December 25, 2020

गीताजयंती

गीताजयंतीच्या शुभेच्छा...   



.
जय योगेश्वर
.
परब्रह्म साकार होऊनी आत्मज्ञान सांगती,
जाण मनुजा, जाण जाण रे, गीतेची महती |
.
आप्तजना त्या, समोर पाहून, युद्ध नकोशा पार्था जाणून,
परमपूज्य, पुरुषोत्तम प्रेमळ, स्वधर्म समजावती |
.
'पिंडी आणिक ब्रह्मांडी केवळ, आत्मतत्व विलसे,
ईशावास्यच सर्व जगत हे, भेदबुद्धी का असे? |
.
माहित नाही, पूजाविधी, अन्यदेव जरी भजती,
असेल श्रद्धाभाव तर ते, मलाच हो पूजती |
.
भक्तीने ते, ज्ञान मिळूनीया, भक्त मला मिळतो,
बुद्धीहीन अन, श्रद्धाहीन जो, नाशच तो पावतो |
.
नका   म्हणू हो  , मनुष्यधारी, परमेशाचे रूप,
प्रतीकांच्या त्या पलीकडचे सत्य अव्यक्त स्वरूप |
.
सोडून आशा कर्मफलाची, कर्मे आचरसी,
परमेशार्पण करसी ती मग, परम सिद्धी पावसी |
.
बुद्धीनेच अध्यात्म जाणणे क्लेशाचे आहे,
श्रद्धेने, अन भक्तीने ते, सहजसाध्य आहे |
.
विभूती जाणून माझी, जे जन, मजप्रती चित्त ठेविती,
मत्परायण होऊनी कर्मे करती , मलाच ते मिळती |
.
'निश्चय करूनी मला शरण ये, मिळव तू मुक्ती '
सुलभ मार्ग भक्तीचा हा, योगेश्वर वदती |
.
जाण मनुजा, जाण जाण रे, गीतेची महती |
.
.
(सौ. शैलजा शेवडे)

December 24, 2020

राम मंदिरासाठी देणगी

.आमचे सन्मित्र अंबरीश कुलकर्णी,पुणे यांची ही पोस्ट नक्कीच विचार करायला लावणारी
//
शेकडो वर्षांची इस्लामी राजवट, त्यानंतर ब्रिटिश कब्जा आणि
 स्वातंत्र्यानंतर काँग्रेसी गुलाम..

..अश्या शेकडो वर्षांच्या, अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर राम मंदिराची लढाई हिंदूंनी कायदेशीररीत्या जिंकली.

आता वेळ येत आहे मंदिर उभारणीची..हिंदू अस्मितेचे प्रतीक हे व्हॅटिकन किंवा मक्का यांच्या पेक्षा भव्य बनवण्याची !!

प्रत्येक रामभक्त हिंदूची इच्छा असेल आपला यथाशक्ती हातभार मंदिर निर्माणासाठी लागावा.

आणि त्या भावनेचा आदर करण्यासाठीच योग्य त्या संस्था लवकरच तुमच्या संपर्कात येतील.
(
मुस्लिम किमान २.५ टक्के उत्पन्न जकात म्हणून देतात, 
तर इसाई त्यापेक्षा अधिक.

हिंदूंना त्यांचा कोणताच धर्मग्रंथ टक्केवारी मागत नाही हे विशेष !!
)

हे सगळ निर्माण होत असताना, नेहमीचे छपरी कलाकार वेगवेगळे मुखवटे लावून गोंधळ माजवायचा प्रयत्न करतील:

 _शेकूलर भांड:_ मंदिर कशाला बांधायचं..
 _कम्युनिस्ट उंदीर:_ धर्म च नाही मानायचा तर देव कुठला..
 _अर्धवट बी/डी ग्रेड:_ आमी रावणाला मानणार..
 _चोरटे आणि भुरटे_ : आम्हीच ते, द्या पैसे
.......

या आणि अश्या अनेक धोक्यापासून सावध राहून निर्माण कार्य करायचं आहे.

 *या निमित्ताने संपूर्ण हिंदू समाज एकत्र येतो आहे आणि हेच विघातक लोकांना नको आहे.* 

पाच / दहा इंडस्ट्री हाऊसेस कडून लागणारा निधी सहज उभारता येतो 
(आख्ख बिर्ला मंदिर एकाने बांधलंय..),

पण त्यात तुमचा आमचा वाटा नसेल.

म्हणूनच ही एक Once in a lifetime संधी आहे आपल्यासाठी !!!


जय श्री राम 🚩🙏🏼🚩

अंबरीश कुलकर्णी, पुणे
//

December 22, 2020

गुरु- शनी युती

.गुरु - शनी भेट
//
शनीदेवाच्या भेटी
गुरु महाराज आले
हा रंगला सोहळा! मकरेत!

जाहली दोघांची, सहा अंशी भेट
कर्माचे ते भाग्य, लाभस्थानी

गुरु म्हणे देवा, तुझे कर्म थोर
साडेसातीचे सार, दाखवू दिले

शनीदेव म्हणे, एक ते राहिले
तुला जे पूजीले, क्षणोक्षणी 

पुढे गुरुला म्हणती,तुझ्या तीन दृष्टी
ज्या वर पडती, तो पुण्यवान

गुरु म्हणे महाराज, वृथा हे कौतुक
अहंकाराची बात, तुम्ही जाणो

एक एक ग्रह, आपुल्याच घरी
ठेऊन अंतरी , दृष्य पाहे

दोघे मिळोनिया, राहती काही निशा
कवतिक आकाशा, आवरेना


//
🪐🌕
आज २१ डिसेंबरला  गुरू-शनि युती मकर राशीत म्हणजेच शनीच्या गृही होत आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत 'गुरु' हा भाग्य स्थानाचा (९) तर 'शनी' कर्म स्थानाचा (१०)कारक ग्रह आहे.

कर्माला, भाग्याची साथ मिळाली की अनेक गोष्टीत सुयश  मिळते. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात
जसे उत्तम गीतकाराला , उत्तम संगीतकाराची साथ मिळाली की एक छान आविष्कार ऐकायला मिळतो अगदी तसेच. यातील एकजण जरी कमी पडला तरी अपेक्षित परिणाम साधत नाही.

ही गुरू-शनि  युती तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आपले कर्म आणि आपले भाग्य याचा एकत्रीत चांगला परिणाम घडवून आणो ही सदिच्छा 🙏💐

(शुभेच्छूक ) अमोल
२१/१२/२०

December 12, 2020

देवा तुझ्या द्वारी आलो

( १२ डिसेंबर २०२० , प्रभादेवी सिध्दिविनायक मंदिर ) 

दर्शनाचा हवा असलेला ७ ते ८ हा स्लॉट न मिळता ८ ते ९ हा स्लॉट मिळत होता. काय करायचे ? ८ ते ९ मध्ये किती वेळ लागेल ? ९ पर्यत ऑफीसला पोहोचता येईल का असा विचारविनिमय आमच्या नेहमीच्या ऑफीस मेम्बर्सचा चालू होता. शेवटी तब्बल१० महिन्यांनी मिळालेली संधी न सोडता ८ ते ९ तर ८ ते ९ आधी बुकींग करू म्हणून प्रत्येकाने आपल्या मोबाबाईलवर बुकींगची पुष्टी केली आणि निर्धास्त झालो. 

तस पहायला गेल तर गेली अनेक वर्ष महिन्यातील एका शनिवारी सकाळी लवकर निघून मुंबईत धार्मिक स्थळांना भेट हा आमचा नियमित कार्यक्रम असायचा जो अर्थातच गेले १० महिने खंडीत झालेला. सगळ्यात पाॅप्युलर किंवा जास्ती जास्त आम्ही जायचो तो दर्शन मार्ग म्हणजे  प्रभादेवीचा सिध्दिविनायक  - महालक्ष्मी  मंदिरातील ७ ची आरती आणि ऑफीसला ९ ला परत . त्याखालोखाल  प्रभादेवी सिद्धिविनायक - सेना भवन जवळील स्वामी समर्थ मठ - वडाळा राम मंदिर, विठ्ठल मंदिर  आणि परत हा एक पर्यायी मार्ग . किंवा वर्षातून एकदा बाबुलनाथ, मुंबादेवी किंवा गिरगावचे फडके मंदीर. गेले अनेक वर्ष सुरु असलेली पण मध्यतंरी कोविड संकटाने बंद झालेली आमची धार्मिक वारी  आज विशाखा नक्षत्रावर   " पुनःश्च हरी ॐ " म्हणून सुरु झाली.

 नियोजित वेळेच्या पाऊण तास आधी पोहोचलो. वेळेआधी आत सोडायला सुरक्षारक्षकाने नकार दिला कारण QR कोड प्रणालीने वेळेआधी दरवाजा उघडला जाणार नव्हता. आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करणे क्रमप्राप्त होते. दरम्यान ७ ते ८ दर्शन वेळेतला मुंबईकर भाविक अगदी ७.५५ वाजता ही आलेले पाहून त्यांच्या टाइम मॅनेजमेंटचे कौतुक वाटले 

शेवटी  ती घटिका आली. ' भेटी लागे जीवा लागलीसी आस '  आठ वाजता मोबाईल स्कॅन होऊन  आम्ही ' देवाच्या द्वारी   आलो .  दर्शन मार्गात  बदल केला होता. मारुती मंदिराच्या बाजूने रांग नेली होती . अंतरा  अंतरावर उभे रहायचे स्टिकर होते पण गर्दी नसल्याने  थांबाव लागत नव्हतं.  नेहमी जसे सरळ  गाभा-यात प्रवेशतो ते मात्र बंद केलेले. प्रमुख दरवाजा समोर उभे राहून दर्शन घेऊन परत बाहेर पडायचे अशी सोय केली होती.
३ ते ४ मिनिट लागली फक्त. प्रदक्षिणा  नाही, तिथे बसून गणपती अथर्वशीर्ष नाही , आणि लाडक्या उंदीर मामाच्या कानात  केलेली हितगुजही नाही. फक्त क्षणभर त्या  सिध्दिविनायका समोर नतमस्तक होता आले. आलेल्या परिस्थितीत निभावून नेण्याचे बळ दिल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि आज भले ३ मिनिट आलो असेन उद्या किमान ३० मिनिटासाठी  "मी  परत येईन " हा आशावाद ही व्यक्त केला . बाकी त्यालाच काळजी. 

" पुनश्च हरी ॐ"   होण्यासाठी एवढं  ही पुरेस आहे. यानिमित्याने  नवी मुंबईहून - मुंबईला १० महिन्यानंतर आलो. आपली लाडकी मैत्रीण खूप दिवसांनी भेटणार म्हणल्यावर जी उत्सुकता असते अगदी तशीच उत्सुकता मुंबईला जाणार म्हणल्यावर होती. अनेक  गोष्टी बदलल्या होत्या. सुरवात अगदी वाशी टोल नाक्यापासूनच झाली. 'फास्ट टॅग' प्रणाली मुंबई टोल नाक्यावरही सुरु झाल्याने कस झुपुक करुन गेलो. वाशी खाडीपूल जरा अंधारातच पास झाला पण हा मुंबई, नवी मुंबई जोडणारा सामायिक दुवा नेहमीच विलोभनीय वाटतो. मुंबई मेट्रोची कामे अगदी मानखुर्द/ BARC  पर्यत आली होती. चेंबूरच्या शिवाजी महाराज प्रवेशद्वारापाशी महाराजांना मुजरा करून डाव्या बाजूला 'आर् के स्टुडिओ' च्या काही खुणा दिसतात का हे  बघून सरळ  मैत्री पार्कला 
 ' अशोका ट्रँव्हल्सच्या '  मागे गाडी थांबवली.  गाडी नं MH ०९ असल्याने  ही गाडी सांगली/कोल्हापूरची असणार हे लक्षात आले. साखर झोपेतील प्रवासी आरामात उतरत होते त्यामुळे  वेळही जात होता. पण आपल्यांसाठी हे सहन करावेसे वाटले. (MH १२ ची गाडी पुढे असती तर काय केले असते हे आत्ता सांगू शकत नाही. कदाचित हाॅर्न वाजून धिंगाणा घातला असता).पुढे प्रियदर्शिनीला  ठाण्याहून येणारा रस्ता मिळतो. कंपनीच्या सिध्दिविनायक पदयात्रेसाठी याच रोडवरून आपण रात्री १ च्या सुमारास इथे पोहोचायचो हे आठवले. चुनाभट्टी आल्यावर अरे हा तर कलानगर, बिकेसीला जाणारा नवीन  उडडाणपूल! आपलं अजून जायचं राहिला आहे याची जाणीव झाली. दादरच्या टिळक पुलावर पोहोचल्यावर सकाळच्या बाजाराने झालेले ट्रॅफिक जाम , कबुतरखान्याच्याआधी लागलेल्या देवळाला अर्धी प्रदक्षिणा मारून पोर्तुगीज चर्च दिशेने मार्गक्रमण, शेवटी मंदिराच्या थोडं आधी सुरक्षित मिळालेलं पार्किग, दर्शन झाल्यावर परतीच्या प्रवासात ऐरोलीला  'कृष्णा भोग' येथे घेतलेला नेवैद्य/पोटपूजा आणि अगदी ९ नाही पण थोडं पुढे कामाच्या ठिकाणी पोहोचणे 

म्हणलं तर फक्त  ३ मिनिटाचे दर्शन झाले म्हणलं तर ३ तास. विचार आपला आपला 
शेवटी भाव तसा देव कारण

ॐकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाड-वेली- पानासंग फुल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा, गरीबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उध्दार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची  माया , 
मोरया. मोरया .मोरया . मोरया 

🙏🌺
( भक्त ) अमोल 
१२/१२/२०२०
#देवा तुझ्या द्वारी आलो 
www.kelkaramol.blogspot.com 

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या