गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी या महाकाव्याला एका वेगळ्याच. उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------
भाग १:
श्रीरामचंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी, अयोध्येत माणसांचा महासागर जमला होता.तापसवेष धारण केलेले दोन बटु मंडपात आले. ते म्हणाले,
"आम्ही महर्षी वाल्मिकीचे शिष्य आहोत. आम्ही रामचरित्र गायन करतों ".
श्रीरामांना माहीत नव्हतें की आपल्यासमोर आपल्या चरित्राचें गायन करणारे हे बटु आपलेच पुत्र आहेत.
🎼
स्वयें श्रीरामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती
क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com
No comments:
Post a Comment