March 23, 2023

अशक्य ही शक्य

Impossible मधेच I am possible  दडलेले आहे हे मॅनेजमेंट फंडा किंवा मोटीवेशनल वाक्य म्हणून ठिक आहे
पण 'अशक्य ' हा शब्द ऐकण्यात आला की पहिले आठवतात ' स्वामी'. 

"अशक्य ही शक्य करतील स्वामी"

 हे वचन, ही प्रार्थना,  ही श्रध्दाच   I am possible होण्यास प्रेरणादायक ठरते हे नक्की

स्वामी समर्थांना 🙏🌺
चैत्र.शु द्वितीया 📝
२३/०३/२३

देवा तुझ्या द्वारी आलो
www.kelkaramol.blogspot.com




 हे वचन, ही प्रार्थना,  ही श्रध्दाच   I am possible होण्यास प्रेरणादायक ठरते हे नक्की

स्वामी समर्थांना 🙏🌺
चैत्र.शु द्वितीया 📝
२३/०३/२३

देवा तुझ्या द्वारी आलो
www.kelkaramol.blogspot.com 

March 22, 2023

गुढीपाडवा शुभेच्छा

शालिवाहन शके १९४५, शोभननाम संवत्सराच्या सर्वांना  खूप खूप  शुभेच्छा
 💐💐

🌺 देवा तुझ्या द्वारी आलो 🌸

March 19, 2023

International Astrology day

."International Astrology day

"
       - 20th March 

(तर यासंबंधीची इंग्रजी माहिती इथे चित्रात दिलीआहे.)

जागतीक स्तरावर अगदी होनोलूलू पासून होचिमीन पर्यत   असंख्य लोकांना वाटणारा हा उत्सूकतेचा विषय आहे यात मला तीळमात्र शंका नाही.

 हे शास्त्र आहे किंवा नाही असल्या कुठल्याही वादात न पडता बरेचजण प्रसंगानुसार / आलेल्या परिस्थितीनुसार विविध प्रकारे
 'भविष्याच्या अंतरंगात ' डोकवण्याचा प्रयत्न करतच असतात

सांगितलेला अंदाज चुकल्याचा अनुभव जरी आला तरी पुढल्यावेळेला कदाचित मार्गदर्शक बदलला जातो पण 'भविष्याच्या अंतरंगात ' काय दडंलय याची वेळोवेळी उत्सूकता जनमनावर कायम राहते 
आणि हा शोध घेण्याची परंपरा पुढेही कायम राहणारच. या उत्सूकतेला धर्म, जात,लिंग, प्रदेश यांचेही बंधन लागू पडत नाही हे ही एक वैशिष्ठ म्हणता येईल

*"याच जिज्ञासेतून या शास्त्राला जिवंत ठेवणा-या सृष्टीतील तमाम घटकांना*
*या दिवसाच्या निमित्याने एक दिवस आधीच शुभेच्छा"* 
💐💐

भारतीय ज्योतिष शास्त्र सर्वदृष्टीने अत्यंत संपन्न आहे. भृगुसंहिता ( महर्षी भृगू यांची) , प्रश्णशास्त्र ( यातील आचार्य वराहमिहिरांचा 'दैवज्ञवल्लभ', आचार्य पृथुयश यांचा षट्पंचशिका, श्री सिध्दनारायण दास यांचा 'प्रष्णवैष्णव', भटोत्कलाचा 'प्रश्णज्ञानम'  ), सारावली ते  कृष्णमूर्ती ,भावनवमांश पध्दती पर्यंत योगदान अनेक आचार्यांनी दिले आहे.

साहित्य क्षेत्रात या विषयावर लिखीत पुस्तके, मासिके जेवढी उपलब्ध असतील तेवढी खचीतच एखाद्या क्षेत्रात असतील. आधुनिक सोशल मिडीया जसे यूट्यूब, ब्लाँग क्षेत्र ही या शास्त्राने व्यापले आहे.

'ग्रहांकीत' मासिकाच्या  ( आँक्टो २०१०).अंकात आलेली  ज्योतिषी डाँ.वासुदेव राव जोशी यांची मुलाखत मध्यंतरी  वाचनात आली होती
यात त्यांना एक प्रश्ण विचारला होता की

 "ज्योतिषाची मर्यादा काय आहे? "
यावर एक संस्कृत श्लोक त्यांनी सांगितला
//
*फलानि  ग्रहचारेण सूचयान्ति मनुष्यणा !*
*को वर्ता तारतम्यस तमेकं वेध संविना !!*

म्हणजे ज्योतिषी कुंडली बघून फलादेश फक्त सांगतो; परंतु एखादी घटना घडणारच ( किंवा घडणारच नाही)  हे ईश्वराविना कोणी सांगू शकत नाही. त्याचे श्रेष्ठत्व मानायलाच पाहिजे
//
थोडक्यात मर्यादा आहेत हे सत्य दोन्ही बाजूनी स्वीकारले तर अनेक वादविवाद टाळता येण्यसारखे आहेत.

भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञान आणि भारतीय जोतिष शास्त्र यांच्यात एक जवळीक आहे असे मला कायम वाटते. 

अथांग समुद्रा एवढी व्याप्ती असलेल्या अशा या दैवी शास्त्रात , काठावर तरी डुंबायला मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळात या शास्त्रासंबंधीत सेवा द्यायची संधी मला वेळोवेळी मिळो हीच सदिच्छा  🙏

(ज्योतिष अभ्यासक) अमोल केळकर 📝
१९/०३/२३

अवांतर: ज्योतिष विषयक धागा आल्या आल्या डराँव,डराँव करणाऱ्यांना त्याच दिवशी ( २० मार्च) असणा-या आंतराष्ट्रीय बेडूक दिनाच्या अगावू शुभेच्छा 💐