एखाद्या देवळात गेल्यावर देवाला भाविकांकडून केल्या जाणा-या नमस्कारात सुध्दा किती विविधता असते ना?
मंदिरातील पायरी चढण्याआधी उजव्या हाताने पायरीला हात लावून ( स्पर्श करुन) मग तो हात स्वतःच्या हृदयाला लावणे, मग मंदिरातील घंटानाद करुन नमस्कार, देवतेच्या स्वरूपा नुसार समोरील कासव, नंदी, उंदीर यांना नमस्कार, मग मुख्य देवतेचे दर्शन घेताना नमस्काराचे विविध प्रकार, कधी हृदया जवळ दोन्ही हात धरून तर कघी तेच दोन्ही हात कपाळावर धरून, डोळे मिटून, डोळे उघडे ठेऊन, प्रदक्षिणा झाल्यावर साष्टांग नमस्कार करतानाही विविध प्रकार.
एखाद्या मंदिरात गेल्यावर भाविकांकडून विविध प्रकारे केली जाणारी ही भक्ती बघायला खूप छान वाटते.
कामाच्या गडबडीत मंदिरात जाऊ न शकणारा पण मंदिराच्या समोरून पायी,दोन चाकी, चारचाकी, बस, रेल्वेतून जाताना क्षणभर मंदिराकडे बघून जमेल तसे दर्शन घेणारा, नमस्कार करणारा तर ' परम भक्तच' नाही का?
प्रकार अनेक पण मुळ उद्देश एकच 'नतमस्तक' होणे. या भक्तीला एका चाकोरीत ठेवणे शक्त नाही.
#व्यक्ती तितक्या प्रकृती चे उदाहरण एखाद्या मंदिरात ही छान बघायला मिळते.
( नतमस्तक) अमोल 🙏
पौष.शु अष्टमी
०८/०२/२२
देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.com
No comments:
Post a Comment