April 24, 2015

!! कृतार्थ जीवन !!

!!    कृतार्थ  जीवन  !!

तुजलागी संप्रदायें करोन !
समंत्र सांगितले सहज - साधन !
नित्य - नेमें आसनीं बैसोन !
करावे चिंतन स्वरुपाचें  !!  १ !!

स्वरुप चिन्मय आनंदघन !
आपण हि तैसे चि परिपूर्ण ! 
 ऐसे भावितां तन्मय होवोन !
 मानसी मनपण उरे कोठें? !!  २  !!
 उरे कोठे द्वैत - स्थिति !
देह गेह - जगत् - भ्रांति !
क्षणैक अद्वयानंदानुभूति !
देतसे शांति साधकासी  !! ३  !!

चालतां बोलतां हिंडतां फिरतां !
लिहितां वाचितां खातां जेवितां !
नाना सुखदु:ख भोग भोगिता !
निजात्मसत्ता आठवावी !! ४ !!

 होतां सो S हं - भजनीं तन्मय !
एकवटोनि ज्ञाता ज्ञेय !
येई आत्मसुखाचा प्रत्यय !
अतींद्रिय स्वभावें जें  !!  ५ !!

नाद - श्रवण प्रकाश - दर्शन !
तेथें श्रोता द्रष्टा कोण !
तो आत्मा चि मी हें ओळखून !
तदनुसंधान राखावें !!  ६ !!

सदा स्व-रुपानुसंधान !
हे चि भक्ति हे चि ज्ञान !
तेणें तुटोनि कर्म - बंधन !
प्रम समाधान प्राप्त होय !! ७ !!

क्लेष - रहित  संतोषी जीवन !
प्रयाण - कालीं सो S हं - स्मरण !
घडो आवडी  परमार्थ - चिंतन !
आशीर्वचन तुम्हांसी हें !! ८ !!



No comments:

Post a Comment