May 28, 2016
May 27, 2016
May 26, 2016
May 25, 2016
संकष्टी चतुर्थी - टेकडी गणेश , नागपूर
संकष्टी चतुर्थी - २५/५/२०१६
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या आठव्या भागात आज आपण माहिती घेऊ नागपूर मधील टेकडीवरच्या गणपतीची
प्रत्येक गावाची ग्रामदेवता असते. नागपूरचे दैवत म्हणजे टेकडी गणेश. नागपूरचा हा गणपतीही खरं तर वरद विनायक पण, तो ओळखला जातो तो टेकडी गणेश म्हणून. नागपूरच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी टेकडीवर ही गणेशमूर्ती आहे. सध्याचे मंदिर अलीकडचे असले तरी मूर्ती प्राचीन आहे. नागपुरात रेल्वेने आले की आधी दर्शन होते ते या गणेशाचे. मुख्य रेल्वे स्थानकापुढील टेकडीच्या उतारावर हा गणाधीश आहे.
संकट निवारक
नागपूरचा आद्य गणपती अशी टेकडी गणेशाची ओळख आहे. मनोकामना पूर्ण करणारा, इच्छित फल देणारा, संकट निवारक अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती आहे
उजव्या सोंडेची बैठी मूर्ती
शुक्रवार तलाव आज मंदिरापासून बराच दूर आहे. पण एक काळ असा होता की, हा तलाव मंदिराच्या पायथ्यापर्यंत होता. भोसले राजे नौकेतून गणेश दर्शनासाठी येत. टेकडीवर भोकरीच्या झाडाखाली ही मूर्ती उघड्यावर होती. याठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते, परंतु मुस्लिम राजवटीत ते उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही दिसतात. मंदिराच्या आसपास वड-पिंपळाची झाडे आहेत. त्यामुळे परिसर निसर्गरम्य वाटतो. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून संपूर्ण मूर्ती पूर्वी स्पष्ट दिसायची. आता शेंदुराच्या पुटांमुळे हे काही दिसत नाही. बैठ्या स्वरूपाची ही मूर्ती साडेचार फूट उंच व तीन फूट रूंद आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे.
१२व्या शतकातील मंदिर
नागपूरचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. येथे नाग नदीच्या परिसरात छोटी गावे होते. त्यांना टोली म्हणायचे. आजही नागपुरातील अनेक वस्त्यांची नावे, कुंभारटोली, मरारटोली अशी आहेत. सीताबर्डी भागात गवळ्यांची टोली होती. या टेकडीवर महादेवाची तसेच काही गणपतीची मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. आजही टेकडीवर टेकडी गणेशसह फौजेचा गणपतीही आहे. सीताबर्डी भागात गवळ्यांसह गोसावी लोकही राहायचे. त्यांचे राम अन् हनुमानाचे मंदिर गणेश मंदिराच्या पायथ्याशी आहे. आज प्रसिद्ध असलेल्या टेकडीवरील गणेश मंदिराचा जिर्णोद्धार वाकाटकांच्या आणि नंतर यादवांच्या काळात झाला होता. १२व्या शतकात हेमाद्री पंडितांनी हे मंदिर बांधले होते. हे मंदिर प्राचीन असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे शिलालेख. सध्या हा शिलालेख नागपूरच्या अजब बंगल्यात आहे. हा शिलालेख सीताबर्डीत सापडलेल्या एका कोरीव स्तंभावर लिहिलेला आहे. या शीलालेखावर, जमीन गाई चराईकरिता देवस्थानला दिल्याचा उल्लेख आहे. सहावा विक्रमादित्य याच्या कार्यकाळात तो लिहिला गेला. शके १००८ वैशाख शुद्ध ३ प्रभवनाम संवत्सर असा या शीलालेखाचा काळ दिला गेला आहे.
विविध सामाजिक उपक्रमांमध्ये या मंदिराचा नेहमीच सहभाग राहिला आहे.

माहिती : संकलीत ( महाराष्ट्र टाईम्स
यापूर्वीचे भाग :
भाग १- कसबा पेठ गणपती ( मानाचा पहिला ) , भाग २- तासगावचा गणपती , भाग ३ - दशभूजा गणपती हेदवी , भाग ४ - वाईचा ढोल्या गणपती , भाग ५- सांगलीचा संस्थानाचा गणपती , भाग ६ - टिट्वाळा महागणपती भाग ७ - सारसबाग गणपती
For blog article on whatsapp contact on 9819830770
May 24, 2016
शिर्डीच्या साई बाबांचे - ऑनलाईन दर्शन
शिर्डीच्या साई बाबांचे आपल्या संगणकावरून ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी इथे भेट द्या
( दर्शनाची वेळ ४ ते ११ )
May 23, 2016
कर्दळीवन
-
अस म्हणतात की ही परिक्रमा करणे फार अवघड आहे. नृसिंह सरस्वती इथे गुप्त झाले आणि श्री स्वामी समर्थ इथे प्रकट झाले इतपत जुजबी माहितीच आपणास आहे .
या कर्दळीवना संबंधी माहिती देणारा हा व्हिडिहो यू ट्यूब वर मिळाला
तो इथे माहितीसाठी देत आहे , अवश्य पहा
May 22, 2016
May 21, 2016
May 20, 2016
May 19, 2016
May 9, 2016
दत्तगुरु भोजनपात्र मंदीर
आज पर्यंत सांगलीच्या बाहेर ज्या देवस्थानाचे दर्शन
घ्यायचा योग आला त्यात सगळ्यात जास्त भेट दिलेले देवस्थान असेल
नरसोबावाडी. आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दत्तगुरुंचे दर्शन झाले .
मात्र
आज पहिल्यांदाच शिरोळ जवळील 'दत्तगुरु भोजनपात्र मंदीर येथे जायचा योग
आला ( श्री दत्तप्रभूंच्या हाताच्या ठशांची पूजा होत असलेले
महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण )
याबाबतची आख्यायिका अशी :
दत्तगुरुंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह स्वामी महाराज यांचे १२ वर्ष वाडी
परिसरात तपासाठी वास्तव्यास होते. एकदा ते भिक्षा मागण्यासाठी शिरोळला
श्री गंगाधरपंत कुलकर्णी यांच्या कडे आले . त्यांच्या गृहिणीने
महाराजांसाठी जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या. मात्र कण्या वाढण्यासाठी घरी
पात्र नव्हते . हे जाणून महाराजांनी एक पाषाण आणला त्यावर प्रोक्षण करून
प्रणव) ॐ ) लिहून भिक्षा वाढण्यास सांगितले.
या पाषाणास दुधाचा अभिषेक केल्यानंतर दत्ताप्रभूंच्या हाताचे ठसे स्पष्ट दिसतात For blog article on whatsapp contact on 9819830770
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
For blog article on whatsapp contact on 9819830770
For blog article on whatsapp contact on 9819830770
May 4, 2016
May 3, 2016
देवपूजा
आमचे शालेय मित्र श्री गणेश तकटे यांचा आज वाढदिवस
For blog article on whatsapp contact on 9819830770
त्यांना वाढदिवसानिमित्य अनेक शुभेच्छा
सांगली आणि परिसरात ' अरविंद देवपूजा ' या नावाने त्यांची अनेक दुकाने आहेत
देवपूजेला लागणा-या अनेक गोष्टी एकत्र ( देवपूजेची शोरूम ) ही अनोखी संकल्पना त्यांनी अत्यंत यशस्वी पद्धतीने राबवली आहे
ग्राहकांच्या खरेदीबाबत बदलणा-या निकषांना अनुसरून ' गणेश तकटे' यांनी अनेक बदल केले आहेत . ' अरविंद देवपूजा' हे शोरूम त्यातीलच एक . कोणताही व्यवसाय पुढे न्यायचा तर दर्जा आणि गुणवत्ता बरोबरच मार्केटींगचे योग्य तंत्र आवश्यक आहे हे त्यांचे मत . आज त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक नावाजलेले BRAND वितरणासाठी आहेत . महाराष्ट्रभर त्यांचे वितरक आहेत , नवीन नवीन कल्पना अंमलात आणल्या जात आहेत आणि यासाठी त्यांना त्यांचा भाऊ महेश आणि कुटुंबीय यांचे सहकार्य लाभत आहे
१९८५ साली सुरु झालेल्या एका छोट्या दुकानापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज गगन भरारी घेत आहे .
भारतातल्या प्रमुख शहरात हा व्यवसाय पोहचून ' गणेश ट्रेडर्स ' नावारुपाला यावे हे श्री गणेश तकटे यांचे स्वप्न पूर्ण होवो या यानिमित्याने शुभेच्छा
For blog article on whatsapp contact on 9819830770