December 25, 2020

गीताजयंती

गीताजयंतीच्या शुभेच्छा...   



.
जय योगेश्वर
.
परब्रह्म साकार होऊनी आत्मज्ञान सांगती,
जाण मनुजा, जाण जाण रे, गीतेची महती |
.
आप्तजना त्या, समोर पाहून, युद्ध नकोशा पार्था जाणून,
परमपूज्य, पुरुषोत्तम प्रेमळ, स्वधर्म समजावती |
.
'पिंडी आणिक ब्रह्मांडी केवळ, आत्मतत्व विलसे,
ईशावास्यच सर्व जगत हे, भेदबुद्धी का असे? |
.
माहित नाही, पूजाविधी, अन्यदेव जरी भजती,
असेल श्रद्धाभाव तर ते, मलाच हो पूजती |
.
भक्तीने ते, ज्ञान मिळूनीया, भक्त मला मिळतो,
बुद्धीहीन अन, श्रद्धाहीन जो, नाशच तो पावतो |
.
नका   म्हणू हो  , मनुष्यधारी, परमेशाचे रूप,
प्रतीकांच्या त्या पलीकडचे सत्य अव्यक्त स्वरूप |
.
सोडून आशा कर्मफलाची, कर्मे आचरसी,
परमेशार्पण करसी ती मग, परम सिद्धी पावसी |
.
बुद्धीनेच अध्यात्म जाणणे क्लेशाचे आहे,
श्रद्धेने, अन भक्तीने ते, सहजसाध्य आहे |
.
विभूती जाणून माझी, जे जन, मजप्रती चित्त ठेविती,
मत्परायण होऊनी कर्मे करती , मलाच ते मिळती |
.
'निश्चय करूनी मला शरण ये, मिळव तू मुक्ती '
सुलभ मार्ग भक्तीचा हा, योगेश्वर वदती |
.
जाण मनुजा, जाण जाण रे, गीतेची महती |
.
.
(सौ. शैलजा शेवडे)

December 24, 2020

राम मंदिरासाठी देणगी

.आमचे सन्मित्र अंबरीश कुलकर्णी,पुणे यांची ही पोस्ट नक्कीच विचार करायला लावणारी
//
शेकडो वर्षांची इस्लामी राजवट, त्यानंतर ब्रिटिश कब्जा आणि
 स्वातंत्र्यानंतर काँग्रेसी गुलाम..

..अश्या शेकडो वर्षांच्या, अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर राम मंदिराची लढाई हिंदूंनी कायदेशीररीत्या जिंकली.

आता वेळ येत आहे मंदिर उभारणीची..हिंदू अस्मितेचे प्रतीक हे व्हॅटिकन किंवा मक्का यांच्या पेक्षा भव्य बनवण्याची !!

प्रत्येक रामभक्त हिंदूची इच्छा असेल आपला यथाशक्ती हातभार मंदिर निर्माणासाठी लागावा.

आणि त्या भावनेचा आदर करण्यासाठीच योग्य त्या संस्था लवकरच तुमच्या संपर्कात येतील.
(
मुस्लिम किमान २.५ टक्के उत्पन्न जकात म्हणून देतात, 
तर इसाई त्यापेक्षा अधिक.

हिंदूंना त्यांचा कोणताच धर्मग्रंथ टक्केवारी मागत नाही हे विशेष !!
)

हे सगळ निर्माण होत असताना, नेहमीचे छपरी कलाकार वेगवेगळे मुखवटे लावून गोंधळ माजवायचा प्रयत्न करतील:

 _शेकूलर भांड:_ मंदिर कशाला बांधायचं..
 _कम्युनिस्ट उंदीर:_ धर्म च नाही मानायचा तर देव कुठला..
 _अर्धवट बी/डी ग्रेड:_ आमी रावणाला मानणार..
 _चोरटे आणि भुरटे_ : आम्हीच ते, द्या पैसे
.......

या आणि अश्या अनेक धोक्यापासून सावध राहून निर्माण कार्य करायचं आहे.

 *या निमित्ताने संपूर्ण हिंदू समाज एकत्र येतो आहे आणि हेच विघातक लोकांना नको आहे.* 

पाच / दहा इंडस्ट्री हाऊसेस कडून लागणारा निधी सहज उभारता येतो 
(आख्ख बिर्ला मंदिर एकाने बांधलंय..),

पण त्यात तुमचा आमचा वाटा नसेल.

म्हणूनच ही एक Once in a lifetime संधी आहे आपल्यासाठी !!!


जय श्री राम 🚩🙏🏼🚩

अंबरीश कुलकर्णी, पुणे
//

December 22, 2020

गुरु- शनी युती

.गुरु - शनी भेट
//
शनीदेवाच्या भेटी
गुरु महाराज आले
हा रंगला सोहळा! मकरेत!

जाहली दोघांची, सहा अंशी भेट
कर्माचे ते भाग्य, लाभस्थानी

गुरु म्हणे देवा, तुझे कर्म थोर
साडेसातीचे सार, दाखवू दिले

शनीदेव म्हणे, एक ते राहिले
तुला जे पूजीले, क्षणोक्षणी 

पुढे गुरुला म्हणती,तुझ्या तीन दृष्टी
ज्या वर पडती, तो पुण्यवान

गुरु म्हणे महाराज, वृथा हे कौतुक
अहंकाराची बात, तुम्ही जाणो

एक एक ग्रह, आपुल्याच घरी
ठेऊन अंतरी , दृष्य पाहे

दोघे मिळोनिया, राहती काही निशा
कवतिक आकाशा, आवरेना


//
🪐🌕
आज २१ डिसेंबरला  गुरू-शनि युती मकर राशीत म्हणजेच शनीच्या गृही होत आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत 'गुरु' हा भाग्य स्थानाचा (९) तर 'शनी' कर्म स्थानाचा (१०)कारक ग्रह आहे.

कर्माला, भाग्याची साथ मिळाली की अनेक गोष्टीत सुयश  मिळते. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात
जसे उत्तम गीतकाराला , उत्तम संगीतकाराची साथ मिळाली की एक छान आविष्कार ऐकायला मिळतो अगदी तसेच. यातील एकजण जरी कमी पडला तरी अपेक्षित परिणाम साधत नाही.

ही गुरू-शनि  युती तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आपले कर्म आणि आपले भाग्य याचा एकत्रीत चांगला परिणाम घडवून आणो ही सदिच्छा 🙏💐

(शुभेच्छूक ) अमोल
२१/१२/२०

December 12, 2020

देवा तुझ्या द्वारी आलो

( १२ डिसेंबर २०२० , प्रभादेवी सिध्दिविनायक मंदिर ) 

दर्शनाचा हवा असलेला ७ ते ८ हा स्लॉट न मिळता ८ ते ९ हा स्लॉट मिळत होता. काय करायचे ? ८ ते ९ मध्ये किती वेळ लागेल ? ९ पर्यत ऑफीसला पोहोचता येईल का असा विचारविनिमय आमच्या नेहमीच्या ऑफीस मेम्बर्सचा चालू होता. शेवटी तब्बल१० महिन्यांनी मिळालेली संधी न सोडता ८ ते ९ तर ८ ते ९ आधी बुकींग करू म्हणून प्रत्येकाने आपल्या मोबाबाईलवर बुकींगची पुष्टी केली आणि निर्धास्त झालो. 

तस पहायला गेल तर गेली अनेक वर्ष महिन्यातील एका शनिवारी सकाळी लवकर निघून मुंबईत धार्मिक स्थळांना भेट हा आमचा नियमित कार्यक्रम असायचा जो अर्थातच गेले १० महिने खंडीत झालेला. सगळ्यात पाॅप्युलर किंवा जास्ती जास्त आम्ही जायचो तो दर्शन मार्ग म्हणजे  प्रभादेवीचा सिध्दिविनायक  - महालक्ष्मी  मंदिरातील ७ ची आरती आणि ऑफीसला ९ ला परत . त्याखालोखाल  प्रभादेवी सिद्धिविनायक - सेना भवन जवळील स्वामी समर्थ मठ - वडाळा राम मंदिर, विठ्ठल मंदिर  आणि परत हा एक पर्यायी मार्ग . किंवा वर्षातून एकदा बाबुलनाथ, मुंबादेवी किंवा गिरगावचे फडके मंदीर. गेले अनेक वर्ष सुरु असलेली पण मध्यतंरी कोविड संकटाने बंद झालेली आमची धार्मिक वारी  आज विशाखा नक्षत्रावर   " पुनःश्च हरी ॐ " म्हणून सुरु झाली.

 नियोजित वेळेच्या पाऊण तास आधी पोहोचलो. वेळेआधी आत सोडायला सुरक्षारक्षकाने नकार दिला कारण QR कोड प्रणालीने वेळेआधी दरवाजा उघडला जाणार नव्हता. आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करणे क्रमप्राप्त होते. दरम्यान ७ ते ८ दर्शन वेळेतला मुंबईकर भाविक अगदी ७.५५ वाजता ही आलेले पाहून त्यांच्या टाइम मॅनेजमेंटचे कौतुक वाटले 

शेवटी  ती घटिका आली. ' भेटी लागे जीवा लागलीसी आस '  आठ वाजता मोबाईल स्कॅन होऊन  आम्ही ' देवाच्या द्वारी   आलो .  दर्शन मार्गात  बदल केला होता. मारुती मंदिराच्या बाजूने रांग नेली होती . अंतरा  अंतरावर उभे रहायचे स्टिकर होते पण गर्दी नसल्याने  थांबाव लागत नव्हतं.  नेहमी जसे सरळ  गाभा-यात प्रवेशतो ते मात्र बंद केलेले. प्रमुख दरवाजा समोर उभे राहून दर्शन घेऊन परत बाहेर पडायचे अशी सोय केली होती.
३ ते ४ मिनिट लागली फक्त. प्रदक्षिणा  नाही, तिथे बसून गणपती अथर्वशीर्ष नाही , आणि लाडक्या उंदीर मामाच्या कानात  केलेली हितगुजही नाही. फक्त क्षणभर त्या  सिध्दिविनायका समोर नतमस्तक होता आले. आलेल्या परिस्थितीत निभावून नेण्याचे बळ दिल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि आज भले ३ मिनिट आलो असेन उद्या किमान ३० मिनिटासाठी  "मी  परत येईन " हा आशावाद ही व्यक्त केला . बाकी त्यालाच काळजी. 

" पुनश्च हरी ॐ"   होण्यासाठी एवढं  ही पुरेस आहे. यानिमित्याने  नवी मुंबईहून - मुंबईला १० महिन्यानंतर आलो. आपली लाडकी मैत्रीण खूप दिवसांनी भेटणार म्हणल्यावर जी उत्सुकता असते अगदी तशीच उत्सुकता मुंबईला जाणार म्हणल्यावर होती. अनेक  गोष्टी बदलल्या होत्या. सुरवात अगदी वाशी टोल नाक्यापासूनच झाली. 'फास्ट टॅग' प्रणाली मुंबई टोल नाक्यावरही सुरु झाल्याने कस झुपुक करुन गेलो. वाशी खाडीपूल जरा अंधारातच पास झाला पण हा मुंबई, नवी मुंबई जोडणारा सामायिक दुवा नेहमीच विलोभनीय वाटतो. मुंबई मेट्रोची कामे अगदी मानखुर्द/ BARC  पर्यत आली होती. चेंबूरच्या शिवाजी महाराज प्रवेशद्वारापाशी महाराजांना मुजरा करून डाव्या बाजूला 'आर् के स्टुडिओ' च्या काही खुणा दिसतात का हे  बघून सरळ  मैत्री पार्कला 
 ' अशोका ट्रँव्हल्सच्या '  मागे गाडी थांबवली.  गाडी नं MH ०९ असल्याने  ही गाडी सांगली/कोल्हापूरची असणार हे लक्षात आले. साखर झोपेतील प्रवासी आरामात उतरत होते त्यामुळे  वेळही जात होता. पण आपल्यांसाठी हे सहन करावेसे वाटले. (MH १२ ची गाडी पुढे असती तर काय केले असते हे आत्ता सांगू शकत नाही. कदाचित हाॅर्न वाजून धिंगाणा घातला असता).पुढे प्रियदर्शिनीला  ठाण्याहून येणारा रस्ता मिळतो. कंपनीच्या सिध्दिविनायक पदयात्रेसाठी याच रोडवरून आपण रात्री १ च्या सुमारास इथे पोहोचायचो हे आठवले. चुनाभट्टी आल्यावर अरे हा तर कलानगर, बिकेसीला जाणारा नवीन  उडडाणपूल! आपलं अजून जायचं राहिला आहे याची जाणीव झाली. दादरच्या टिळक पुलावर पोहोचल्यावर सकाळच्या बाजाराने झालेले ट्रॅफिक जाम , कबुतरखान्याच्याआधी लागलेल्या देवळाला अर्धी प्रदक्षिणा मारून पोर्तुगीज चर्च दिशेने मार्गक्रमण, शेवटी मंदिराच्या थोडं आधी सुरक्षित मिळालेलं पार्किग, दर्शन झाल्यावर परतीच्या प्रवासात ऐरोलीला  'कृष्णा भोग' येथे घेतलेला नेवैद्य/पोटपूजा आणि अगदी ९ नाही पण थोडं पुढे कामाच्या ठिकाणी पोहोचणे 

म्हणलं तर फक्त  ३ मिनिटाचे दर्शन झाले म्हणलं तर ३ तास. विचार आपला आपला 
शेवटी भाव तसा देव कारण

ॐकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाड-वेली- पानासंग फुल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा, गरीबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उध्दार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची  माया , 
मोरया. मोरया .मोरया . मोरया 

🙏🌺
( भक्त ) अमोल 
१२/१२/२०२०
#देवा तुझ्या द्वारी आलो 
www.kelkaramol.blogspot.com 

October 24, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝-भाग ६

.गीतरामायणातील निवेदन 📝-भाग ६
#दसरा विशेष 
---------------------------
"आज का निष्फळ होती बाण?'

- श्रीरामासारख्या समर्थ वीराच्या तोंडचे हे उद्गार ऐकून,इंद्रसारथी मातली किंचित् हंसला आणि म्हणाला,"प्रभो, असे न समजल्यासारखे काय बोलतां? त्याच्या वधाकरितांं पितामहास्त्राचा प्रयोग करा. देवांनी जो रावणाच्या मृत्यूचा काल सांगून ठेवला आहे,तो आता समीप आला आहे."

मातलीच्या ह्या भाषणाने श्रीरामांना जणू स्मरण आलें आणि अगस्ती ऋषींनी दिलेला दैदीप्यमान् बाण त्यांनी धनुष्याला लावला. आकर्ण प्रत्यचा ओढून त्यांनी तो बाण 🏹 महाप्रतापी रावणाच्या दिशेने सोडला. तो दु:सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण,रावणाच्या वक्ष:स्थलांत जाऊन घुसला. त्याने रावणाचे हृदय शतश: विदीर्ण करुन टाकले. बाणाचा प्रहार होताच,जीविताला मुकणा-या त्या रावणाच्या हातून धनुष्यबाणहि खाली पडले.तो महातेजस्वी राक्षसपति भूमीवर कोसळला. राक्षससैन्य वाट फुटेल तिकडे धावत सुटलें. वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला. सारे वानरगण, "रावण मेला, रामाचा जय झाला," असे म्हणत आनंदाने नाचू लागले. अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौबती वाजू लागल्या. रामाच्या रथावर स्वर्गातून पु्ष्पवृष्टि होऊं लागली. अप्सरा आणि गंधर्व यांचे विजयगीत कानीं येऊं लागले.

*देवहो, बघा रामलीला*
*भूवरी रावणवध झाला*
🙏🏻🌷

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
गीतरामायण  गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------




 

September 13, 2020

ग्रहांकीत १३ सप्टेंबर २०२०

  तब्बल ६ ग्रह स्वत:च्या राशीत, ३ ग्रह वर्गोत्तम





August 22, 2020

धन्य_तुम्हारो_दर्शन_मेरा_मन_रमता

#धन्य_तुम्हारो_दर्शन_मेरा_मन_रमता



खूप छान वाटलं आज. गेल्या ५ एक संकष्ट्या, आणि २० एक मंगळवार तुझ्या दर्शनासाठी आम्ही रांग लावू शकलो नाही. परिस्थितीच अशी आलीय. पण सालाबादाप्रमाणे तू मात्र आज प्रत्येकाच्या घरी एव्हान स्थानापन्न झाला आहेस. जमेल तशी तयारी, सजावट, मिळतील तशी फूले ,फळे, जमेल ते साहित्य घेऊन सगळ्यांनी यथा शक्ती यथा ज्ञाने तुझी सेवा केली आहेच, कुठे काही कमी झालं असलं तरी तू रागावणार नाहीस याची खात्रीच आहे. कारण त्यामागची भावना महत्वाची आहे.

"भाव तिथे देव "

यंदा अनेकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. अनेकांनी आपल्या हातांनी तुझे ॐ कार स्वरुप घडविले. काहींनी शब्द,काव्य,चित्र, स्वर,हस्तकला या माध्यमातून तुझी सेवा केली. खरं म्हणजे या गोष्टी कळण्यासारख्या असतात पण इतर ही अनेक कलेतून/ गोष्टीतून  इतरांनी तुझी आळवणी केली असेल पण ते सहजा सहजी आमच्या लक्षात आले नाही. पण तुझे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी नक्की असतील. उगाच नाही ६४ कलांचा तुला अधिपती म्हणतात

यातील काही कला मात्र सध्या थोड्या बदल्यात बरं का बाप्पा , म्हणजे हे माझं मतं.

संपाठ्य ही कला. - म्हणजे
 दुस-याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे करणे ( या कलेत थोडस बदल झालाय. आज आम्हीफक्त दुस-याचे बोलणे/ लिहिणे जसेच्या तसे पुढे ढकलतो. किंवा नुसतेच हसतो)

"म्लेंछीतकला विकल्प"- परकीय भाषा ठाऊक असणे. 
👆🏻हे मात्र इमाने इतबारे अंमलात आणतोय 

किंवा एकवेळ

 "शुकसारिका प्रलापन"- पोपट व मैना यांना मानवी बोली शिकवणे. इथे पोपट, मैना एवजी  डाॅग, कॅट ला शिकवतोय.

पण बाप्पा या गडबडीत समभाषीक मित्रांबरोबर स्वभाषेत बोलणे/ लिहिणे हेच विसरलोय.जिथे तिथे परकीय भाषा एकमेकांशी संभाषणात पण.

बाप्पा गेल्या काही महिन्यात 'चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया' 
( उत्तम स्वयंपाक करणे)  ही कला ही अनेकांनी करुन दाखवली मुख्य म्हणजे घरातील प्रत्येकाने या कामात हिरिरीने भाग घेतला. त्यातही मध्यंतरी डॅल्गोना काॅफीची " पानक रस तथा रागषाडव योजना" - (सरबत व इतर पेय तयार करणे) ही कला ही अनेक कलाकारांनी शिकून घेतली.

देवा, या ६४ कलांचा उल्लेख कुठल्या क्रमाने घ्यायचा याची कल्पना नाही पण दोन तीन संदर्भ बघितले असता

५६ नंबर वर 💪🏻 . नाट्य आख्यायिकादर्शन-  असं होतं. 

हे वरच उदाहरण म्हणजे 
वाचणा-यांसाठी एक "प्रहेलिका" च आहे. त्याचा अर्थ  या कलेचे खरे "भक्तच" जाणतील 😎

विनायका,
  "वैनायिकी विद्याज्ञान","अभिधान कोष छंदोज्ञान", "मानसी काव्यक्रिया " ," दुर्वाच योग" या कलेमधे तुझ्या कृपेने गोडी लागो ही सदिच्छा मात्र
" पुष्पशकटिका निमित्त ज्ञान " कलेत मात्र तुझ्या कृपेने यश मिळो ही तुझ्या चरणी प्रार्थना

या असंख्य कलेत प्राविण्य मिळवलेले कलाकार , यांची सुरवात ही एखाद्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमातून तुझ्या कृपा-आशिर्वादानेच झाली असणार यात शंका नाही.

यासगळ्यांवर तसेच आमच्या सारख्या "शब्द-कारांवर" तुझा वरद-हस्त कायम राहो.

तुझे नुसते दर्शन झाल्यावर मनातील सर्व इच्छा पुर्ण होतात म्हणूनच तुझ्या आरतीत 
" दर्शन मात्रे नाम कामनापुर्ती" असे म्हणले आहे.

वय्यक्तिक मागणे जसे सर्वजण तुझ्याकडे करतीलच तसेच सर्वजण आज संपूर्ण  'विश्वाचे मंगल ' होऊ दे आणि सध्याचे संकट टळू दे ही मागणी ही करत असतील.

योग्य वेळी तू सर्वांना म्हणणारच आहेस "तथास्तु " 🙏🏻🌺

📝अमोल केळकर
भाद्रपद शु. चतुर्थी

#सादर करितो कला गजमुखा

August 18, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग ५

गीतरामायणातील निवेदन 📝

भाग ५
---------------------------
"सावळा ग रामचंद्र"
- महाराणी कौसल्येचा 'सावळा रामचंद्र ' दिसामासांनी वाढला.बालवयातच त्याने धनुर्विद्या आत्मसात केली.धार्मिक ग्रंथ अभ्यासले.आता तो राज्यसभेंत येऊन बसूं लागला. त्याच्या समवेत लक्ष्मणादि त्याची लहान भावंडेंही निष्णात झालीं.एके प्रसंगी,राजा दशरथ पुत्रांसहवर्तमान राजसभेंत बसला असतां,महर्षी विश्वामित्र तेथे आले. राजाने त्यांचे आनंदाने स्वागत केले,आणि नम्रपणे विचारले, " मुनिवर्य, काय कार्य असेल तें सांगा, मी तें सर्वस्वी शेवटास नेईन."
राजाच्या ह्या भाषणाने अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले-

🎼 जेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा
यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com


गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------

August 12, 2020

जय श्री कृष्ण

जय श्री कृष्ण 🙏🏼🚩🙏🏼


हुशार आणि practical मानतो आपण कृष्णाचा अवतार !

जिथे धर्म रक्षणासाठी हिंसा आवश्यक आहे तिथे तो गरबा खेळत नाही बसला,

जिथे युद्धासाठी क्षात्र वृत्ती जागवायची होती तिथे तो कौरवांच्या हृदय परिवर्तनाची वाट नाही बघत बसला,

त्याने यदा यदा ही धर्मस्य.. सांगितलं 

म्हणजे तुम्ही घरात तुमच्या पुरत बघा, बाकी धर्म वगैरे मी बघून घेतो नव्हे ,

तर जेव्हा जेव्हा धर्मावर आक्रमण होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला कृष्ण अवतार धारण करावा लागेल , हे आपल्याला उमजाव लागेल.

अश्याच एका आजच्या कृष्णाची, राजीव मल्होत्राची, ही मुलाखत बघा - एका माजी लष्करी आणि intelligence खात्यात काम केलेल्या ऑफिसर बरोबर 

( खालील दुव्यावर टिचकी मारल्यास, मुलाखत ऐकता/पाहता येईल)











- अंबरीश कुलकर्णी, पुणे

August 11, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग ४

. गीतरामायणातील निवेदन 📝

भाग ४
---------------------------
"त्यांच्या पोटी जन्मा येतिल योध्दे चार महान "
- हे यज्ञपुरुषाचें वचन खरें ठरलें. त्या पायसच्या सेवनाने दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या.यथाकांली त्या प्रसूत झाल्या.कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकयीला भरत असे चार पुत्र झाले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रसादांतील सुखाला सीमा राहिल्या नाहींत. नगरजनांचा आनंद तर, नुसता भरुन ओसंडत होता. श्रीरामादिक भावंडे रांगूं लागली,तरीहि अयोध्येतील स्त्रिया श्रीरामजन्माचे आनंदगीतच गात होत्या....
पुन: पुन: गात होत्या...
🎼
दोन प्रहरिं,कां ग शिंरी सूर्य थांबला?
राम जन्मला-ग सखी- राम जन्मला

या आनंदगीतांतच अयोध्या मग्न होती. प्रासादांत,श्रीराम दिसामासांनी वाढत होते.ते आतां चालूं लागले होते. बोबडे बोबडे बोलूं लागले होते. महाराणी कौसल्या, भगिनीसमान असलेल्या सवतींना कौतुकाने सांगत होती-
🎼
सावळा ग रामचंद्र...

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com


गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------

August 10, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग ३

गीतरामायणातील निवेदन 📝

भाग ३
---------------------------
"उगा कां काळिज माझे उलें?  पाहुनी वेलीवरची फुले"
- महाराणी कौसल्या अशा चमत्कारिक मन:स्थितींत असतांनाच, महाराज दशरथ अंत:पुरांत आले. आपल्या लाडक्या राणीला ते सांगूं लागले.
🎼
उदास कां तू?  आंवर वेडे,
 नयनांतिल पाणी
लाडके, कौसल्ये राणी.

सरयूतीरीं यज्ञ करुं गे, मुक्त करांनी दान करुं
शेवटचा हा यत्न करुं गे, अंतीं अवभृत स्नान करुं
इप्सित तें तो देईल अग्नि,अनंत हातांनी


" इप्सित तें तो देईल अग्नि,अनंत हातांनी"
- या इच्छेने दशरथाने यज्ञाश्व सोडला,पुढें एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला.राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगानें यज्ञ मांडला.एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेंतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला,आणि दुंदुभीसारख्या कणखर पण मधुर सादानें तो राजा दशरथाला म्हणाला-

🎼
दशरथा, घे हें पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलों हा माझा सन्मान

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com


गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच. उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच  दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------

August 9, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग २


---------------------------
*श्रीरामांच्या यज्ञमंडपात,प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठायीं एकवटून श्रोतेजन ऐकत आहेत*. *सुवर्ण- सिंहासनावर बसून,प्रत्यक्ष श्रीराम* 
*ऐकत असताना तापस - वेष परिधान केलेले राजपुत्र कुश आणि लव रामचरित्राचे गायन करीत आहेत*
🎼
सरयू- तीरावरी 
अयोध्या मनुनिर्मित नगरी

राजसौख्य ते सौख्य जनांचे
एकच चिंतन लक्ष मनांचे
काय काज या सौख्य,धनांचे?
कल्पतरुला फूल नसे का? वसंत सरला तरी


*"कल्पतरुला फूल नसे का? वसंत सरला तरी"*
 *प्रजाजनांना सर्व सुखांनी न्हाऊ घालणा-या दशरथाच्या घरात पाळणा हलू नये, हा केवढा दैवदुर्विलास! अयोध्येच्या प्रत्येक जाणत्या प्रजाजनाच्या मनात हा प्रश्ण वारंवार उठत होता मग दशरथाच्या राण्यांची काय अवस्था असेल? कौसल्या,वरुन ग्रीष्मकालीन नदीसारखी थोडी अशक्त, तरीही शांतच होती.पण मनात ती काय म्हणत होती?*
🎼
उगा कां काळिज माझे उलें
पाहुनी वेलींवरची फुलें

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com

गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच. उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩

गीतरामायणातील निवेदन भाग १

गीतरामायणातील निवेदन 📝

गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच. उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩

----------------------------------------
भाग १:

श्रीरामचंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी, अयोध्येत माणसांचा महासागर जमला होता.तापसवेष धारण केलेले दोन बटु मंडपात आले. ते म्हणाले,

"आम्ही महर्षी वाल्मिकीचे शिष्य आहोत. आम्ही रामचरित्र गायन करतों ".

श्रीरामांना माहीत नव्हतें की आपल्यासमोर आपल्या चरित्राचें गायन करणारे हे बटु आपलेच पुत्र आहेत.
🎼
स्वयें श्रीरामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com

July 17, 2020

श्रीरामपाठ (मृगशीर्ष नक्षत्र )

श्रीरामपाठ (मृगशीर्ष नक्षत्र )
.

July 16, 2020

श्रीरामपाठ ( रोहिणी नक्षत्र )

श्रीरामपाठ ( रोहिणी नक्षत्र )
.

June 17, 2020

सावरकर , शनिदेव , कंदिल आणि चप्पल

सावरकर , शनिदेव , कंदिल आणि चप्पल

!
-------------------------
आणि  एक जोतिषी

आज सकाळी माझ्या मित्राने वरचा मथळा असलेला लेख पाठवला जो आतापर्यंत अनेकांनी वाचला असेल ( नसेल तर कळ काढा थोडी, मिळेल वाचायला)  आणि विचारले तुझे मत सांग.

माझे उत्तर:
त्यांना झालेली शिक्षा हे त्यांच्या पत्रिकेतले योग होते. जोतिष अभ्यासक्रमात किंवा अनेक पुस्तकात त्यांच्या पत्रिकेतील ग्रहयोग समजावून सांगतात

त्यांना झालेली कैद कदाचित  साडेसातीत पण झाली असेल (  हे शोधता ही येईल ) देवाधीदेवांना साडेसाती चुकली नाही, सावरकरांना तर कशी चुकेल.

मित्र म्हणाला, म्हणजे सावरकरांनी जर shani महात्म्य रोज वाचले असते तर त्यांना जन्मठेप झाली नसती असे का ?

म्हणलं नाही, पण त्यांनी वरचे कंदील पुराण नक्की लिहिले नसते.

त्याला पुढे हे ही सांगितले की
*Jokes apart*

सावरकरांचा ग्रह ता-यांवर विश्वास नव्हता. *त्यांच्या या मताचा एक जोतिषी म्हणून आपण स्विकार करायचा* , पण त्यांच्या पत्रिकेतील ग्रहांनी त्यांच्या जीवनात जी स्थित्यंतरे घडवली त्याचा परत परत अभ्यास करायचा कारण शास्त्रात दिलेल्या अनेक नियमांची प्रचीती सावरकरांच्या पत्रिकेतून येते.



( सावरकरप्रेमी जोतिष अभ्यासक)  अमोल 📝

June 7, 2020

शिवराज्याभिषेक दिन - व्याख्यान, श्री गजानन मेहेंदळे


श्री गजानन मेहेंदळे यांनी 'शिवराज्याभिषेक दिना निमित्याने नुकतेच दिलेले एक व्याख्यान माझ्या या अनुदिनीवर देत आहे. सदर माहिती अधिकाधिक जनांपर्यंत पोहोचावी हा या मागचा उद्देश आहे.. हे करताना या कार्यक्रमाचे आयोजक 'ई व्याख्यानमला ' यांच्याकडून रितसर परवानगी घेतलेली आहे.

यानिमित्ताने मी माझा ब्लाॅग मित्र 'सुनील कुलकर्णी ' ला आवाहन करतो की त्याने हे सदर व्याख्यान आपल्या अनुदिनीवर लावावे आणि ही साखळी पुढे चालू ठेवावी.

आपण ही हे व्याख्यान ऐकून, आपल्या परिचीत ब्लाॅग लेखकास त्याच्या ब्लाॅगवर लावण्याची विनंती / आग्रह करु शकता

धन्यवाद
अमोल केळकर

May 9, 2020

झूम मिटींग

.आज शनिवार ९ मे. आज दिवसभर 'जेष्ठा' नक्षत्र आहे. बुधाचे हे नक्षत्र,  बुध एक गोष्ट परत परत घडवतो. तसेच शनि जो विलंबाचा कारक ग्रह तो ही शनिवार असल्याने संपूर्ण दिवस रुलिंग मधे असेल

 याचा परिणाम

जे 'झूम/ मायक्रोसाॅफ्ट टिम/ व्हाटसप-फेसबुक व्हिडिओ -आॅडिओ काॅल द्वारे मिटिंग्स/ किंवा कुठले कार्यक्रम करतील त्यांना

१) उशीराने लाॅग - इन होणे
२) सारखं नेटवर्क डिस्कनेट होणे
३) परत परत लाॅग इन करायला लागणे
४) मिटींग आयडी- पासवर्ड चुकीचा टाकला जाऊन हीच क्रिया परत करायला लागणे
५) आवाज निट ऐकू न येणे
६) मोबाईल/ संगणक सारखा हँग होणे.

यापैकी ☝🏼 अनेक गोष्टी घडू शकतात.

तुम्ही म्हणाल यात काय नवीन हे तर प्रत्येक मिटींगला होतेच पण *आज याची वारंवारता आणि तीव्रता* जास्त असेल

आपणास असा अनुभव आल्यास आपली प्रतिक्रिया अवश्य
 a.kelkar9@gmail.com
 या इमेल वर देऊन ठेवा

धन्यवाद
( तांत्रिक)  अमोल 📝
०९/०५/२०२०

April 24, 2020

.डाॅ.प्र.न.जोशी ( २४/४/१९२४ सकाळी १०वा)
प्राध्यापक, साहित्यिक
शुक्र- नेप लाभ, शुक्र-गुरु प्रतियोग, गुरु-नेप नवपंचम

नवमांश कुंडली

लग्न कुंडली

April 20, 2020

पत्रिका अभ्यास : सोनोपंत दांडेकर

.वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर
२०/०४/१८९६, वेळ दु. २:१५, केळवे
( पत्रिक साभार: महाराष्ट्राचा कुंडली संग्रह, लेखक : व.दा/ म.दा भट)

चंद्र गुरु कर्के चे व्ययात.गुरु पंचमेश उच्च राशीत,लग्नेश भाग्यात उच्च, शनी शुक्र उच्चीचे
चंद्र हर्षल नवपंचम


April 19, 2020

पत्रिका अभ्यास : १९ एप्रिल

पत्रिका अभ्यास : डाॅ के ना वाटवे
संस्कृतचे गाढे अभ्यासक, प्राध्यापक

April 14, 2020

ज्योतिष - एक दैवी शास्त्र

.
नमस्कार,

मी स्वतः एक जोतिष अभ्यासक आहे. 'करोना' संकटा बाबत पूर्व कल्पना देता आली नाही म्हणून नुकताच 'अं नि स ' ने जोतिषांचा निषेध केला आहे. याबाबत माझे थोडे विचार

सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की कुठल्याच जोतिषीचे १००% भविष्य ,प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगात बरोबर/ खरे होते असे नाही.  कारण एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही ती म्हणजे हे एक "दैवी" शास्त्र आहे.
जोतिषी सगळं १००% अचूक सांगायला लागले तर परमेश्वर ही संकल्पनाच निघून जाईल. लोक  जोतिषीलाच देव बनवतील .पण प्रत्यक्षात तसे होत का?  याचा अर्थ काही गोष्टी देव/ दैव यांच्या हातात आहेत.

कितीही मोठे प्राविण्य मिळवलेले, MD डाॅक्टर पण 'आता सगळं देवाच्या हाती' असं म्हणत नाहीत का? म्हणतात ना? याचा अर्थ ते स्वतः कुठे प्रयत्नात कमी पडले का?  तर अजिबात नाही. त्यांनी त्यांचे पूर्ण प्रयत्न केले पण शेवटी 'त्याची' मर्जी
मग हे जोतिषां बाबतीत का स्विकारायचे नाही?

दुसरा एक महत्वाचा मुद्दा विसरला जातोय की माणूस आजारी पडल्यावर डाॅक्टर कडे जातो. मग डाॅक्टर त्याला पाहून तपासून निदान, औषधोपचार करतात.

तसेच जोपर्यंत एखादा जातक स्वत: एखादी अडचण घेऊन जोतिषा कडे जात नाही तोपर्यंत जोतिष्याने काहीही सांगू नये हा शास्त्र संकेत आहे. कारण तो ज्या वेळेला जोतिषाकडे जातो त्यावेळची ग्रहस्थितीत त्याच्या अनेक प्रश्णांची उत्तरे दडलेली असतात.  म्हणून जातकाची कळकळ/ उत्तर जाणून घ्यायची वेळ हे सगळ महत्वाचे असते

उगाच दिसला डाॅक्टर विचार तब्येतीबद्दल किंवा दिसला जोतिषी दाखव हात/ पत्रिका हे चुकीचेच

राहिली गोष्ट पुढे घडणाऱ्या जागतिक आपत्ती बाबत भविष्य वर्तवणे.
तर 'मेदनीय जोतिष' हा एक प्रकार यात आहे. अनिस ला विनंती आहे की त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करुन जसे 'हवामान खात्याचा ' स्वतंत्र विभाग आहे तसा या शास्त्राचा अभ्यास करणा-यांची एक समिती नेमून हा विभाग चालू करावा, अधिक अभ्यासाठी निधी द्यावा, आणि मग उत्तरे चुकली तर जरुर निषेध करावा जसा वेळोवेळी तुम्ही हवामान खात्याच्या चुकीच्या भकिताचा,  शास्त्रज्ञ, मेडीकल सायन्सच्या अपयशाचा करता

माझे हे विचार संपवता संपवता एक गोष्ट, नुकताच एका जोतिषांनी  'भूकंपाबद्दल भकित वर्तवले होते ' जे खरे ठरले. जमलं तर या किंवा अशा अनेक असंघटीत छोट्या मोठ्या जोतिषांचे जे अंदाज बरोबर येतात त्यांचा एखादा तरी अभिनंदनाचा ठराव मांडाल ना, भाऊ 💐

📝( जोतिष अभ्यासक) अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com


March 13, 2020

हर्षल

प्रिय हर्षल,

सर्वप्रथम तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा 📝

खरं म्हणजे कालच १२ मार्चला 'आजचे दिनविशेष ' या रेडिओ वरच्या कार्यक्रमात तूझा वाढदिवस ( तेही १९७२ वगैरे साल) म्हणून सांगितले गेले. पण तूझा वाढदिवस आजच. १३ मार्च १७८१ ला "विल्यम हर्षल" ने तूला शोधले. 'बुध' ग्रहाची विस्तारित आवृत्ती म्हणजे तू. म्हणूनच वाढदिवसाच्या तारखेत ही 'संभ्रमावस्था' ही खरंच तूलाच शोभून दिसली. असो.

पाश्चिमात्य खगोलशास्त्रज्ञाने तूला शोधून त्याचेच नाव तूला दिले गेले. 'यूरेनस' असेही तुझे इंग्रजी नाव आहे. पण इकडच्यांनी पण तूला खास नावं दिली आहेत

प्रजापती- कै. जनार्दन मोडक यांनी केलेले नामकरण

अरुण -कै. व्यंकटेश केतकर यांनी दिलेले नाव

खरं म्हणजे ९ ग्रहांच्या कारकत्वा पलीकडे पहायची अजूनही
ब-याच जणांना सवय नाही म्हणूनच की काय तू, वरुण ( नेपच्यून)  आणि यम ( प्लूटो)  या ग्रहांचा जातकाच्या एकंदर  जीवनात होणा-या घडामोडींबद्दल फारसे लिहिलेले नाही ( काही अपवाद वगळता) . मुख्य म्हणजे महा-दशेत ही तुम्हाला स्थान नाही. पण जीवनातील अनेक महत्वाच्या मुख्यत: विचित्र घडामोडीं घडण्यात तुमचा वाटा आहे.

पत्रिकेतील १२ राशीत/ १२ स्थानातून  नक्की कुठे, कसा , कुणाबरोबर तू  उपस्थित असता जातकाला 'हर्ष ' होईल हे कळणे थोडे अवघडच. कारण मुळातच तुझी गणना पापग्रहात झाली आहे . तरीही एका राशीत ७ वर्षे काढणारा तू, विविध ग्रहांशी योगात काय विविध चमत्कार करतोस हे अभ्यासणे ही एक मोठी गोष्ट वाटते.

काही उदाहरणे

अल्बर्ट आईनस्टाईनच्या कुंडलीतील बुध ग्रहाच्या त्रिकोणयोगातील 'हर्षल ' सापेक्ष सिध्दांत मांडतो.

न्यूटनच्या कुंडलीतील गुरुच्या त्रिकोण योगातील हर्षल ' गुरूत्वाकर्षणाचा ' शोध लावतो

तर एडीसनच्या कुंडलीत गुरुच्या लाभयोगातील हर्षल जगाला तारायंत्राच्या विश्वात नेऊन सोडतो.

महर्षी धोंडो केशव कर्वे - शनी सारखा परंपरा सांभाळणारा पुराणमतवादी ग्रह हर्षल बरोबर लाभयोगात. त्याकाळात जुन्या परंपरांचे आव्हान स्विकारुन विधवा- विवाह केला

पंडीता रमाबाई - शनी हर्षल लाभयोग. बिपिन मेधावी यांच्याशी रजिस्टर पद्धतीने विवाह, नंतर विलायतेत मुलीसह ख्रिस्ती धर्माची शिक्षा

गो.ग.आगरकर - रवि हर्षल लाभयोग. सर्व अंधश्रध्दा, ओंगळ रुढि व अविवेकी परंपरा यावर सुधारक पत्रातून टिका

थोडक्यात श्राध्द व श्रावणी न करणारे, देव न मानणारे, सोयर सुतक न पाळणारे, आंतरजातीय विवाह करणारे छोटे मोठे सुधारक तूझ्या अंमलाखाली येतात.

म.दा भट यांनी तुझ्याबद्दल एका पुस्तकात लिहिले आहे.
हा हर्षल मोठा स्फोटक ग्रह आहे. हायड्रोजन सारख्या स्फोटक वायूची हर्षल देवता आहे. मोठा चौकस व बुध्दिमान ग्रह आहे.
ब-याच वेळा हा चौकसपणा विघ्नसंतोषी असतो. काही तरी विचित्र करावयाचे, उडी  मारायची, नाश झाला तरी चालेल, आगे कूच करावयाची.

सर्व नवीन संहारक अस्त्रे तूझ्याच अंमलाखाली येतात. याचा उपयोग शेवटी जगाच्या कल्याणासाठी करायचा की संहारासाठी हे सर्व तुझ्या लहरीपणावर अवलंबून.

अतिरेकी स्वार्थामुळे, अविवेकामुळे वा सत्तास्पर्धेमुळे हा हर्षल रुद्र रुप धारण करुन भविष्यकाळात कोणा राष्ट्रप्रमुखाच्या शरिरात प्रवेश करता झालाच तर पुराणामध्ये वर्णिलेला प्रलय वा विश्वलय अशक्य नाही अशी निश्चिती शास्त्रीय प्रगतीमुळे येत आहे.

 तेंव्हा थोडंस ' *डरो ना*  असे यानिमित्ताने तमाम सृष्टीतील अविवेकी जनतेस सांगावेसे वाटते.

इतर ग्रहांप्रमाणेच तुमचे ही  सध्याचे  मेष राशीतील भ्रमण बारा राशीच्या लोकांना *आरोग्यदायी जावो* या तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🙏🏻💐

वायो विजांचे तडाखे !
तेणे पृथ्वी अवघी तरखे!
कठिणत्व अवघेंचि फांके!
चहूंकडे !!

तेथें मेरुची कोण गणना!
कोण सांभाळिल कोणा!
चंद्र सूर्य तारंगणा!
मूस झाली !!

पृथ्वीने विरी सांडिली!  अवघी धगधगायमान जाली!
ब्रम्हांडभटी जळोन गेली!  येकसरां!!

📝 ( ग्रहांचा मित्र)  अमोल
१३/०३/२०२०

*
( ग्रह योग संदर्भ : म.दा. भट यांचे पुस्तक)

March 4, 2020

प्लूटो - ग्रह बदल

*प्लूटो* ग्रह - राशी बदल

१९३० साली शोध लागलेला हा ग्रह. आज ४ मार्चला धनू राशीतून मकर राशीत आला आहे.

एका राशीत तब्बल २४ वर्ष मुक्काम करणारा हा ग्रह. म्हणजे बघा आपला ७४/ ७५/७६/७७ जन्म आहे  त्यांच्या सगळ्यांच्या पत्रिकेत प्लुटो ग्रह 'कन्या' राशीतच असेल.

शोध लागल्यापासून अजून या ग्रहाची संपूर्ण राशीचक्रातून फेरीही झालेली नाही.

या ग्रहाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो याचा संपूर्ण अभ्यास व्हायचाय. त्यामुळेच की काय पत्रिकेत या ग्रहाबद्दल फारसा विचार केला गेलेला दिसत नाही

एकटा जोतिषी या ग्रहाच्या संपूर्ण राशीचक्रातील भ्रमणाचा अभ्यास करणे ही शक्य नाही. आज वयाने ४० वर्षाचे जे जोतिषी आहेत ते फारफार तर अजून 'मकर',  कुंभ' राशीतील प्लुटोचा अभ्यास करु शकतील. मात्र हे ज्ञान पुढच्या पिढीला म्हणजे अजून ५० वर्षानंतर जे जोतिषी असतील त्यांच्यापर्यत पोहोचले पाहिजे. त्यासाठी मकरेतील प्लूटो किंवा कुंभेतील प्लूटो असे लिखाण कायमस्वरूपी पुस्तक रुपात राहणे आवश्यक आहे.

प्लूटोचे व्यक्तीपेक्षा राष्ट्राच्या व सामूहिक जीवनाच्या दृष्टीने जास्त महत्व आहे. सामाजिक क्रांती,  लढाया, संक्रमणे, राजकीय उलाढाली वगैरे गोष्टी प्लूटोच्या कारकत्वाखाली येतात. या ग्रहाबाबत अद्याप बरेच संशोधन होणे बाकी आहे.

आपल्या भारत देशाची रास 'मकर' मानली जाते. आज प्लूटो 'मकर' राशीत आलाय आणि त्याचा मुक्काम साधाएण २४ वर्षे इथे असेल.
भारतासाठी आणि प्लूटो अभ्यासकांसाठी त्याचे मकर राशीतून भ्रमण सुखावह जावो या शुभेच्छा 💐

📝( ग्रहांकीत) अमोल

February 15, 2020

गजानन महाराज प्रकट दिन

.

संपूर्ण पसायदान पाहिजे असल्यास a.kelkar9 @gmail.com वर किंवा 9819830770 वर व्हाटस अप करावा

February 6, 2020

नक्षत्र दैनंदिनी



श्रीराम 🙏🏻🌺

नवीन वर्ष सुरु झाले की आपण बरेच जण डायरी / रोजनिशी लिहितो. जानेवारी २०२० पासून ही  अनेक जण प्रत्येक दिवशी रोजनिशी लिहीतच असतील

ही संकल्पना घेऊन ज्योतिष अभ्यासक  किंवा साधारण या विषयाची माहिती असणा-यांसाठी एक नवीन गोष्ट सुचवतोय . आवडली तर अमलात आणा नाही आवडली तर सोडून द्या.

 यासाठी तुम्हाला  ३६५ पाने नसली तरी चालतील २७ पाने पुरतील.

प्रत्येक पानावर एका नक्षत्राचे नाव लिहा  ( अश्विनी ते रेवती )

आता जेव्हा आयुष्यात एखादी महत्वाची घटना सुरु कराल, किंवा घडली असेल  मग ती व्यावसायिक असू दे कौटूंबिक असू दे किंवा वय्यक्तिक यश अपयश  काही ही असू दे . ज्या गोष्टीची विशेष नोंद ठेवावी असं वाटेल अशी घटना   मग भले अगदी एकादा देवदर्शनाचा योग आला असू दे , परदेशात जायचा योग आला असू दे. , तुम्हाला जे महत्वाचे वाटते ते सर्व

तर अशी कुठलीही घटना घडली की ती कुठल्या नक्षत्रावर घडली आहे  त्या नक्षत्राच्या पानावर ते लिहून ठेवायचे. (काही अडचणी आल्या असतील तर त्या लिहायच्या )

आता ते नक्षत्र ( रास ) तुमच्या स्वतः: च्या पत्रिकेत कुठल्या भागात आहे  हे तुम्हाला माहीत असतेच .  यावरून तुमचा तुम्हालाच काही अभ्यास करता येईल

उदा. उद्या  पुनर्वसू नक्षत्रावर ( पुनर्वसू नक्षत्रावर  - त्यातही मिथुन रास आणि कर्क रास  वर घटनांची वेगळी नोंद करून ठेवलेली असावी ) अमुक वाजे पर्यंत मिथुन रास आहे आणि काही महत्वाची मिटींग आहे तर , पुनर्वसू नक्षत्राचे आपण लिहिलेले पान  काढायचे.  त्या नक्षत्रावर आत्तापर्यत काय काय काम झाली आहेत / काय काय घटना घडल्या आहेत यावरून साधारण अंदाज घ्यायचा  ( कर्क / मिथुन रास तुमच्या पत्रिकेत  कुठल्या स्थानात आहे यावरूनही काही गोष्टी समजू शकतील )

अर्थात एक विचार मांडलाय.
मी अशी सुरवात केली आहे.

 अगदी फार छोट्या  गोष्टी लिहायची आवश्यकता नाही पण  महत्वाच्या गोष्टींची तरी नोंद ठेऊन बघायला काय जातंय ?

मला वाटतंय पूर्वजांनी नक्षत्राबद्दल संपत, विपत, क्षेम,  प्रत्यर , साध्य , मैत्र हे जे लिहून ठेवली त्याचा अभ्यास या ' नक्षत्र दैनंदिनी ' मधून मिळू शकतो .

शुभेच्छा

अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com

January 24, 2020

साडेसाती आणि महादशा

दर अडीच वर्षानी शनी चा ग्रह बदल झाला की साडेसाती वर वारेमाप चर्चा होते.

साडेसाती सुरु म्हणजे त्रास सुरु होणार / संपली म्हणजे आनंदी आनंद असं काहीच नसतं

ज्या राशीचा साडेसाती शी दुरान्वये संबंध नसतो अशा राशींच्या व्यक्ती ही जिवनात तितक्याच  त्रस्त असतात. काही जण म्हणतात आमची साडेसाती संपली तरी अजून त्रास आहे,  असे का?

तर मंडळी माझ्यामते आपल्या जिवनात साडेसाती पेक्षा ही सगळ्यात निर्णायक घटक ठरतो तो म्हणजे तुम्हाला कुठल्या ग्रहाची महादशा आहे ते.

गुरु ( १६ वर्षे) , शनि ( १९ वर्षे) , बुध ( १७ वर्षे) , शुक्र ( २० वर्षे)   यांच्या दशांचा कालावधी हा साडेसाती पेक्षाही खूप मोठा असतो. आणि हे ग्रह ( आणि त्यांचे नक्षत्र स्वामी) पत्रिकेतील ६,८,१२ चे कार्येश असतील तर भले साडेसाती नसली तरी आयुष्यात अनेक संकटे उभी राहू शकतात. साडेसाती ही एकत्र असेल तर दुष्काळात तेरावा.
साडेसाती संपली तरी परिस्थितीत फरक पडत नाही

चांगल्या ग्रहाची दशा ( पत्रिकेत चांगले स्थान देणा-या) आणि साडेसाती  माझ्यामते बॅलेन्स लाईफ देतात

 शिक्षणाच्या काळात आलेल्या राहू सारख्या ग्रहाची दशा शिक्षणाची वाट लावतातच. अशीच दशा विवाहाच्या काळात आंतरजातीय विवाह घडवून आणू शकते ( इतर ग्रह योग ही विचारात घ्यावे लागतात )

त्यामुळे आयुष्याच्या घडणा-या अनेक ब-या वाईट गोष्टीत साडेसाती बरोबरच महादशा/ अंतर्दशा यांचाही विचार होणे आवश्यक

📝 अभ्यासक