May 31, 2023

वस्त्र- संहिता

वस्त्र - संहिता 📝

 यापुढे नवस करायचे/ फेडण्याचे उपाय सांगताना पंडीत/ ज्योतिषांनी विशेष ध्यान दिले पाहिजे. ' नवरा_माझा_नवसाचा ' मधील उपाय हा इतिहासजमा होणार आहे. मेष राशीत ,अश्विनी या केतूच्या नक्षत्रातील 'गुरु' ने वस्त्र-संहितेचे नियम बनविण्यासाठी चालना दिली आहे हे नक्की मोठमोठी देवस्थाने, मोठमोठे नियम लावून अंमलबजावणी करतीलच, प्रश्ण आहे तो तुलनेने लहान, छोट्या गावातील मंदिरांचा. महत्वाच्या कामाला निघताना किंवा गुरुवार,शनिवार,सोम-मंगळवारी, किंवा विशिष्ठ दिवशी आँफीसला जायच्या आधी देवळात जाताना वेळ वाचावा म्हणून केवळ शूज काढून 'मोजे' न काढताच आपण अनेकजण देवळात जातोय. हे ही थांबवले पाहिजे. ठाण्याला स्टेशनजवळ असणाऱ्या ' स्वामी समर्थांच्या मठात ' मोजे न घालून येण्याबाबत उल्लेख आहे. असा उल्लेख इतर ही काही ठिकाणी आढळला थोडक्यात "मौज आणि मोजे " बाहेर ठेऊनच मंदिरात यावे असा एखादा फलक/ नियम सर्व मंदिरात लावायला हरकत नाही.

  देवाचिया द्वारी
 पूर्ण वस्त्रधारी
 तेणे दर्शन भारी
 साधकाला !!

 गोविंदाय नमो नम :🙏🙏🌷

 #देवा_तुझ्या_द्वारी_आलो
जेष्ठ शु. एकादशी ३१/५/२३

May 29, 2023

ज्योतिषी फंडे

मीनेचा शुक्र vs कन्येचा शुक्र



 

May 23, 2023

IPL 2023 चा विजेता कोण होईल?

रुलिंग प्लॅनेट वापरुन काढलेला अंदाज.
गुजराथ जिंकेल.




 

May 19, 2023

श्री शनैश्चर जयंती

श्री शनैश्चर जयंती

नमो शनीदेवा, तुझा मीच दास
अशी बुध्दी देई, मला तुची खास 
घडो दिन- दुबळ्यांची, अखंडीत सेवा
मनाला अहंकार कधीना शिवावा

वैशाख अमावस्या
१९/०५/२३