६ मे, २०१३

स्वामी समर्थ जपमाला - ध्वनीफीत




आपण आपल्या ब्लॊगवर लिहिलेले वाचले जाते  हे जेंव्हा कुणी आवर्जून कळवतो, तेंव्हा त्यासारखा दुसरा आनंद नाही, असाच एक अभिप्राय
----------------------------------------------------------------------------
आदरणीय श्री. केळकर,
मी आपला ब्लॉग नेहमीच वाचते. आपल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे सापडावीत असा आपला ब्लॉग. आपले मनापासून आभार. फक्त
आपल्याला एक विनंती आहे की, मला 'महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ " या मंत्राची ध्वनीफीत दिल्यास मी आपली
अत्यंत आभारी राहीन.

सौ. क्षमा पाल्ये
-------------------------------------------------------------------------------------------

धन्यवाद क्षमा ताई. आपणास हवी असलेली ध्वनीफीत  इथे  देत आहे.  ब्लॊगवर देण्याचा उद्देश आपल्या सारखे इतर इच्छूकांनाही याचा लाभ घेता येईल.

( टिप: सदर लिंक वरुन स्वामी समर्थ जप उतरुन घेण्यास अडचण आल्यास  दुस-या दिवशी प्रयत्न करा. कारण ही मोफत साईट २४ तासात ठराविक मेगाबाईट डाऊनलोडची मुभा  देते )

गणेश पुराण (उपासनाखंड - अध्याय ४८)

गणेश पुराण 
उपासनाखंड - अध्याय ४८

पार्वतीचा विलाप

 

१ मे, २०१३

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

मे २०१३ - दिनविशेष

मे   २०१३  - दिनविशेष

मे   महिन्यातील प्रत्तेक दिवसाचे दिनविशेष  खालील दिलेल्या तक्त्यात पाहता येईल .  सदर तक्क्ता दा.कृ. सोमण यांच्या छोट्या पंचागातून घेतला आहे.

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या