
शिरकमळांची लुप्त जाहली क्षणात आकृती II 
शानिदेवानी नमन करुनी श्री गुरुदेवाना 
प्रश्नचि केला कशा भोगिल्या दारूण त्या यातना II 
गुरु बोलले शनिदेवा तू ग्रहात श्रेष्ठ खरा 
सव्वा प्रहारामध्ये  माझा केला मातेरा II
सत्वर जाऊनी  शनिदेव ते शंभू चरणासी 
जाऊन वदले येतो स्वामी तुमच्या मी राशि II 
बोल ऐकुनी शंभूराजा लपला कैलासी 
काय आपुले केले वदले श्रीशानिदेवासी II 
धाक त्रिभुवनी असता तुमचा कैलासी लपला 
प्रताप माझा पाहुनी तुम्ही भयभितचि झाला II 
आला जेव्हा शनिग्रह तो दशरथ-पुत्राला 
चौदा वर्षे दारूण त्याने वनवास भोगियला II 
तसाच येता श्रीशानिराजा सीतामाईला 
लंकेशाने कपात करुनी नेले लंकेला II 
बारावा तो आला जेव्हा लंकाधीशाला 
सरळचि  झाले नवग्रहचि तो  मुकला प्राणाला II 
बारावा तो आला जेव्हा हरिश्चंद्र राया 
डोंबा घरी तो कुमार विकला तशीच ती जाया II 
कपटाने ती पहा भोगिली गौतमाची जाया 
पापाने इंद्राची झाली रूपहीन काया II 
नळराजाची  प्रिय पत्नी जी दमयंती मानी 
विरह करविला प्रेमाचा त्या ताटातूट करुनी II 
गुरुपत्नीसी कपटे धरता कलंक चंद्राला 
वसिष्ठासी तो येता  गेले सुत-शत स्वर्गाला II 
पंडूसुतांना  पीडा होता वनवासी झाले 
श्रीकृष्णाला स्यमंतकाचे लांछनही लागले II 
विक्रमाला पाहुनी वदला वैश्य दीन वाणी 
अज्ञानाने केली तुमची छळणूक रायानी II 
एक देश तो राये दिधला मोदे वैश्याला 
वैश्याने हि कन्या अर्पुनी दुवाच जोडीयला II 
चित्रीच्या त्या हंसाने जो हर पहा गिळला 
तसाच त्याने पहा पुनरपि मोदे उगळीला II 
हार  उगळीता विस्मय वाटे साऱ्या जनतेला 
हात जोडूनी वंदन करिती श्री शनि देवाला II
प्रेमाने त्या विक्रम न्रुपतिसि चंद्रसेन वदला 
आपण कुठले ? वंश कोणता ? सांगा हो मजला  II
प्रश्न ऐकता विक्रम बोले काय चंद्रसेना 
विक्रम माझे नाव असे मी उज्जैनीचा राजा II 
चंद्रासेनाने आपली कन्या मोदे देवोनी 
त्या राजसी सख्य जोडले भाक्तीप्रेमानी II 
राजाची त्या शनि-प्रसादे साडेसाती गेली 
राव पाहुनी उज्जैनीची प्रजा सुखी झाली II 
श्री शनि-प्रभूचे वर्णन केले शनिश्वरा नमुनी 
शब्दही सोपे भाषा सुंदर मांडीयली कविनी II 
नित्य प्रभाती व शनिवारी करी पठण त्याला 
देव शनि तो देईल द्रव्या कीर्ती वैभवाला II 
वर्षे साडेसात शनीची पीडा ज्या होते 
प्रसन्नचि मने वाचन करिता दैन्य लया जाते  II
सप्रेमे हि काव्य मालिका पुष्पकांतांनी 
नम्रत्वाने अर्पण केली मातेच्या चरणी  II
-( संग्रहीत )


सदर शनी महात्म्य  whatsapp  पाहिजे  असल्यास अवश्य संपर्क करा
9819830770  

February 11, 2016

ब्लोगवर प्रकाशित लेख Whatsapp वर


' देवा तुझ्या द्वारी आलो ' या  ब्लोगवर  प्रकाशित होणारे  लेख /  स्तोत्र / इतर  धार्मिक  माहिती  आता

Whatsapp वर  मिळवण्यासाठी  खालील फार्म  भरून द्यावा



अमोल केळकर
 सीबीडी बेलापूर
नवी मुंबई ९८१९८३०७७०
a.kelkar9@gmail.com

गणेश महामंत्र




whatsapp वर हा व्हिडिओ  पाहिजे असल्यास अवश्य संपर्क करा 
9819830770

February 10, 2016

शनी - मंगळ युती

शनी - मंगळ युती  संकलीत माहिती  
( खजाना पुरवणी तरूण भारत - १०/०२/१६
विनायका हो सिद्ध  गणेशा : -


--------------------------------
whatsapp वर हा व्हिडीओ  पाहिजे असल्यास  9819830770 या नंबरावर  मेसेज करा 

February 9, 2016

गणेश नामावली - गणेश जयंती विशेष


सदर चित्रफीत ज्यांना Whatsapp वर पाहिजे असेल त्यांनी 9819830770  या नंबरावर संपर्क करावा 

February 8, 2016

काही उपयुक्त धार्मिक मोबाईल ऐप्लीकेशन्स -

काही उपयुक्त  धार्मिक मोबाईल  ऐप्लीकेशन्स

इथे काही मला आवडलेली आणि गुगल प्लेवरून उतरवून घेतलेली  काही उपयुक्त  धार्मिक मोबाईल  ऐप्लीकेशन्स इथे देत आहे 

१) गणेश मंत्र  - 
ॐ गं गणपतये नमो नम : ! श्री सिध्दीविनायक नमो नम : ! अष्टविनायक नमो नम : ! गणपती बाप्पा मोरया !!

हा मंत्र असलेल app download करण्यासाठी  Ganesh Mantra असे टाईप करा आणि खालील चित्रात दाखवलेले app , google play store वरून  डाऊन लोड करा