February 28, 2013
February 27, 2013
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!
कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन !
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
- सुरेश भट
February 26, 2013
February 25, 2013
गुरुप्रतिपदा (श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री शैलगमन)
उद्या २६ फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदा आहे. - याविषयी भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज १००
वर्षे संपुर्ण भारत भ्रमण व ५० वर्षे श्री क्षेत्र गाणगापुर येथे वास्तव्य
करुन एका महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली. निजगमनास जातांना स्वत:च्या
निर्गुण पादुका
श्री क्षेत्र गाणगापुर येथे सेवेकरिता ठेवल्या. या काळापासून परकीय
सत्तांचा -हास व हिंदु राजसत्तेचा उदय झाला. भगवंताचा हा अवतार १५० वर्षे
कार्यरत होता. त्या कार्याची
नोंद आपल्याला वेदाइतकेच महत्व असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात बघावयास
मिळते. माघ वद्य १ ला श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैल्य ( कर्दळीवन ) गमन केले व
गुप्तरुपाने कार्य
चालु ठेवले. या दिवशी महाराजांचे श्री शैल्य गमनाचा उत्सव सर्व श्री स्वामी
समर्थ सेवा केन्द्रात साजरा केला जातो.
( संग्रहीत )
February 24, 2013
February 23, 2013
February 22, 2013
अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी तोडगा
रुईच्या पानावर हळदीच्या पाण्याने, आपले पैसे ज्याच्याकडे अडकले आहेत, त्याचे नाव लिहून ते पैसे परत मिळावे ही इच्छा बोलावी ( लिहिण्यासाठी काड्यापेटीची काडी घेऊ नये, इतर कुठलिही चालेल )
नंतर त्या रुईच्या पानाची गुंडाळी करुन हळदीच्या पानात दोरा बुडवून तो दोरा त्या पानाला गुंडाळून चांगल्या पाण्यात सोडावा
सदर तोडगा श्री रमेश तांबे यांच्या सोपे अनुभविक तोडगे भाग ४ येथुन घेतला आहे
नंतर त्या रुईच्या पानाची गुंडाळी करुन हळदीच्या पानात दोरा बुडवून तो दोरा त्या पानाला गुंडाळून चांगल्या पाण्यात सोडावा
सदर तोडगा श्री रमेश तांबे यांच्या सोपे अनुभविक तोडगे भाग ४ येथुन घेतला आहे
February 21, 2013
February 20, 2013
February 19, 2013
देवघर - देवदर्शन
देवघर - देवदर्शन
आपल्या घरातील देवघर, त्यातील देव, देवदर्शन यासंबंधी हे माहित असावे
१) देवघरामधे पुजनातील मुर्तीची उंची उजव्या हाताच्या अंगठ्याच्या तिस-या पेरापर्यंत किंवा एक वित पर्यंत असावी. वीत पेक्षा जास्त असू नये.
२) देवाचे आसन पुजकाच्या आसनापेक्षा उंचावर असावे
३) देवांच्या मुर्तींची तोंडे एकमेकांसमोर असू नयेत.
४) देवपुजनापुर्वी प्रथम पुजकाने कपाळास कुंकुम तिलक लावावा.
५) देवघरामधे लक्ष्मीशंख व घंटा असणे आवश्यक
६) पूजनानंतर शंख पाण्याने भरुन ठेवावा, शंखाचा निमूळता भाग उत्तरेकडे किंवा पुर्वेकडे असावा
७) देवघरात एकाच देवताच्या दोन मूर्त्या नसाव्यात
८) देवपुजेतील उपकरणे शकय्तो तांब्याची किंवा चांदीची असावीत. स्टिलची असू नयेत
९) करंगळी जवळील बोटाने ( अनामिका ) देवाला गंध लावावे. स्वतः ला मधल्या बोटाने गंध लावावे
१०) देवळात दर्शनाला जाताना, देवळाच्या पाय-या चढताना पाय-यांना उजव्या हाताने स्पर्श करावा
११) आपल्या इष्ट देवतेला पाच प्रदक्षिणा तरी घालाव्यात
February 18, 2013
February 17, 2013
February 16, 2013
श्री गजानन महाराजांचे २१ अध्याय ( पीडीफ फाईल )
श्री गजानन विजय अध्याय एकत्रित स्वरुपात इथे पाहू शकाल
श्री गजानन विजय अध्याय १
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_9267.html
श्री गजानन विजय अध्याय २
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_5454.html
श्री गजानन विजय अध्याय ३
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_2386.html
श्री गजानन विजय अध्याय ४
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_6.html
श्री गजानन विजय अध्याय ५
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_7.html
श्री गजानन विजय अध्याय ६
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_8.html
श्री गजानन विजय अध्याय ७
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_9.html
श्री गजानन विजय अध्याय ८
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_10.html
श्री गजानन विजय अध्याय ९
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_11.html
श्री गजानन विजय अध्याय १०
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_12.html
श्री गजानन विजय अध्याय ११
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_13.html
श्री गजानन विजय अध्याय १२
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_14.html
श्री गजानन विजय अध्याय १३
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_15.html
श्री गजानन विजय अध्याय १४
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_16.html
श्री गजानन विजय अध्याय १५
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_17.html
श्री गजानन विजय अध्याय १६
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_18.html
श्री गजानन विजय अध्याय १७
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_19.html
श्री गजानन विजय अध्याय १८
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_20.html
श्री गजानन विजय अध्याय १९
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_21.html
श्री गजानन विजय अध्याय २०
http://kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_22.html
श्री गजानन विजय अध्याय २१
http://www.kelkaramol.blogspot.in/2012/11/blog-post_23.html
February 15, 2013
परीक्षेची भीती जाऊन यश प्राप्ती साठी उपाय
फेब्रुवारीच्या उत्तरार्धात बारावीची परीक्षा सुरु होत आहे तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे.
दहावी , बारावी परीक्षा सुरु झाली की ख-या अर्थाने आपल्या कडे परिक्षांचा मौसम सुरु होतो ते थेट मे / जून पर्यंत चालणा-या इंजिनिअरिंगच्या परीक्षेपर्यंत चालू राहतो
परीक्षा म्हणली की अगदी हुषार मुलांच्या पोटातही गोळा येतो . अनेक जण अभ्यासात खुप हुषार असतात. संपुर्ण वर्षभर चांगला अभ्यास केलेला असतो. पण ऐन परीक्षेत मात्र मानसिक दडपण येऊन पेपर सोडवता येत नाही, आठवत नाही, अशा प्रकारची तक्रार अनेक पालक करताना आढळतात . यासाठी एक सोपा उपाय याठिकाणी देत आहे.

सदर उपाय/ तोडगा श्री विजय हजारी यांच्या ' भाव - नवमांश रहस्य ' या पुस्तकातून घेतला आहे.
अर्थात परीक्षेतील यश हे मुख्यतः केलेला अभ्यास आणि सोडवलेला पेपर यावरचअवलंबून असून केवळ तोडगा करुन ( अभ्यास न करता/ पेपर न देता ) परीक्षेत यश नक्कीच मिळणार नाही. मात्र पेपर सोडवण्याची भीती नष्ट व्हायला या तोडग्याची मदत होते. सदर तोडगा दर सहा महिन्यांनी करावयास हरकत नाही
विद्यार्थ्याने परीक्षेच्या अगोदरचे ३ शनिवार सूर्यास्तानंतर एका मातीच्या पणतीत गोडेतेल घेऊन त्यात आपला चेहरा साधारणतः मिनिटभर एकाग्रतेने पहावा व ते तेल मारुतीच्या / शनीच्या मंदिरात जाऊन तेथील समईत व्हावे ( मारुतीच्या अंगावर बिल्कूल वाहू नये)
या वरील उपायामुळे परीक्षेची भीती नष्ट होते व परीक्षेत उत्तम यश लाभते. याबरोबरच

सरस्वती द्वादशनामावलीही
दररोज एकदा वाचावी त्याने बुध्दी तल्लख होण्यास वाचलेले लक्षात रहाण्यास
मदत होते ( ही नामावली इथे ब्लॉगवर आहे )
सर्वांना परीक्षेतील यशासाठी शुभेच्छा
सर्वांना परीक्षेतील यशासाठी शुभेच्छा
February 14, 2013
श्री कृष्णावेणी उत्सव - २०१३
प्रतिवर्षी प्रमाणे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दिनां १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी असे दहा दिवस हा उत्सव साजरा होणार आहे.
श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्रीमन् नृसिंहसरस्वतींच्या बारा वर्षाच्या तपश्चर्येने पावन झालेल्या कृष्णा - पंचगंगा संगमावरील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे साजरा होणा-या या उत्सवाची मुळ संकल्पना
श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्रीमन् नृसिंहसरस्वतींच्या बारा वर्षाच्या तपश्चर्येने पावन झालेल्या कृष्णा - पंचगंगा संगमावरील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे साजरा होणा-या या उत्सवाची मुळ संकल्पना
थोरले स्वामी (
टेंबे स्वामी ) महाराजांची.
यावर्षीच्या कार्यक्रमाची रुपरेषा आमचे मित्र ओंकार पुजारी यांचा सहकार्याने इथे देत आहे.
यावर्षीच्या कार्यक्रमाची रुपरेषा आमचे मित्र ओंकार पुजारी यांचा सहकार्याने इथे देत आहे.
February 13, 2013
February 12, 2013
February 11, 2013
चंद्र दर्शन - धन लाभाचा एक उपाय
चंद्र दर्शन - धन लाभाचा एक उपाय
अमावस्येनंतर जेव्हा प्रथमच चंद्र उगवतो ती सायंकाळ ! दरमहा अमावस्या असते आणि त्याच्या दुस-या दिवशे पाहिले तर कॅलेंडर मधे चंद्र दर्शन असे लिहिलेले असते.( आज ११ फेब्रुवारीला ही चंद्रदर्शन असे लिहिले आहे )
सायंकाळी भोजन करण्यापूर्वी प्रार्थना करुन , शुचिर्भूत होऊन ' चंद्रदर्शन ' जर त्या विशिष्ठ दिवशी दरमहा घेतले व चंद्रदर्शन घेतल्यावर हिरवी वस्तू ( उदा. झाड ) लगेच पाहिली तर महिना बरा जातो, अडचणी निवारण होतात, पैसा मिळतो
असा हा चंद्रदर्शनाचा लाभ
( संदर्भ - धनलाभ योग रहस्य - प्रो. मा कृ बेहरे )

February 10, 2013
February 9, 2013
' श्री गजानन विजय ' - २१ अध्यायांची ध्वनीफीत
' श्री गजानन विजय ' - २१ अध्यायांची ध्वनीफीत
दिनांक ४ मार्च २०१३ ला ' श्री गजानन महाराज प्रकट दिन ' आहे. श्री दासगणू विरचीत ' गजानन विजय' या पवित्र पोथीचे पारायण या कालावधीत अवश्य करावे. यात एकूण २१ अध्याय आहेत. दिनांक १२ फेब्रुवारी पासून सुरवात करुन रोज एक अध्याय जरी वाचला तरी ४ मार्च पर्यंत संपुर्ण पोथी पुर्ण होईल.
या प्रत्येक अध्यायाची ध्वनीफीत इथे या ब्लॉगवर वरच्या बाजूस देत आहे.
इच्छूकांनी लाभ घ्यावा
February 8, 2013
February 7, 2013
लाखो भाविकांनी घेतले देवाच्या द्वारी दर्शन -
' गुगल अॅनेलीसीस ' संस्थेने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार मे २००८ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत ' देवाच्या द्वारी ' भेट दिलेल्या भाविकांच्या संख्येने लाखाचा
आकडा पार केला आहे.
गाव, राज्य , देश यांचे बंधन नसलेल्या आणि 24 x 7 सतत चालू राहणा-या या मंदिरात सर्वाधीक भावीक भारत देशातून आले होते. अमेरिका, रशिया आणि दुबईतील भाविकांची संख्याही लक्षणीय होती . संकष्टी चतुर्थी, जयंती, पुण्यतीथी, एकादशी, प्रकट दिन तसेच इतर धार्मीक दिवशी मंदिरात उपस्थित भाविकांची संख्या जास्त होती.
देवस्थान समिती तर्फे सर्व भाविकांचे आभार.
यापुढेही काही नवीन उपक्रम मंदीर समितीने हाती घेतले आहेत यात श्री दासबोध, गणेश पुराण, श्री गुरुचरित्र , भिमरुपी स्तोत्र निरुपण, संपुर्ण ज्ञानेश्वरी ध्वनीफीत इथे सादर करण्याचा मानस आहे. कार्य सिध्दीस नेण्यास ' श्री ' समर्थ आहेत . आपणही वेळोवेळी मंदिरात येऊन देव दर्शनाचा लाभ घ्याल यात शंका नाही.
देवस्थान समिती
केळकरअमोल.ब्लॉग्स्पॉट.इन