April 24, 2020
April 20, 2020
April 19, 2020
April 14, 2020
ज्योतिष - एक दैवी शास्त्र
.
नमस्कार,
मी स्वतः एक जोतिष अभ्यासक आहे. 'करोना' संकटा बाबत पूर्व कल्पना देता आली नाही म्हणून नुकताच 'अं नि स ' ने जोतिषांचा निषेध केला आहे. याबाबत माझे थोडे विचार
सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की कुठल्याच जोतिषीचे १००% भविष्य ,प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगात बरोबर/ खरे होते असे नाही. कारण एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही ती म्हणजे हे एक "दैवी" शास्त्र आहे.
जोतिषी सगळं १००% अचूक सांगायला लागले तर परमेश्वर ही संकल्पनाच निघून जाईल. लोक जोतिषीलाच देव बनवतील .पण प्रत्यक्षात तसे होत का? याचा अर्थ काही गोष्टी देव/ दैव यांच्या हातात आहेत.
कितीही मोठे प्राविण्य मिळवलेले, MD डाॅक्टर पण 'आता सगळं देवाच्या हाती' असं म्हणत नाहीत का? म्हणतात ना? याचा अर्थ ते स्वतः कुठे प्रयत्नात कमी पडले का? तर अजिबात नाही. त्यांनी त्यांचे पूर्ण प्रयत्न केले पण शेवटी 'त्याची' मर्जी
मग हे जोतिषां बाबतीत का स्विकारायचे नाही?
दुसरा एक महत्वाचा मुद्दा विसरला जातोय की माणूस आजारी पडल्यावर डाॅक्टर कडे जातो. मग डाॅक्टर त्याला पाहून तपासून निदान, औषधोपचार करतात.
तसेच जोपर्यंत एखादा जातक स्वत: एखादी अडचण घेऊन जोतिषा कडे जात नाही तोपर्यंत जोतिष्याने काहीही सांगू नये हा शास्त्र संकेत आहे. कारण तो ज्या वेळेला जोतिषाकडे जातो त्यावेळची ग्रहस्थितीत त्याच्या अनेक प्रश्णांची उत्तरे दडलेली असतात. म्हणून जातकाची कळकळ/ उत्तर जाणून घ्यायची वेळ हे सगळ महत्वाचे असते
उगाच दिसला डाॅक्टर विचार तब्येतीबद्दल किंवा दिसला जोतिषी दाखव हात/ पत्रिका हे चुकीचेच
राहिली गोष्ट पुढे घडणाऱ्या जागतिक आपत्ती बाबत भविष्य वर्तवणे.
तर 'मेदनीय जोतिष' हा एक प्रकार यात आहे. अनिस ला विनंती आहे की त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करुन जसे 'हवामान खात्याचा ' स्वतंत्र विभाग आहे तसा या शास्त्राचा अभ्यास करणा-यांची एक समिती नेमून हा विभाग चालू करावा, अधिक अभ्यासाठी निधी द्यावा, आणि मग उत्तरे चुकली तर जरुर निषेध करावा जसा वेळोवेळी तुम्ही हवामान खात्याच्या चुकीच्या भकिताचा, शास्त्रज्ञ, मेडीकल सायन्सच्या अपयशाचा करता
माझे हे विचार संपवता संपवता एक गोष्ट, नुकताच एका जोतिषांनी 'भूकंपाबद्दल भकित वर्तवले होते ' जे खरे ठरले. जमलं तर या किंवा अशा अनेक असंघटीत छोट्या मोठ्या जोतिषांचे जे अंदाज बरोबर येतात त्यांचा एखादा तरी अभिनंदनाचा ठराव मांडाल ना, भाऊ 💐
📝( जोतिष अभ्यासक) अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com