२५ फेब्रुवारी, २०२६

असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा


असे कांती भस्मांकित ती जयाची |
तनू झाकली शुभ्र वस्त्रांत त्याची ||
सदा घेई औदुंबराशी विसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||१||

जयाच्या मुखे ज्ञान अमृत लाभे |
जरी थोर देवाधिदेवांत शोभे ||
जरी भाविकांच्या प्रेमे बसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||२ ||

जयाच्या करी दिव्य दंड तो साजे |
कधी व्याघ्रचर्मावरी जो विराजे ||
जिथे पाहू तेव्हा तिथे तो दिसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मो असावा || ३ ||

कुठेही कधी होय ज्याची भ्रमंती |
पदी पादुका सिध्द रूद्राक्ष कंठी ||
कधी भक्ताहूनी तो दूरी नसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा || ४ ||

अमरजा भीमेच्या राही तीराशी |
असे भक्तवत्सल प्रेमाभिलाषी ||
सदा सर्वदाअंतरी या वसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||५ ||

गुरू मित्र बंधू सखा सर्व काही |
सदा सोबती भाविकाचा तो राही || 
कुठे ना कधी भक्त त्याचा फसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा || ६ ||

प्रपंचातही भक्तिमार्गास लावी |
जणू आप्त इष्टातला भाव दावी 
कधी प्रेमे भक्तासवे तो रूसावा
असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा ||७ ||

किनार्यास ती नाव भक्ताची लावी |
मधुभजनी ज्ञानगंगाच दावी || 
करो बोध ऐसा मनाला ठसावा |
असा श्रीगुरू जन्मोजन्मो असावा ||८ ||

( साभार - व्हाट्सअँप समूह )

१४ फेब्रुवारी, २०२६

साडेसाती आणि शनी महात्म्य

साडेसाती आणि शनी महात्म्य 

साडेसातीचा त्रास कमी होण्याच्या अनेक उपायात नित्य किंवा दर शनिवारी 'शनी महात्म्य' पोथीचे वाचन हा एक प्रमुख उपाय म्हणून सांगितला जातो /केला जातो.

साडेसाती लागल्या लागल्या हा उपाय सुरु करणारे  हाताच्या बोटावर मोजण्या एवढे असतील पण बरेसचे जातक हे,त्रास सुरु झाला की जागे होतात.
अर्थात हे नैसर्गिक आहे कारण आपण सगळे सामान्य आहोत


अशांसाठी मी एक वेगळा विचार मांडतोय. शनी महातम्यात राजा विक्रमादित्य याला साडेसातीत काय  त्रास झाला यांचे वर्णन आणि त्याला अनुसूरून इतर उपकथा आहेत. आपण जेव्हा वाचन करू तेव्हा आपल्याला होणारा त्रास हा त्या कथेच्या मुळ भागाशी कशाप्रकारे co-relate होतोय हे पाहायचे. मग तुमचा त्रास आर्थिक, मानसिक, शारीरिक, प्रपंचिक, व्यवसायिक कसाही असो. ( राजा विक्रमदित्य सारखे तुमचे हात -पाय तोडले गेले पाहिजेत असे नाही )
कुठे तरी लिंक लागतेच

आणि मग यातून निस्तरून जाण्याची विनंती शनी महाराजांना करायची. 

याने त्रास लवकर कमी होईल / संपेल वगैरे सांगणे हा या लेखाचा हेतू नाही तर राजा विक्रमादित्य ज्याप्रकारे शरण गेला होता / चुक कळली होती / सरेंडर झाला होता किमान त्याच्या किती प्रमाणात आपण समर्पित व्हायला पाहिजे हे आपापले ठरवायचे 

शनी महाराजांची कृपा आपल्या सर्वावर राहो या सदिच्छा 

देवा तुझ्या द्वारी आलो📝
14/2/2026
शनिवार 
शनी प्रदोष 

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या