April 25, 2016

संकष्टी चतुर्थी



संकष्टी चतुर्थी - २५/४/२०१६

वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या सातव्या भागात आज आपण माहिती घेऊ पुण्यातील तळ्यातल्या गणपतीची ( सारसबाग गणपती )

पुण्यातील सारसबागेतील तळ्यात सवाई माधवराव पेशवे यांनी 17 व्या शतकात थेऊरच्या उजव्या सोंडेच्या गणपतीची प्रतिकृतीची प्रतिष्ठापना केली होती. तोच हा 'तळ्यातला सिद्धिविनायक'. आता हा गणपती पुणेकरांचीच नव्हे; तर अवघ्या महाराष्ट्रची ओळख झाला आहे. पेशवेकालीन मूर्ती कालांतराने भंगल्याने दोनदा नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पर्वतीच्या पायथ्याशी सारसबाग आहे. या बागेत सुमारे अडीचशे वर्षांपासून हा उजव्या सोंडेचा चिंतामणी विराजमान आहे. मंदिर आकर्षक आहे. मंदिराच्या सभामंडपात गेल्यागेल्याच मनमोहक श्री सिद्धिविनायकची मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेते. हिवाळयात अवघे पुणे थंडीने गारठलेले असते. सारसबागेतील आपल्या लाडक्या सिद्धिविनायकला थंडी वाजू नये, म्हणून स्वेटर घालण्यात येते. हे या गणपतीचे वैशिष्‍ट्य म्हणावे लागेल.

मंदिर परिसरातून जाताना हात जोडल्याशिवाय पुणेकर पुढे जाऊच शकत नाही. मंदिर परिसर पाना फुलांनी नटलेला आहे. रम्य अशा वातावरणामुळेही या मंदिरात कायमच भक्तांची गर्दी असते. सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे.श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी १७५०  साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तीन वर्षे या तलायाचे काम चालले. तलाव तयार झाल्यानंतर नौकाविहारासाठी त्याचा उपयोग करण्यात येत होता. त्यानंतर तलावात सारस पक्षी सोडले गेले. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५ हजार चौरस फुटाचे बेट तयार करून तो मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आला. त्यानंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक 'सारस बाग' असे नामकरण केले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. तोच हा 'तळ्यातला गणपती'.

पुण्याच्या सारसबागेतील गणेश मंदिरामागे असलेले 'गणेश दर्शन संग्रहालयाला' जरूर भेट द्यावी. तेथे श्रीगणेशाची शेकडो रूपे आपणास पाहावयास मिळतील. या संग्रहालयातील गणेशरूप मोठे आव्हानात्मक व मोहविणारे असे आहे. पाषाण, माती (मृत्तिका) याचबरोबर रुईचे (मंदार) खोड, चंदनाची मूर्ती, पोवळे, यासह मध्ययुगात हस्तिदंती, काष्ठशिल्प, आदींसह आधुनिक युगात पारदर्शक काचेच्या मूर्ती, फायबर, प्लास्टिक, तांदळावर कोरलेला आदी अनेक प्रकारात गणेशमूर्ती पाहावयास मिळतात..

माहिती : संकलीत 

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी भेट  द्या 






For blog article on whatsapp contact on 9819830770

श्री रामनवमीच्या शुभेच्छा

प्रभू श्री रामचंद्र की जय 





For blog article on whatsapp contact on 9819830770

April 9, 2016

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन

आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन - 
ऐकूयात श्री स्वामी समर्थ  महामंत्र 





For blog article on whatsapp contact on 9819830770