July 31, 2016

गोंदवलेकर महाराज प्रवचन ३१ जुलै

गोंदवलेकर  महाराज प्रवचन  ३१ जुलै 

श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!


July 30, 2016

गोंदवलेकर महाराज प्रवचन ३० जुलै


श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!
श्रीराम जय  राम जय जय राम  !! श्रीराम जय  राम जय जय राम  !!

July 23, 2016

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी  २३/७/१६

वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या दहाव्या भागात आज आपण माहिती घेऊ दगडूशेठ गणपतीची

दगडूशेठ गणपती इतिहास 

सन१८९३:-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एकसुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत वसत्यशील प्रस्थ होते.पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथी मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वत: वत्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, ”आपणकाही काळजी करू नका, आपण श्री दत्तमहाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार कराव त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवतेआपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात
जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील”. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मुर्ती बनविली व ती गणपतीबाप्पाची मुर्ती म्हणजेच आपली पहिली मुर्ती होय. ही पहिली मुर्ती आज सुध्दा आपण शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पुजाचालू आहे. ह्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होतीआणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठहलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी,श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई,नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव,नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर,गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे,शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर,नारायणराव दरोडे यासह सर्व थरातीललोकांनी एकत्र येऊन या समारंभाची मंगलज्योत प्रदिप्त केली. तिच्या मंद पणतेजस्वी प्रकाशात आसमंत उजळून निघाले.भक्तिची धूप आणि श्रध्देची निरांजन लावून
ही जी पुजा त्यांनी केली त्यास सर्व थोरलोकांनी मनोमन आर्शिवाद दिले आणिअशा रितीने ही मंगल परंपरा सुरू झाली.श्रींची पहिली मूर्ती अकरा मारुती चौक येथे आहे.
सन १८९६ :-
सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन१८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मुर्ती तयार करण्यात आलीव तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू त्यांनी निर्माण केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी, तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढेसुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती कै. श्री.दगडूशेठ हलवाई बाहूलीचा हौद, सार्वजनिकगणपती म्हणून प्रचलित होता
दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत. त्यावेळी ऐन तारुण्यात असलेले तात्यासाहेब गोडसे हे ह्या गणेशोत्सवाचे एक उत्साही कार्यकर्ते होते. नंतरच्या काळात जेव्हा लोकमान्य टिळकांनी, स्वातंत्र्य-चळवळीसाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजिनिक उत्सवाचे स्वरूप दिले, तेव्हा दगडूशेठ गणपतीला पुण्यातील सर्वाधिक लोकप्रियतेचे आणि आदराचे स्थान मिळाले.
१९५२ साली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर-उत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तात्यासाहेब आणि त्यांच्या मित्रमंडळींवर येऊन पडली. तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मंडळींनी हा उत्सव अत्यंत चोखपणे पार पाडला. आणि त्यानंतर ह्या मंडळाने कधी मागे वळून पाहिलेच नाही! भक्तांनी आणि दानशूर दात्यांनी मंदिराच्या फंडासाठी उदारहस्ते देणग्या द्यायला सुरुवात केल्यावर तात्यासाहेब आणि त्यांचे मित्र यांना वाटू लागले की ह्या पैशांतून आपल्याच बांधवांची सेवा करण्याहून अधिक मोठी ईश्वर-सेवा काय असू शकणार?
लौकरच ह्या ध्येयवेड्या तरुण कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या कार्याची व्याप्ती पारंपरिक पूजाअर्चेच्या पलिकडे नेऊन सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. मंदिरातले धार्मिक विधी थाटामाटाने साजरे करत असतानाच या तरुणांनी आपल्या राज्याच्या सामाजिक व राजकीय प्रश्नांकडे लक्ष वळवले.
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट्च्या अखत्यारीत त्यांनी कितीतरी सामाजिक कार्यांचा प्रारंभ केला. वंचित मुलांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत, छोटे उद्योगधंदे करू इच्छिणाऱ्यांना किंवा फेरीवाल्यांना सुवर्णयोग सहकारी बँकेमार्फत आर्थिक सहाय्य, वृद्धाश्रम, वीटभट्टी-कामगारांचे पुनर्वसन ही नमुन्यादाखल काही उदाहरणे.
आज श्रीगणेशांच्या आशीर्वादाने ’दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ हा एक आघाडीची संस्था म्हणून समृद्ध झाला आहे. मानवजातीची सेवा हीच परमेश्वराची सेवा या भावनेने काम करण्याचे समाधान मोठे आहे.
माहिती : संकलित 


July 19, 2016

Online गुरुपौर्णीमा

गुरुपोर्णीमा 
सिटी हायस्कुल सांगली , वंदनीय गुरुजन

गुरु पोर्णीमा . गुरु -शिष्याच्या नात्यातील एक महत्वाचा दिवस. या सोहळ्याची  ओळख  साधारणतः प्रत्येकाला शाळेत होतेच . कारण आई - वडिलांनंतर पहिला गुरु प्रत्येकाला  त्याच्या शाळेतच भेटतो .
 शाळेत साजरा केलेला गुरु पोर्णीमेचा दिवस परत करता आला तर ?  या कल्पनेतून सांगलीच्या 
सिटी  हायस्कुल शाळेच्या दहावी ९१ च्या मित्र मंडळींनी आपल्या " मैत्रीचे अनोखे पर्व" 
या  Whatsapp ग्रुपवर online  गुरु पोर्णीमा दणक्यात साजरी केली . अनेक शहारात / देशात  नोकरी, व्यवसाया निमित्य  वास्तव्यास असलेले १०० राहून अधिक  मित्र - मैत्रिणी  ठरल्याप्रमाणे १९ जुलै ला सकाळी ९ वाजता ऑनलाईन जमले . त्याचवेळी शाळेतील गुरुजनांचा एक फोटो  ग्रुपवर टाकण्यात आला आणि मग ओळीने सगळ्यांनी  गुरुजनांना फुले देऊन त्याचे  आशीर्वाद घेतले. याप्रसंगी अनेकांनी आपल्या प्रिय गुरुजनांच्या आठवणी सांगितल्या. 


जुन्या मराठी  चित्रपट कैवारीतील ' गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !  हे गाणे आपल्याच सिटी हायस्कुल ( सांगली)  मध्ये चित्रित  झाल्याची आठवण अनेकांनी सांगितली 

' मैत्रीचे अनोखे पर्व, सोबतीला आपण सर्व ' 
सिटी हायस्कुल सांगली  ,  दहावी १९९१ ( Whatsapp ग्रुप)





For blog article on whatsapp contact on 9819830770

July 14, 2016

राजा पंढरीचा

१५ जुलै आषाढी एकादशी



For blog article on whatsapp contact on 9819830770

July 8, 2016

भारतातील देवळाची माहिती / सहल / पँकेज याची माहिती एकत्रित स्वरूपात


मोक्ष ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड  याच्या कडून  आलेला  इमेल  खाली देत आहे. . त्यांच्या संकेतस्थळावर  भारतातील  देवळाची माहिती  / सहल / पँकेज  याची माहिती    एकत्रित स्वरूपात आहे 
इच्छूकानी त्या संकेतस्थळाला भेट द्यावी 

www.myoksha.com


Myoksha Travels Pvt. Limited

For blog article on whatsapp contact on 9819830770

July 7, 2016

नरसोबावाडी दर्शन


आज गुरुवार . पुढील महिन्यात गुरु कन्या राशीत गेल्यावर  नरसोबावाडीला  कन्यागत पर्व ( १२ ऑगस्ट ) सुरू होईल . यानिमित्याने  नरसोबावाडी  दर्शन 

For blog article on whatsapp contact on 9819830770

July 5, 2016

माझी वारी

विशाखा  फाटक , पुणे  यानी  लिहिलेले  माऊलीच्या  पालखी  सोहळ्याचे  वर्णन  इथे  देत आहे .  वाचता वाचता आपण ही या सोहळ्याशी एकरूप होऊन जातो. आपणास ही आवडल्यास अवश्य कळवा 

ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली  तुकाराम
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम


विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

अखंड सुरु असलेल्या हरी नामाच्या गजरात आम्ही सामील झालो
हे तिसरं वर्षं... मी आणि माझी मैत्रीण जमेल तशी वारी करतोय, एकाच वर्षी आळंदी पासून पंढरपूर पर्यंत नव्हे, पण वारीतला एक एक टप्पा... शनिवार रविवारी असेल तोच टप्पा करायचा असं ठरवलं होतं... आणि योगायोग पहा पुढचे पुढचे टप्पेच आले...
२०१४ ला आळंदी पुणे झालं, २०१५ ला पुणे सासवड चाललो आणि या वर्षी सासवड जेजुरी...
माऊलींच्या कृपेने जण्यायेण्याची सोय अगदी उत्तम झाली , सासवड बस स्थानकापर्यंत गाडीने आलो...
सहा वाजले होते... काही दिंड्या निघाल्या होत्या ... आम्हीही त्यांच्याबरोबर चालू लागलो...
पहाटे ३.३० ला उठले तेव्हाही जोरात पाऊस पडत होता .. नवऱ्याने एकदा काळजीपोटी म्हणून पाहीलं कि cancel झालंय का बघ... पण माझ्या प्रबळ इच्छेपुढे तो बिचारा गप्प बसला...
सासवडला उतरलो गाडीतून तेव्हाही पाऊस होताच... पण अजिबात raincoat ना घालता , डोक्यावर टोपी ना घालता आम्ही चालायला सुरवात केली...
रस्त्याच्या एका बाजूने वारकरी आणि दुसऱ्या बाजूला दिंड्यांचे ट्रक... आम्ही त्यातच सामावून गेलो... पाऊस असल्यामुळे सगळे वारकरी ईरलं घेऊन चालत होते.. डोक्यावर सामानाचं बोचकं आणि त्यावरून ईरलं घेऊन ते भराभरा चालत होते.. आणि खोटं वाटेल किंवा अतिशयोक्ती तरी वाटेल पण शंभर जणांनी तरी विचारलं असेल आम्हाला कि माउली मेणकापड घ्यायचं कि... माउली डोक्यावर तरी काहीतरी घ्यायचं... सर्दी पडसं होईल डोकं भिजलं तर...
हे ना ओळखीचे ना नात्याचे.. पण सगळे इतके मायेने .. आपुलकीने विचारत होते... सगळ्यांना उत्तर देत होतो कि आम्ही एकच टप्पा करणार आहोत ... त्यामुळे भिजत जायचा आनंद घेतोय...
पण यामुळे खूप जणांशी संवाद झाला... थोड्या थोड्या गप्पा मारून आम्ही पुढे जात होतो.
पावसापेक्षाही आम्ही आनंदात, मायेत जास्त भिजत होतो...
बघावं तिकडं माणसंच माणसं... माणसांचा समुद्र... वारकऱ्यांच्या या ओळीची ना सुरवात दिसत होती ना शेवट... सगळे पांढऱ्या कपड्यातले वारकरी... या वर्षी रंगीत इरल्यांमुळे झाकले गेले होते... पांढरी पिवळी लाल चंदेरी सोनेरी... रंगीबेरंगी इरली... खूप मस्त दृश्य होतं हे...
गळयात तुळशी माळ, हाती टाळ... मुखाने हरिनाम म्हणत , भजनं म्हणत एक एक टप्पा पार करत त्या पंढरीच्या सावळ्या विठुच्या दर्शनाच्या ओढीने चालले होते... आम्ही मारे अगदी बूट मोजे सॅक असा जामानिमा करून चालत होतो.. आणि मधेच पाय दुखल्याची जाणीव होऊन विव्हळत होतो, पण हे लोक मात्र फाटक्या तुटक्या चप्पल घालून... काहीजण तर अनवाणी सुद्धा चालत होते.. गात- नाचत होते... फुगड्या खेळत होते... निर्मळ हास्य न प्रेमळ डोळे... कुठून आणत असावेत हे एवढं चालायचं अन वर नाचायचं बळ?
सगळे जण हसत मजेत एकमेकांची चेष्टा करत , अभंग ओव्या म्हणत चालत होते, ना पुढे जाण्याची घाई ना मागे उरल्याची खंत... नाही कुठे धक्काबुक्की ना चेंगराचेंगरी... काही बायकांच्या डोक्यावर छोटसं तुळशी वृंदावन.. प्रत्येक दिंडीचे आपापले झेंडे सुद्धा होते बरं का... सगळे भगवेच पण त्या झेंड्यांवर खुणेसाठी काही तरी लावलं होतं.. आंबा चंदन अशा झाडांच्या छोट्या डहाळ्या, काहींनी तर फुगेच लावले होते...
आम्हाला पालखीचं दर्शन काही झालं नाही पण चराचरात परमेश्वर असल्याची खूण मात्र पटली... अवघा परिसर विठ्ठलमय झाला होता... वाटेतले गावकरी सुद्धा हात जोडून माउली चला खाण्याची सोय केलीय असं सांगून बोलावत होते.. कुणी चहा कुणी पोहे- खिचडी... असं देत होते... वाटेतल्या राहुट्यांमध्ये तरुण मुलं सेवा म्हणून वारकऱ्यांचे पाय चेपून देत होते... काही सेवाभावी संस्थांच्या गाड्या औषध वाटप करत होत्या...
ज्याच्यात्याच्यात विठ्ठल दिसत होता, त्यामुळे पालखीचं दर्शन न झाल्याची हळहळ/ खंत जरादेखील वाटली नाही...
गेल्या दोन वर्षी कडक ऊन आणि यंदा मुसळधार पाऊस, दोन्हीतही समान श्रद्धा आणि विठ्ठल भेटीची समान ओढ वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती...
यांचे ट्रक पुढे जाऊन जेवणाची तयारी करत होते...
निघताना १८ किलोमीटर चालायचं असं माहित होतं पण प्रत्यक्ष आम्ही फक्त एक एक पाऊल चालत गेलो आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर झालं तरी कळलं पण नाही... मग थोडं थांबून चहा घेतला... एरवी mall मध्ये चालून पण पाय दुखतात पण इथे या भाविकांच्या मेळ्यात चालताना हे अंतर कधी पार केलं ते खरच कळलं पण नाही...
असे दोन चहाचे break घेत ,
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ नामदेव तुकाsssराम
असं म्हणत म्हणत , टाळ्या वाजवत आम्ही बानू-खंडेरायाच्या जेजुरीत पोचलो पण...
लांबूनच गडावरच देऊळ दिसत होतं.. खुणावत होतं... पण इतकं चालून गेल्यावर आपण वर चढू शकू का याची जरा शंकाच वाटत होती... पण सगळ्यांच्या बरोबर वर जायचं ठरवलं आणि गेलो कि साडेतीनशे पायऱ्या चढून... आणि काय सांगावं माउली , चढ उतार केल्यावर चालून चालून दुखत असलेले पाय थांबले कि दुखायचे...
पावसामुळे सगळे डोंगर हिरवे झालेच होते पण वर डोंगरावरून दिसलेलं दृश्य जास्त सुंदर होतं.. अवर्णनीय होतं... भंडाऱ्यामुळं जेजुरी सोन्याची अन पावसामुळे डोंगर पाचूचे दिसत होते... दूरवर वावरात वारकऱ्यांच्या राहुट्या घातलेल्या दिसत होत्या, ढग खाली उतरलेले भासत होते...
घरी ओले मोजे मी इस्त्री करून वाळवले होते हे आठवून  गंमत वाटली...
सासवडच्या अलीकडेच २ किलोमीटर चालायला सुरवात केली होती... १८ km चा टप्पा, जेजुरी ला पायर्यांपर्यंतचे अंतर आणि बेलसर फाट्याला गाडी येणार होती ... ते उलट चाललेलं अंतर अंदाजे ४ km, असं एकूण  २६ किलोमीटर पावसात भिजत चालल्यावर सगळे कपडे मोजे आणि बूट अगदी चिंब भिजले होते...
आणि मन सुद्धा!
पायी चालण्याची मौज भारी
वारकरी बनण्याची गंमत न्यारी
आयुष्यात अनुभवावी एकदातरी
माउलीसंगे आषाढवारी 
🙏
🏼


विशाखा फाटक
पुणे


For blog article on whatsapp contact on 9819830770