June 30, 2015

अभंगवाणी - कानडा राजा पंढरीचा


कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा

परब्रह्म हे भक्‍तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव, जणु की पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा
गीत-ग. दि. माडगूळकर
संगीत-सुधीर फडके
स्वर-पं. वसंतराव देशपांडे ,  सुधीर फडके
चित्रपट-झाला महार पंढरीनाथ

June 29, 2015

अभंगवाणी - माझा देव कुणी पाहिला


माझा देव कुणी पाहिला
मागणे ते एक तुम्हा पायी आता,
जाणा माझी व्यथा पांडुरंगा,

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई

भेटीचीया ओढ लागलीसे डोळा,
वाट हि विरळा दिसे मजला,
लाखो राउळाशी टेकवीला माथा,
देव कुठे माझा शोधू आता,

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला..
                                                         
                                                सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
                                                सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई

                                                 धावून ये.. मज तारून ने श्रीरंगा..
                                                  नदी भरली चंद्रभागा..
                                                  अलीकडं ये.. मला पलीकडं ने पांडुरंगा..
                                                  नदी भरली चंद्रभागा..
                                                    
  

June 28, 2015

अभंगवाणी - माउली , माउली रूप तुझे




तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भरावलि 
वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली 
गळा भेट घेण्य भिमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी 
 माउली माउली माउली माउली माउली माउली  रूप तुझे 
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे  

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो..




भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंडरी आज नादावली 

जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली 
तुझे नाम ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली 

माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे 
चालतो रे तुझी वात रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा 
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे 
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

आज हरपला देह भान जीव झाला खुळा बावळा 
ताल घोषातुनि साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा 
दाटला मेघ तू सवल मस्तकी चंदनाचा टिळा 
लेउनि तुळशी मला गळा ह्या पाहसी वाट त्या राउळा
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली 
पाहण्या ग तुझ्या लोचनात भाभड्या लेकरांचा लळा


भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंडरी आज नादावली 
तुझे नाम ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली 
चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला 
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे 
माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे 
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 


पंचा प्राण तल्लिन आज पाहीन पांडुरंगाला 
माउली माउली माउली माउली माउली माउली
देखिल कळस डोईला तुळस धावतो चंद्रभगेशी 
सामिपही दिसे पंढरी याच मंदिरी माउली माझी 
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता 
घे कुशीत गा माउली तुझ्या पायरी ठेवतो माथा 

पुंडलिका वरदे हारी विठ्ठल 
श्री ज्ञानदेव तुकाराम 
 पंढरीनाथ महाराज कि जय

June 27, 2015

अभंगवाणी -इंद्रायणी काठी, देवाची आळंदी




इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची

ज्ञानियाचा राजा भोगतो राणीव
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड कैवल्याचे

उजेडी राहिले उजेड होऊन
                                                निवृत्ती, सोपान, मुक्‍ताबाई
गीत-ग. दि. माडगूळकर
संगीत-पु. ल. देशपांडे
स्वर-पं. भीमसेन जोशी
चित्रपट-गुळाचा गणपति
राग-भीमपलास

June 26, 2015

अभंगवाणी - आली कुठूनशी कानी टाळ-मृदुंगाचि धून

अभंगवाणी
आली कुठूनशी कानी टाळ-मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतुन

नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी
बोले शब्दावीण काही चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रयणीच्या पाण्यात शहारले अंग‍अंग
मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग

वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
जसे कटिवरी हात युगे अठ्ठावीस उभा
भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहू तुकयाच्या अभंगात
गीत-सोपानदेव चौधरी
संगीत-वसंत आजगावकर
स्वर-वसंत आजगावकर

अभंगवाणी - अवघा रंग एक झाला


अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥

मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥

नाही भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध काम ॥३॥

देही असोनि विदेही ।
सदा समाधिस्त पाही ॥४॥

                                       पाहते पाहणें गेले दूरी ।
                                       म्हणे चोखियाची महारी ॥५॥

रचना-संत सोयराबाई
संगीत-किशोरी आमोणकर
स्वर-किशोरी आमोणकर
राग-भैरवी

June 25, 2015

अभंगवाणी - देव माझा विठू सावळा


देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा 

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी 
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा 

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर 
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा 

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो 
रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा

गीत-सुधांशु
संगीत-दशरथ पुजारी
स्वर-सुमन कल्याणपूर
राग-भूपाल तोडी

June 23, 2015

* ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०१५*



* वेळापत्रक *
गुरुवार ९ जुलै २०१५ -  पालखीचे प्रस्थान (मुक्काम आळंदीत)
शुक्रवार १० जुलै २०१५ - पुण्यात मुक्काम
रविवार १२ जुलै २०१५ - सासवड
मंगळवार १४ जुलै २०१५ - जेजुरी
बुधवार १५ जुलै २०१५ - वाल्हे (दोन दिवस मुक्काम)
शनिवार १८ जुलै २०१५ -  लोणंद-ताडगाव
रविवार १९ जुलै २०१५ - फलटण
सोमवार २० जुलै २०१५ - बरड
मंगळवार २१ जुलै २०१५ - नातेपुते
बुधवार २२ जुलै २०१५-  माळशिरस
गुरुवार २३ जुलै २०१५ - वेळापूर
शुक्रवार २४ जुलै २०१५- भंडीशेगाव
शनिवार २५ जुलै २०१५ - वाखरी
रविवार २६ जुलै २०१५ - पंढरपूर


---
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 
पंढरीनाथ महाराज कि जय. 

माऊली । माऊली । माऊली । माऊली । माऊली ।
माऊली । माऊली । माऊली । माऊली । माऊली ।


( देऊळ  चालू  - २४ X ७ 

June 20, 2015

राम मंत्राचे श्लोक

राम मंत्राचे श्लोक  - ४  ( समर्थ रामदास स्वामी रचित )




!!  जय जय रघुवीर समर्थ  !!




जरी ही तनू रक्षिसी पुष्ट काहीं     !
तरी भोग तो रोग होईल देहीं   !!
विपत्तीपुढें ते न ये बोलतां रे !
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे  !! ४ !!


जय जय रघुवीर समर्थ !!!!

श्री समर्थ रामदास स्वामी रचित ८ वे मारुती स्तोत्र

श्री समर्थ रामदास स्वामी रचित ८ वे मारुती स्तोत्र 

June 18, 2015

विष्णू सहस्त्र नाम

अधिक मासा निमित्य वाचन करुया विष्णू सहस्त्र नामाचे 

June 17, 2015

अधिक महिन्याची आरती

ओवाळू आरती !  आता पुरुषोत्तम प्रभूला !
नियम व्रते पाळिती ! पावतो सत्वर भक्ताला  !! धृ  !!

दरवर्षाचा दशदिवसांचा ! मळ काढून केला !
अधिक महिना ! तीस दिनांचा ! काळ मेळ बसविला  !!
मंगलकार्ये ! वर्ज्य त्यामधी ! पुण्यकर्म करती !
मलमासाला ! कृष्णकृपेने ! पुरुषोत्तम मानिती !!
अंधाराचा नाश कराया ! दिव्य दीप लाविला !
नियम व्रते पाळिती ! पावतो सत्वर भक्ताला  !! १  !!

गुण सुंदरिला ! द्रौपदीला अन चंद्रकलाराणीला !
अधिकमासव्रत ! पुण्याईने ! प्रसन्न प्रभू झाला !
स्नान, दान , जप ! मौन भोजने कुबुद्धी सारावी !
दुर्व्यसनांचा ! त्याग करावा ! चैन सर्व सोडावी !
निर्मळ गुरुजी पुण्यप्रद हा ! मार्ग दावी सकला !
नियम व्रते पाळिती ! पावतो सत्वर भक्ताला  !! २  !!

( अधिकमास महात्म्य  पुस्तकातून साभार )

ज्यांना या पुस्तकाची पीडीफ कॉपी   पाहिजे असेल त्यांनी कृपया  a.kelkar9@gmail.com वर संपर्क करा
संकलन : अमोल केळकर 

June 16, 2015

अधिक मास - ( आषाढ )

अधिक मास - ( आषाढ )

मराठी कॅलेंडरनुसार ३२ ते ३३ महिन्यांनी एकदा येणारा 'अधिक मास' येत्या बुधवारपासून सुरू होतो आहे. या वर्षी हा अधिक मास १७ जूनपासून १४ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर पुन्हा नेहमीचा आषाढ सुरू होईल

चांद्रमास ३५४ दिवसांचा, तर सौर मास हा ३६५ दिवसांचा असतो. त्यामुळे वार्षिक कालगणनेत होणारा ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर अडीच वर्षांनंतर अधिक मास येतो. त्यालाच मलमास, पुरुषोत्तम मास, धोंडा महिना अशी नावेह आहेत. अधिक मासात आपल्या कन्येला महालक्ष्मी म्हणून पुरुषोत्तम मानलेल्या जावयाला कन्यादानाने विवाहात दिलेली असते. त्याच जावयाला महाविष्णू पुरषोत्तम स्वरूप मानून जावयाला चांदीच्या तबकात ३३ अनारसे देण्याची प्रथा आहे. दर १८ वर्षांतून एकदा आषाढ अधिक येतो. भाद्रपदामध्ये २४ वर्षांनी, तर चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे १२ वर्षांनी अधिक मास म्हणून येतात
( संदर्भ - महाराष्ट्र टाईम्स )

चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे महिने साधारणपणे 12 वर्षानी अधिक होतात. तर आषाढ महिना 18 वर्षानी भाद्रपद महिना 24 वर्षानी, अश्विन महिना एकशे एक्केचाळीस वर्षानी तर कार्तिक महिना तब्बल सातशे वर्षानी अधिकमास होतो. परंतु भाद्रपदमासापर्यंतच ‘अधिकमास’ धरला जातो. अश्विन-कार्तिक महिने अधिक झाले तरी त्यास ‘अधिकमास’ संबोधण्याची प्रथा नाही. ज्या वर्षी अश्विन महिना अधिक होतो. त्यावेळी पौष महिना क्षय होतो. अशावेळी दोन प्रहरापर्यंत मार्गशीर्ष आणि दोन प्रहरानंतर पौष मानून दोन्ही मासातील धर्मकृत्यं करावीत, असं शास्त्रात म्हटलं आहे. अशा जोडमासाला ‘संसर्प’ म्हणतात. कार्तिक महिन्याच्या पुढील चार महिने अधिकमास तसंच अश्विन महिन्यांपूर्वी क्षयमास होत नाही. तसंच मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांना जोडून अधिकमास येत नाही. अधिकमासात दोन्ही पक्षात शुभ एकादशी येतात. शुक्ल पक्षातील एकादशीला ‘पद्मिनी’ तर वद्यपक्षातील एकाशीला ‘परमा’ असं संबोधलं जातं. अधिकमासाची देवता ‘पुरुषोत्तम’ म्हणजेच भगवान विष्णू मानली जाते. त्यांची आपल्यावर कृपादृष्टी राहावी, सत्कर्मात आपण रममाण व्हावं म्हणून त्यांच्या प्रसन्नतेसाठी पूजापाठ-धार्मिक विधी व पापक्षालनासाठी मलमासव्रत करतात. तीस+तीन (33) या संख्येने दानधर्म करतात.

या अधिकमासात दररोज उपवास, फक्त एकच वेळा भोजन किंवा मौनव्रतही पाळतात. या अधिकमासापासून आपल्या अंगच्या वाईट सवयी त्याग कराव्यात, यासाठीही विशेष संकल्प सोडण्यात येतात. या महिन्यात ‘अप्रूप’ दानाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. छिद्र असलेले पदार्थ, प्रामुख्याने अनारशांचं दान करावं, असंही सांगितलं जातं. दिव्यांचंही दान करावं. मात्र हे सर्व दान सत्पात्री असावं. अधिकमासात मृत व्यक्तीचं श्राद्ध केव्हा करावं, असा सश्रद्ध मनात प्रश्न उद्भवत असतो. ज्या महिन्यात मनुष्याचं निधन झालं असेल तोच महिना पुढील वर्षी अधिकमास आला तर प्रथम वर्षश्राद्ध त्या महिन्यातच करावं. अधिकमासात मृत्यू झाल्यास पुढीलवर्षी त्याच मासात प्रथम वर्षश्राद्ध करावं. पूर्वीच्या ज्या अधिकमासात मृत्यू झाला असेल तर तोच अधिकमास आला तर त्याचं प्रति सांवत्सरिक श्राद्ध आणि महालय त्याच अधिकमासात करावं, असा धर्मशास्त्रीय संकेत आहे. त्याचप्रमाणे अधिकमासात जन्माला आलेल्या बाळाचा जन्ममास त्या नावाचा शुद्धमास असेल तो धरतात.
हे झालं सर्व धार्मिक कर्मकांडांच्या बाबतीतील विवेचन; मात्र आता आधुनिक काळात श्रमदान, नेत्रदान, रक्तदान, देहदान करणं अधिक इष्ट विद्यादान करणं तर सर्वात संयुक्तिक ठरावं, . हिंदू सणवार व विविध व्रत-उपासना याद्वारे संस्कृतीचं मोहक दर्शन घडत असतं. त्याशिवाय हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून त्यामागे वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि मुख्यत्वे नैतिकता गुंफलेली आहे. याच उद्देशाने या अधिकमासाकडे अधिक चोखंदळपणे पाहणं आवश्यक आहे. 
( संदर्भ - प्रहार )
दोन अधिक मासांत जास्तीतजास्त ३५ तर कमीतकमी २७ महिन्यांचा कालावधी जातो. यापूर्वी २०१२ मध्ये भाद्रपद अधिक मास आला होता. या वर्षी आषाढ अधिक मास तर २०१८ मध्ये ज्येष्ठ, २०२० मध्ये आश्विन, २०२३ मध्ये श्रावण, २०२६ मध्ये ज्येष्ठ तर २०२९ मध्ये चैत्र अधिक मास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक मासात दान देण्यास सांगितले आहे. आषाढ अधिक मास आला असताना कोकिळा व्रत करण्यास सांगितले आहे. गुरुवार, ३० जुलैपासून शनिवार, २९ ऑगस्टपर्यंत कोकिळा व्रत करावयाचे आहे. कोकीळ पक्ष्याचा आवाज ऐकून उपास सोडण्यास सांगितले आहे. गावात कोकीळ पक्षी असावा, असा त्यामागचा उद्देश असू शकतो, असे त्यांनी सांगितले.
( संदर्भ - लोकमत  )
धिकमासात श्रीपुरुषोत्तमप्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित भोजन, नक्तभोजन अथवा एकभुक्त रहावे. अशक्त व्यक्तीने या चार प्रकारांपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथी आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा, असे शास्त्रात सांगितले आहे. 
अ. या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा. 
आ. प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये. त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन भोजन केल्याने पापक्षालन होते.
इ. तीर्थस्नान करावे. किमान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते. 
ई. दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते. 
उ. तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे.
ऊ. तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.
ए. गोपूजन करावे. गोग्रास घालावा.
ऐ. अपूपदान (अनारशांचे दान) करावे. 
 अधिकमासात कोणती कामे करावीत ? 
     अधिक मासात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावीत. जी केल्यावाचून गती नाही, अशी कर्मे करावीत. ज्वरशांती, पर्जन्येष्टी इत्यादी नेहमीची काम्यकर्मे करावीत. या मासात देवाची पुनःप्रतिष्ठा करता येते. ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करावेत. मन्वादि आणि युगादि संबंधित श्राद्धादि कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्ध करावे. 
 अधिक मासात कोणती कामे करू नयेत ?
     काम्यकर्माचा आरंभ आणि समाप्ती करू नये. महादाने, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ, वास्तूशांती, संन्यासग्रहण, नूतनव्रतग्रहणदीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा करू नये.
( संदर्भ - सनातन प्रभात  )

अधिकमास असता श्राद्ध केव्हा करावे ?
     ज्या महिन्यात निधन झाले असेल, तोच महिना अधिकमास येतो, तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध अधिक महिन्यातच करावे. म्हणजे शके १९३६ च्या (गेल्या वर्षी) आषाढ महिन्यात मृत्यू झाला असेल, तर त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध शके १९३७ च्या (या वर्षी) अधिक आषाढ महिन्यात त्या तिथीला करावे. प्रतिवर्षीचे आषाढ महिन्यातील प्रतिसांवत्सरीक श्राद्ध या वर्षी निज आषाढ महिन्यात करावे; मात्र पूर्वीच्या अधिक आषाढ महिन्यात मृत्यू झालेल्यांचे प्रतिसांवत्सरीक श्राद्ध यावर्षी अधिक आषाढ महिन्यात करावे. याशिवाय गेल्या वर्षी (शके १९३६ मध्ये) श्रावण, भाद्रपद इत्यादी मासांत (महिन्यांत) मृत्यू झालेल्यांचे प्रथम वर्षश्राद्ध त्या त्या मासातील त्यांच्या तिथीस करावे. १३ मास होतात; म्हणून १ मास आधी करू नये. तसेच या वर्षी अधिक आषाढ किंवा निज आषाढ महिन्यात मृत्यू झाल्यास त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध पुढील वर्षी आषाढ महिन्यात त्या तिथीला करावे
( संदर्भ - दाते पंचांग  )

संकलन : अमोल केळकर 


June 15, 2015

राम मंत्राचे श्लोक

राम मंत्राचे श्लोक  - ३  ( समर्थ रामदास स्वामी रचित )




!!  जय जय रघुवीर समर्थ  !!




तुला ही तनू मानवी प्राप्त झाली    !
बहुजन्मपुण्ये  फळालागिं आली  !!
तिला तूं कसा गोविंसि विषयीं रे  !
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे  !! ३ !! 


जय जय रघुवीर समर्थ !!!!

राम मंत्राचे श्लोक

राम मंत्राचे श्लोक  - २  ( समर्थ रामदास स्वामी रचित )




!!  जय जय रघुवीर समर्थ  !!



नको कंठ शोषूं बहूं वेदपाठीं   !
नको तू पडूं साधनाचे कपाटी  !!
घडे कर्म खोटें बहू तो दगा रे  !
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे  !! २ !! 


जय जय रघुवीर समर्थ !!!!

श्री समर्थ रामदास स्वामी रचित ७ वे मारुती स्तोत्र

श्री समर्थ रामदास स्वामी रचित ७ वे मारुती स्तोत्र 



June 12, 2015

राम मंत्राचे श्लोक

राम मंत्राचे श्लोक  - १  ( समर्थ रामदास स्वामी रचित )


!!  जय जय रघुवीर समर्थ  !!

नको शास्त्र अभ्यास  वित्पत्ती मोठी  !
जडे गर्व ताठा  अभिमान पोटी !!
कसा कोणता नेणवे  आजपा रे !
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे  !! १ !! 

मेघदूत

मेघदूत  - कवी कालिदासांच्या  या सुंदर कलाकृतीवर  
सौ.  धनश्री लेले यांचे  विवेचन 
दिनांक - २०, २१ जून २०१५
ठिकाण - सि. बी डी , बेलापूर ( नवी मुंबई ) 


June 5, 2015

प्रार्थना

 नमो  श्री गणेशा 
         तुझा मीच दास 
अशी बुद्धी  देई  
        मला तूची खास 
घडो मायभूची  
         अहर्निश  सेवा 
मनाला अहंकार 
        कधी ना शिवावा  ! 


संकष्टी चतुर्थी

संकष्टी  चतुर्थी 
दर्शन घेऊयात सांगलीच्या श्री गजाननाचे 
मोरया 

June 4, 2015

श्री दत्तात्रय द्वादशनाम स्तोत्र


श्री गणेशायनम: !!
ॐ  अस्य श्री दत्तात्रेय द्वादशनाम स्तोत्र मंत्रस्य ! परम हंसऋषी: ! श्री दत्तात्रय परमात्मा देवता ! 
अनुष्टुप छंद : ! मम सकल कामना सिद्धर्थे ! जपे विनियोग : !
हरी ॐ !
प्रथमस्तु महायोही !  द्वितीयं प्रभुरीश्वर : !
तृतीयं त्रिमूर्तीच ! चतुर्थं ज्ञानसागर : !
पंचमं ज्ञान  विज्ञेयं ! षष्ठमं  सर्व मंगलम !
सप्तमं पूरीकाक्षंच ! अष्टमं देववल्लभ !
नवमं देवदेवेश ! दशमानंददायक : !
एकादशं महारुद्रो ! द्वादशं करुणाकर : !
इति द्वादश नामानि  ! दत्तात्रेय महात्मन : ! मंत्रराजेती विख्यातुं सर्व पाप हरं परं !
क्षयापस्मार कुष्ठादि ! ताप ज्वर निवारणं !
राजद्वारे तथा घोरे ! संग्रामेच जलांतरे ! गिरीगुहांतरेण  व्याघ्रचोर भायादिषु !
आवर्तन सहस्त्रेषु ! लभते वांछीतम फलम !
त्रिकालं पठते यस्तु ! मोक्ष सिद्धीमवाप्नुयात !
दत्तात्रेय सदाख्याच ! सत्यं सत्यं न संशय : !
विद्यार्थी लभते  विध्याम ! रोगी रोगात प्रमुच्यते !
अपुत्रो लभते पुत्रान ! दरिद्रो लभते  धनम !
अभार्यो लभते भार्यां ! सुखार्थी लाभते सुखम !
मुच्चते सर्व पापेभ्यो  ! सर्वदा विजयी भवेत ! 

!!!! इति श्री दत्तात्रय द्वादशनाम स्तोत्रं  संपूर्णम !!!!

June 2, 2015

स्पर्धेचा निकाल केंव्हा लागेल ?

आज जरा वेगळ्या विषयावर  लेख : स्वत:चीच परीक्षा म्हणा ना ! 
एक प्रश्ण पडलाय , एका स्पर्धेत भाग घेतलाय 

स्पर्धेचा  निकाल केंव्हा  लागेल  ? हा प्रश्ण 


खूप दिवसापासून  एका स्पर्धेच्या निकालाची वाट पहात  आहे.  रुलिंग प्लेनेट्च्या मदतीने त्याचे उत्तर  शोधण्याचा  प्रयत्न केलाय. बघू  बरोबर येतोय का अंदाज 

आज २ जून २०१५
वेळ १२ वाजून १५ मिनिटे 

आताच्या वेळेला खालील ग्रहांचा अंमल आहे 

लग्न : सिंह - रवी 
नक्षत्र - अनुराधा - शनी 
राशी - वृश्चिक  - मंगळ 
दिवस - मंगळवार  - मंगळ 

निकाल हा साधारणपणे लागायला पाहिजे होता पण अजून लागला नाही .  घटना येत्या काही दिवसात घडणे अपेक्षित आहे , त्यामुळे चंद्राचे भ्रमण पाहू

  ( चंद्र नक्षत्र आणि राशी स्वामी  हे दोन्ही रुलिंग मध्ये असलेले कॉम्बीनेशन हुडकायचे आहे )

आज चंद्र ' अनुराधा ' या शनीच्या नक्षत्रात आहे,  उद्या तो जेष्ठा या ' बुधाच्या नक्षत्रात असेल . 
' बुध ' रुलिंग मध्ये नाही  ( वर उल्लेख केल्याप्रमाणे रवी , शनी , मंगळ हेच   ग्रह रुलिंग मध्ये आहेत )
चंद्र त्यानंतर '  मुळ '  नक्षत्रात जाईल,  मुळ नक्षत्राचा मालक  ' केतू '  ही रुलिंग मध्ये नाही . त्यानंतर चंदाचे भ्रमण  होईल  पु. षाढा नक्षत्रातून - इथे  पु. षाढा नक्षत्राचा मालक  ' शुक्र ' ही रुलिंग  मध्ये नाही 
त्यांतर येणा-या उ.षाढा नक्षत्रात चंद्र येईल   त्याचा मालक  ' रवी ' रुलिंग मध्ये आहे पण त्याचे पहिले चरण धनू राशीत येते आणि   ' गुरु ' रुलिंग मध्ये नाही 
 उ.षाढाच्या २ - चरणात चंद्र आला की  तो मकर राशीत येईल 

इथे रवी ( उ.षाढा नक्षत्राचा मालक  आणि शनी ( मकर राशीचा मालक )   दोनही  रुलिंग मध्ये आहेत 

पण ' शनी '  रुलिंग मध्ये  आला की पहिले कॉम्बीनेशन सोडायचे असा  नियम आहे

पुढे चंद्र श्रवण नक्षत्रात असेल इथे , श्रवण नक्षत्राचा मालक  ' चंद्र ' रुलिंग मध्ये नाही . पुढे चंद्र  धनिष्ठा  नक्षत्रात येईल   धनिष्ठा नक्षत्र - मालक ' मंगळ ' आणि मकर रास - मालक ' शनी  '  दोघेही  रुलिंग मध्ये आहेत , हा दिवस असेल रविवार  ७ जून . चंद्र  संध्याकाळी  ४. नंतर  धनिष्ठा नक्षत्रात येत आहे . अर्थात रविवारी निकाल लावला जातोच असे नाही 
सोमवारी  दुपारी ३ पर्यंत धनिष्ठा नक्षत्र आहे ( सोमवारी पहाटे ३. नंतर ' कुंभ रास चालू होते, मात्र कुंभ राशीचा मालक ही शनीच आहे ) त्यामुळे  रविवार संध्याकाळी  ४ ते सोमवार दुपारी ३ पर्यंत निकाल लागेल अशी अपेक्षा 

असो , जेंव्हा केंव्हा निकाल लागेल तेंव्हा इथे अवश्य कळवीन , अगदी तारीख चुकली  असेल तरी 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
८ जून २०१५

आत्ता  या क्षणी म्हणजे  ८ जूनला  १६. २५ वाजलेत आणि अपेक्षित  निकाल अजून कळला नाही , याचा अर्थ  इतकाच वरील लिहिलेला अंदाज चुकला आहे . 


June 1, 2015

श्री साईनाथांची अकरा वचने


शिरडीस ज्याचे लागतील पाय | टळतील अपाय सर्व त्याचे ||१||
माझ्या समाधीची पायरी चढेल | दु:ख हे हरेल सर्व त्याचे ||२||
जरी हे शरीर गेलो मी टाकून | तरी मी धावेन भक्तांसाठी ||३||
नवसास माझी पावेल समाधी | धरा दृढ बुद्धी माझ्या ठायी ||४||
नित्य मी जीवंत जाणा हेचि सत्य | नित्य घ्या प्रचित अनुभवे ||५||
शरण मज आला आणि वाया गेला| दाखवा दाखवा ऐसा कोणी ||६||
जो जो मज भजे जैसा जैसा भावे | तैसा तैसा पावे मी ही त्यासी ||७||
तुमचा मी भार वाहीन सर्वथा | नव्हे हे अन्यथा वचन माझे ||८||
जाणा येथ आहे सहाय्य सर्वांस | मागे जे जे त्यास ते ते लाभे ||९||
माझा जो जाहला काया वाचा मनी | तयाचा मी ऋणी सर्वकाळ ||१०||


साई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या ठायी ||११||





श्री साद्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय