५ मे, २०१८

सायकल सायकल

सायकल 🚲

मंडळी नमस्कार 🙏🏻

काल ' सायकल ' हा मराठी सिनेमा पाहिला. अगदी fist day,  first show नाही पण first day last show तरी पाहिला.
पण जेंव्हा असा सिनेमा येणार असे ऐकले होते तेंव्हा पासूनच हा सिनेमा नक्की पहायचे असे ठरवले होते. कारण हेच लहानपणापासून सायकल बद्दल असणारा ' जिव्हाळा '. लहानपणी सायकल चालवली नाही असा कोणी असेल असे मला तरी वाटत नाही. 

तर या सिनेमाचा नायक ' केशव' याची ही एक सायकल होती.ती त्याला त्याच्या आजोबांकडून मिळाली होती. फार फार जपायचा तिला,  कुणालाही द्यायचा नाही. एकदा गावात संगीत सौभद्र चा प्रयोग पाहण्यात सगळे  मग्न असताना दोन चोर येतात आणी काही दागिने, देव वगैरे चोरतात.  ते चोरून जात असताना गावातील कुत्री त्यांच्या मागे लागतात आणी मग त्यांच्या पासून बचावासाठी केशवच्या दारातली सायकल घेऊन ते पळतात.  आणी मग पुढे कथा/ सिनेमा रंगत जातो.

जुन्या काळात, कोकणातील एका गावाची पार्श्वभूमी यात आहे. निसर्गाचे सुंदर दर्शन तर होतेच पण ' माणुसकी ' पूर्वी घरोघरी कशी नांदायची हे ही दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला असे वाटते. नाही म्हणजे सिनेमात थोडी जास्त गाणी टाकून( १ एच गाणे आहे)  सिनेमाची लांबी वाढवता आली असती. पण सायकल चोरीची कथा असून एक ही पोलीस न दाखवता कथा पूर्ण करणे हे मराठी सिनेमातच घडू शकते.

आता जरा  जास्त interestinng.  
केशव हा त्या गावचा प्रसिद्ध जोतिषी. पंचक्रोशीत त्याची ख्याती. त्या काळी जोतिषाला किती मान होता, जोतिषी ही किती निस्वार्थी पणे या ज्ञानाचा उपयोग करायचे हे नक्कीच पाहण्यासारखे. 
 'माणूसकी' बरोबरच ' 'मानसशास्त्राचे ' उत्तम धडे हा सिनेमा देतो.  केवळ पत्रिकेतील ग्रह,  तारे काय सांगत आहेत हे पहात असताना वाईट घडणार असे पत्रिकेत दिसत असतानाही त्या जातकाला मनाने उभारी कशी द्यायची हे केशवने ( हृषिकेश जोशी)   छानच रंगवलय. पण त्याचवेळी स्वत: आपण जोतिषी असून आपल्या हरवलेल्या / चोरीला गेलेल्या सायकलचा  आपण छडा लावू शकत नाही ही घालमेल ही उत्तम जमली आहे. 
So जोतिषी ही माणूसच आहे. एखाद्यी वाईट वेळ त्याच्याही  वाट्याला येते, अशावेळी तो मनासारखे consulting करु शकत नाही, त्याचेही लक्ष लागत नाही, जोतिष शास्त्र म्हणजे थोतांड आहे हा समज पूर्वीही होता, जोतिषाला विरोध जवळच्या माणसांकडूनही  होत असतो या अगदी बारीक सारिक गोष्टी टिपण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय. 

जोतिषी नायक असलेला हा मराठीतील पहिलाच सिनेमा असावा.  एकच गोष्ट खटकणारी वाटली ती म्हणजे एक म्हातारी मरणाला टेकली असताना 'वैद्याला' बोलवण्याएवजी केशव ' जोतिषाला' बोलवले जाते.

सिनेमाचा शेवट ही मानवी नात्यातील एका अनोख्या पैलू ने होतो

So summary

तुम्ही जोतिषी असाल तर हा सिनेमा पहाच

तुमच्या मनात जोतिषी / किंवा या शास्त्राबद्दल भ्रामक कल्पना असतील तर हा सिनेमा पहाच

सरळ , सोपा, साधा सिनेमा कसा असतो हे पहायचे असेल तर हा सिनेमा पहा

माणुसकी, कोकण,  कोकणी माणसांची आपुलकी काय असते हे पहाण्यासाठी हा सिनेमा पहा

'एलिझाबेद एकादशी ' ची आठवण घेण्यासाठी हा सिनेमा पहा

सोज्वळ भाऊ कदम पहायचाय? मग बघाच हा सिनेमा😁

लहानपणी सायकल चालवलीय? परत अनुभवायची असेल तर हा सिनेमा पहाच

📝अमोल ५/५/१८
🎬🚲

८ एप्रिल, २०१८

७ एप्रिल २२१८

आज ७ एप्रिल २२१८

२०० वर्षापूर्वी आजच्याच दिवशी एका मराठी तरूणाने ब्राव्हो विजय स्वकीयांन विरूद्ध मिळवून दिला होता. त्या निमित्ताने आजच्याच दिवशी मुंबापुरीत 'विजय दिन' साजरा करण्यात येतो.

याचा इतिहास असा साधारण २०० वर्षांपुर्वी तेंव्हा भारत खंडात धर्मा वरुन, जाती वरुन लढाया होत असत.  कालानंतराने या लढाया शहरा शहरां मधे घ्यायचे  या लढायांचे एक प्रणेते ' मोदी ' यांनी ठरवले.  फार पूर्वीचे राजे ' कोंबड्यांच्या झुंजी लावत असत. पण त्याकाळी एका काळवीट प्रकरणात  वाघाला शिक्षा झाल्याचे  निमित्य होऊन ही प्रथा बंद पडून नंतर माणसांच्यातच या लढाया होऊ लागल्या.

त्यातील एक रोहमर्षक लढत मुंबई विरूद्ध चेन्नई त्याकाळी मुंबईत झाली होती. तामिळ संघाकडून खेळणाऱ्या के धार नामक खेळाडूने आपले एक एक वीर धारातीर्थी पडत असतानाच मोक्याच्या क्षणी स्वकियांच्या मुंबई संघाला पाणी पाजले होते/ हरवले होते.
आपल्या धोनी कानांनी  ' के धार जा- धाव ' असे शेवटचे परवलीचे शब्द ऐकताच ' हर हर महादेव ' म्हणत चौकार,   षटकार मारत न धावताच त्याने हाय फिल च्या पहिल्याच सामन्यात विजयश्री खेचून आणली होती.
  दुर्दैवाने या रोहमर्षक सामन्याचा आनंद घेण्यास अनेक जण मुकले होते असे काही जाणकार इतिहास तज्ञ म्हणतात.  त्याकाळी अनेक जणांकडे मनोरंजनासाठी इडिएट बाॅक्स होते. मुंबई संघ एकतर्फी सामना जिंकणार असे वाटून अनेकांनी ' ग्रहण' ही त्यावेळची काॅमेडी मालिका लावली. ज्याक्षणी पल्लवी या नटीने डोळे वटारले त्याच क्षणापासून मुंबई संघास ग्रहण लागल असेे काही विदूषी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन सांगतात

तर असा हा ' विजय दिन ' . आज यानिमित्ताने मुंबईत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  खास चेन्नई हून स्पेशल पिवळ्या रंगाच्या ४ बुलेट ट्रेन मुंब ई साठी सोडण्यात येणार आहेत. बिकेसी टर्मिनल्स इथे महामेळावाही आयोजित केला आहे तिथून वानखेडे पर्यत महामोर्चाचे आयोजन केले आहे.  तुम्हालाही सर्वाना या दिवसाच्या शुभेच्छा

📝 जीवन सुंदर आहे.
 फक्त टुकार लिहिता आलं पाहिजे 🏏

३ एप्रिल, २०१८

सेफ्टी आॅडिट

शनी पँसेंजरला ओलांडून मंगळ सुपरफास्ट पुढे गेली आहे.
आता हळूहळू ' आगी' लागण्याच्या / लावण्याच्या घटना जाणवण्याइतपत कमी होतील ( ८-१० एप्रिलनंतर)

तरी देखील ज्यांनी आपले, आपल्या कुटुंबियांचे * सेफ्टी आँडीट केलेले नाही त्यांनी ते अवश्य करुन घ्यावे.

त्यासाठी लागणारे साहित्य
नाव, जन्म दिनांक, जन्म वेळ, जन्म ठिकाण.

मोरया 🌺🙏🏻
( *जहिरात हितार्थ जारी 📝)

१ एप्रिल, २०१८

शनी आणी मारुती

"भविष्य दर्पण" या प्रो. मा.कृ बेहेरे लिखित पुस्तकात एक interesting माहिती  वाचली. त्यात त्यांनी मारुती आणि शनी यांची गोष्ट दिली आहे.
त्याचा सारांश असा

एकदा शनी मारूती कडे गेला आणि म्हणाला आम्ही सगळ्यांच्या राशीला गेलो पण तुमच्या आलो नाही. 
मारुती म्हणाला हरकत नाही ये. बस माझ्या डोक्यावर.  शनी बसला.
सकाळी लोक देवळात आले आणी पाहतात ते काय एक विचित्र प्राणी,  चमत्कारिक आकार मारूतीरायांच्या डोक्यावर बसलेला. त्याला हुसकावून लावण्यासाठी त्यांनी भराभर दगड मारले. शनीला मार बसावयास लागताच तो पळून जावयास लागला पण मारूतीने शेपटीने त्याला गुंडाळून ठेवले होते.
Finally शनीने मारूती रायांची माफी मागून परत त्यांच्या वाटेला जाणार नाही असे सांगितले.

मारूतीला मंगळाचा अवतार मानले आहे. म्हणूनच साडेसातीत मंगळाची उपासना करावी असे म्हणतात.  

आता जोतिशास्त्रात शनी - मंगळ युती का वाईट मानली जाते याच्या मागचे  कारण वरील गोष्ट वाचूनही लक्षात येईल.

गेले अनेक दिवशी मंगळ ग्रह जसाजसा धनू  राशीत शनी कडे वाटचाल करताना अनेक अप्रिय घटना ( आगी लागणे/ लावणे, सामाजिक / राजकीय अस्थिरता)    घडल्याचे दिसले.

आज ३१ मार्चला मंगळ ग्रह धनू राशीत पु.षाढा नक्षत्र चरण १ मधे आला आहे.(  १३ अंश , २६ कला)
शनी महाराज इथेच ( १४ अंश,  ४९ कला)  आहेत

आत्ताच असे ऐकले की पँलेस्टाईन, इस्राईल मधे बाॅम्बींग सुरु झाले आहे

ग्रह आपले काम बरोबरच करत असतात. आपल्याला ते अभ्यासता आले पाहिजे 

📝 जोतिष अभ्यासक

१८ मार्च, २०१८

आजचे ग्रह विशेष - १८ मार्च

सर्वांना विलंबी नाम संवत्सराच्या शुभेच्छा

आज १८ मार्च

बुध-चंद्र - शुक्र युती ( मीन राशीत)
चंद्र - शनी केंद्र योग

रविचा उ.भाद्रपदा चरण १ मधे प्रवेश

संदर्भ कालनिर्णय पंचांग

८ जानेवारी, २०१८

महाराज माझे जवळी असावे


*महाराज माझे जवळी असावॆ*

( चमत्काराचा ( ब्रह्म ) चैतन्यकारी अनुभव : )

🙏🏻🌺


असं म्हणतात  की जेव्हा तुम्ही एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री जायचा विचार करता  तेव्हा तिथल्या देवाचे / संतांचे  बोलावणे यावे लागते त्याशिवाय  जाणं होत नाही . 


ब -याच दिवसापासून गोंदवले क्षेत्री जायचे ठरत होते. पण योग येत नव्हता . नवीन वर्षात पहिल्या शनिवारी योग जुळून आला. महाराजांनी नुसते बोलावले नाही तर संपूर्ण प्रवासात आपल्या बरोबर ते आहेत याची अनुभूती  झाली. 


मी आणि माझे कंपनीतले दोन सहकारी साधारण २ वाजता  कळव्याहून  निघालो . मागील दोन शनिवारी पुण्याला गेलो असल्याने आणि त्यावेळच्या वाहतूक कोंडीचा  अनुभव असल्याने  संध्याकाळी न निघता  दुपारी  निघावे असे ठरवले आणि  कुठलीही अडचण न येता साधारण साडेपाच च्या सुमारास शिरवळ जवळ पोचलो. थोडा विसावा घेतला . त्याचवेळी पुण्याच्या एका  मित्राने भक्त निवासातला नंबर दिलेला होता. तिथे फोन करून कळवावे म्हणून संपर्क केला पण फोन उचलला गेला नाही. पुण्याच्या मित्राला परत फोन केला असता तो म्हणाला ऑफीस बंद झाले असेल  ८ पर्यत  पोच आणि  काही अडचण आल्यास ओळखीची नावे सांगितली. त्याला मजेने म्हणले असं कस ८ ला बंद करतात. महाराजाना सांगायला पाहिजे आम्ही  एवढ्या लांबून येतोय 


तिथून निघून  साधारण ७ वाजता सातारा इथे पोचलो. हायवे वरून कोरेगाव कडे जाणारा रस्ता जिथे होता तिथे उड्डाण पुलावरून न जाता  खालच्या रोडने गेलो . त्या सर्वीस रोडवर एक मोठा स्पीड ब्रेकर होता. तो न दिसल्याने  गाडी जोरदार उडाली आणि खाली आली. हादरा जोरदार होता आणि लक्षात आले मागच्या बाजूचे चाक पंक्चर झाले आहे. सुदैवाने एका टायर वर्क शॉप पाशीच गाडी होती. पण त्यांनी पंक्चर काढत नाही असे सांगितले. गोंदवल्याला जायचे आहे ८ पर्यत पोचायचे आहे निदान चाक तरी बदलून द्या अशी विनंती केल्यावर मालक तयार झाले आणि त्यांनी तिथल्या एका कर्मच-याला सांगून चाक बदलून दिले . 


या सगळ्या गडबडीत १०-१५ मिनिटे गेली. सातारा - गोंदवले  साधारण ६० किलो मीटर अंतर. अपरिचित रस्ता, रात्रीची वेळ त्यात पंक्चर चाक तसेच  घेऊन जायचे का पंक्चर काढून  जायचे याबाबत द्विधा मनस्थिती. कारण परत थांबलो तर पोचायला उशीर होणार.  पण मग न थाबता गोंदवले ला जाऊ आणि पंक्चर सकाळी काढू  या विचाराने कोरेगाव रस्त्याला डावी कडे वळलो. एकदा हाच रस्ता ना ही खात्री करण्यासाठी  एका सद्गृहस्थानां  विचारता  ते म्हणाले हाच रस्ता आहे आणि मलाही  गोंदवलेच्या अलीकडे २० किमी जायचे आहे तर मी येऊ का ?  त्यांना घेऊन आमचा  पुढील प्रवास सुरु झाला.


 रस्त्यावर कामे चालू असल्याने ठिकठिकाणे तयार केलेलं वळण मार्ग , कारखाना चालू असल्याने  ऊस वाहतूक   या सगळ्यात एकच समाधानाची गोष्ट म्हणजे पुढे रस्ता विचारावा लागला नाही कारण ते सद्गृहस्थ . गोंदवलेच्या आधी उतरल्यावरही पुढे कसे जायचे किती चौक  येतील  हे सगळं व्यवस्थित सांगून ते उतरले आणि आम्ही साधारण ९  वाजता पोहोचलो . भक्त निवासाची चौकशी करण्यासाठी जेव्हा कार्यालयात गेलो तेव्हा त्यांनी आधी  ' प्रसाद ' घ्यायला सांगितले. प्रसाद घेऊन झाल्यावर भक्त निवासातील एक खोली मिळाली. वाहनतळावर गाडी लावण्यासाठी गाडी प्रवेशद्वारातून आत घेतली. बँगा  उतरवण्यासाठी  मित्र आला आणि मी त्याला सांगतोय अरे उजव्या बाजूचे मागचे दार घडत नाही आहे हे माहीत आहे ना तुला ? हे सांगत असतानाच त्याने दार ओढले आणि ते चक्क निघाले . गेले ५ -६ महिने बंद असलेले दार ( गँरेज मध्ये जाऊन दुरुस्त करण्यात  वेळ न झाल्याने ) चक्क उघडले ? विश्वास बसत नव्हता ?  पण जे घडले ते सत्य होते. माझ्या सारख्या  धार्मिक, आस्तिक माणसासाठी हा चमत्कारच होता 


रात्री समाधीस्थानाचे दर्शन घेऊन आल्यानंतर सहज विचार केला  जर आपण नास्तिक असतो  तर या घटनेची उकल आपण कशी केली असती. बरोबर  मंदिरात गेल्यावरच दार कसे उघडले ? असा विचार करत असताना  तो प्रसंग आठवला . साता-यात  गतिरोधकावर उडून जेव्हा गाडी आपटली खाली तेव्हा त्या झटक्याने काही कारणाने आतील लॉक  झालेले यंत्र  चालू झाले असेल पण ते दार उघडण्याचा प्रसंग योगायोगाने  मंदिरात गेल्यावरच आला 

असो नास्तिक, विज्ञानवादी यांना  हे वरचे विवेचनपटण्यासारखे आहे.


  *पण  महत्वाचा मुद्दा  इथे मला सांगावासा वाटतो की  अशी बुध्दी सुचणे / हा तर्कशुध्द्व विचार   ( लॉजिकल विचार करणे ? )  करण्याचे सामर्थ्य ही  आपल्याला  या संत, महंतांच्या संगतीने मिळत असेल का ?   मला वाटते नक्कीच 


या संपूर्ण प्रवासात  'महाराज सोबत आहेत  ' ही जाणीव वेळोवेळी  होत गेली. 


 शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज , पावसचे स्वरुपानंद , नरसोबावाडीचे म्हादबा पाटील महाराज , अक्कलकोटचे स्वामी समर्थ , सज्जनगडचे रामदास स्वामी किंवा गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज .'  आणी इतर. यांनी


भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम  किंवा गजानन महाराजांच्या  पसायदानातील  वाक्य '  महाराज माझे जवळी असावे '  

हे सतत म्हणावयास सांगितले आहे 

आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ही सगळी वेगवेगळी स्लोगन्स आहेत, सांगायचे मार्ग वेगवेगळे आहेत  पण अंतिम उद्देश एकच भक्ती आणि भक्तीतून येणारे शहाणपण. 


हा प्रवास चैतन्यदायी अनुभव देऊन गेला. या एकंदर प्रवासात  ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केले त्या सर्वाचे आभार 🙏🏻


देवा तुझ्या द्वारी आलो 

८/१/१८

१६ डिसेंबर, २०१७

अजि सोनियाचा दिनू



मंडळी,  दिल्लीला जनपथ रोडवर आज मोठी लगबग असणार आहे. आज शनिवार,  अनुराधा नक्षत्र ( शनीचे नक्षत्र)   चंद्र वृश्चिक राशीत असताना युवराजांचा पक्षीय अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक होत आहे.

आता पुढचे लिखाण *मुहूर्त बघणे म्हणजे कसा भंपकपणा आहे वगैरे मानणारे आणी असे टुकार मेसेज वेळोवेळी Whatsapp किंवा इतर सोशल मिडीयावर पुढे ढकलणाऱ्यांसाठी*

तर आजच्या अध्यक्ष पदाची सूत्रे घेण्याआधी या माऊलीने आपल्या मुलाची पत्रिका जोतिषाला नक्कीच दाखवली असणार आणी माझ्यामते त्यांनी आजचा योग्य दिवस निवडला आहे.

राजकारणाचा कारक ग्रह शनी आहे.आज त्याचा वार आणी अनुराधा  नक्षत्र स्वामी या नात्याने शनी दिवसभर रुलिंग मधे आहे.

साधारण पणे एखादा चांगला दिवस बघण्यासाठी रोजच्या चंद्राचे भ्रमण लक्षात घेतात. मुळ पत्रिकेतील शुभ स्थानातून त्या दिवशीचा चंद्र जात असेल तर तो दिवस उत्तम मानतात
आज चंद्र वृश्चिक राशीत आहे आणि युवराजांच्या पत्रिकेत वृश्चिक रास लाभस्थानात आहे. अर्थात लाभस्थान हे पत्रिकेतील एक चांगले स्थान आहे.

शास्त्र कारांनी प्रत्येक नक्षत्रावर काय करावे हे लिहून ठेवले आहे. आज अनुराधा नक्षत्र,  या नक्षत्रावर राज्याभिषेक करताता ( पक्षाच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारणे हा एक प्रकारचा राज्याभिषेकच)
खाली पुस्तकातील लिखीत स्वरूपातील माहिती दिली आहे 👇🏻

तर निवडणुकीपूर्वी ' देवा तुझ्या द्वारी आलो' म्हणणारे पदग्रहण करण्यासाठी ही जर चांगला दिवस/ मुहूर्त बघायला लागले असतील तर तो तमाम भारतवर्षासाठी

अजि सोनियाचा दिनू  असंच म्हणावं लागेल.




युवराजांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐आणि ' देवा तुझ्या द्वारी आलो' या अनुदिनी कडून एक प्रेमळ भेट 🎁

बाकी आमच्या देवळात कधीही दर्शनाला या
kelkaramol.blogspot.in

📝( अभ्यासू) अमोल
१६/१२/१७

२ डिसेंबर, २०१७

न कर्त्याचा वार शनिवार

न कर्त्याचा वार शनिवार

ही म्हण ऐकली असेल सगळ्यांनी. पण या म्हणीसाठी शनिवारच का निवडला असावा? रविवार ते शुक्रवार पैकी एका वाराची निवड का केली नाही?

मंडळी थोडा जोतिष शास्त्रीय विचार करु. कृष्णमूर्ती पद्धतीत रुलिंग प्लँनेट ही एक संकल्पना आहे. यात प्रत्येक क्षणावर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असतो हे त्यांनी सांगितले आहे. यात त्या दिवसाचा स्वामी दिवसभर रुलिंग मधे असतो असाही एक नियम आहे.
म्हणजे शनिवारी - शनी रुलिंग मधे पूर्ण दिवस असतो.
आता ' शनी' चे कारकत्व माहितच आहे. उशीर करणे, वेळ लागणे, विलंब
म्हणूनच ही म्हण तयार झाली असावी.   

पण केवळ ' न कर्त्याचा वार शनिवार ' म्हणजे कुठल्याही चांगल्या ( मोठ्या) कामाला सुरवात शनिवारी करु नये असा गैरसमज पसरत गेला

पण शनी - उशीर करतो पण हक्काने काम करुन देतो.
शास्त्रकारांनी रचलेले नियम बरोबर होते आपलीच समजण्यात कधी कधी चूक होते.
हे लेखन आजच्या दिवशी शनीचरणी अर्पण 📝
🌺🙏🏻

२८ नोव्हेंबर, २०१७

मंगळ - नेपच्युन युती

मंगळ  - नेपच्युन युती 


आज एका मित्राच्या भाच्चीची  पत्रिका बघत असताना मंगळ  - नेपच्यून  युती पत्रिकेत  बघितली.  नुकताच  तिला अपघात झाला होता.
श्री   व. दा भट यांच्या ' हर्षल, नेपच्युन प्ल्युटो  या ' पुस्तकात  जे लिहिले आहे अगदी तसेच घडले 

शास्त्रकारांनी  केवढा मोठा  अभ्यास केला आहे याची प्रचिती आली . 


८ नोव्हेंबर, २०१७

धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग

धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग 

धनू राशीत शनी १८ एप्रिल ते ६ सप्टेंबर २०१८ आणी ३० एप्रिल ते १८ सप्टेंबर २०१९. वक्री असल्याने प्रत्येक नक्षत्रात आणखी चरणात त्याचा कालावधी असा असेल

मूळ नक्षत्र. चरण १
२८ नोव्हेंबर १९१७ पर्यत

मूळ नक्षत्र,  चरण २
२८ नोव्हेंबर १७ ते २६ डिसेंबर २०१७ पर्यत

मूळ नक्षत्र,  चरण ३
२६/१२/२०१७ ते २५/०१/२०१८
२२/०७/२०१८ ते २१/१०/२०१८

मूळ नक्षत्र,  चरण ४
२५/०१/२०१८ ते ०२/०३/२०१८
०५/०६/२०१८ ते २२/०७/२०१८
२१/१०/२०१८ ते २७/११/२०१८

पु.षाढा , चरण १
०२/०३/२०१८ ते ०५/०६/२०१८
२७/११/२०१८ ते २७/१२/२०१८

पु. षाढा, चरण २
२७/१२/२०१८ ते २४/०१/२०१९
०२/०९/२०१९ ते ०५/१०/२०१९

पु.षाढा , चरण ३
२४/०१/२०१९ ते २६/०२/२०१९
०५/०७/२०१९ ते ०२/०९/२०१९
०५/१०/२०१९ ते २५/११/२०१९

पु.षाढा, चरण ४
२६/०२/२०१९ ते ०५/०७/२०१९
२५/११/२०१९ ते २७/१२/२०१९
उ.षाढा, चरण १

२७/१२/२०१९ ते २४/०१/२०२०

२४ जाने २०२० नंतर शनीचा मकर राशीत प्रवेश आणी धनू साठी साडेसातीची अडीच वर्षे  शिल्लक. 
वरील नक्षत्र आणी चरण जांचे आहे त्यांना त्या कालावधीत काही त्रास होऊ शकतो. - नैराश्य, मानसिक त्रास.
मुळ पत्रिकेत चर चंद्र चतुर्थेश असेल ( मेष लग्नाची पत्रिका असेल) तर आईला त्रास होण्याची शक्यता
अर्थात पत्रिकेत धनू रास कुठल्या स्थानात आहे, त्या राशीत कुठले ग्रह आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे
जोतिष शास्त्रात वाईट समजली जाणारी शनी - मंगळ युती २. एप्रिल २०१८ ला  धनू राशीत पु.षाढा नक्षत्रात होत आहे. यासंबंधीची माहिती परत कधीतरी

२८ ऑक्टोबर, २०१७

धनु राशीतुन शनीचे भ्रमण

धनु राशीतुन शनीचे भ्रमण - पुढील भाग 📝



२६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२०
म्हणजे तब्ब्ल ८२० दिवस  शनीचे धनु राशीतून भ्रमण होईल 
या मध्ये खालील कालावधीत  शनी वक्री  असेल ( उलट गतीने धनु राशीत मार्गक्रमण करेल )
१८ एप्रिल २०१८  ते  ६ सप्टेंबर २०१८  - साधारण १४१ दिवस 
३० एप्रिल २०१९ ते  १८ सप्टेंबर २०१९ -  साधारण १४१ दिवस 
आता आपणास माहितच आहे की एका राशीची अगदी लाखो माणसे असतात . मग सगळ्यांना एकाचवेळेला त्रास होतो का? तर नाही.
मग  `प्रत्येकाने केंव्हा काळजी घेतली पाहिजे? हे प्रत्येकाच्या पत्रिकेवरून अवलंबून आहे
व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात तसेच जोतिष शास्त्रात व्यक्ती प्रमाणे पत्रिका असे ही म्हणता येईल
आता पुढचा भाग काही दिवसांनी पाठवेन,  त्याआधी एक काम करायचं
आपली पत्रिका बघून ठेवा
धनू रास आहे म्हणजे चंद्र धनू राशीत (९) असणारच, आता तो कुठल्या नक्षत्रात आहे, चरण काय आहे, धनू राशीतच इतर काही ग्रह आहेत का? मुळ पत्रिकेत शनी कुठल्या राशीत आहे ( धनेतच आहे का? )
मुळ पत्रिकेत धनु रास पत्रिकेत १- ते १२ पैकी कुठल्या स्थानात आहे, महादशा- अंतर्दशा - विदशा कुठल्या ग्रहाची केंव्हा आहे, धनु राशीचा स्वामी गुरु पत्रिकेत कुठे आहे, त्याचे गोचर शनीशी काय योग होत आहेत
ही माहिती करुन घेतलीत तर शनीचे गोचर भ्रमण केव्हा त्रासदायक ठरेल आणी केंव्हा फलदायी ठरेल याचे अनुमान काढता  येईल
( सध्या ज्यांचे मुळ नक्षत्र पहिले चरण आहे त्यानी काळजी घेणे आवश्यक आहे कारण शनीचे याच चरणतून भ्रमण होत आहे)
पुढचा भाग यथावकाश
शुभं भवतू 🙏🌺
अमोल
a.kelkar9@gmail.com

२६ ऑक्टोबर, २०१७

सा रे सा थी.

खुप गर्दी असलेल्या बसमधून किंवा लोकल मधून प्रवास करताना सर्वसाधारण पणे तीन प्रकारचे  लोक दिसून येतात...

१) आरामात सिट वर बसलेले पण आता उतरायचे ठिकाण जवळ आल्यामुळे एवढ्या गर्दीत उतरायचं टेन्शन घेतलेले
२) २-३ स्थानकापुर्वी चढलेले प्रवासी,  पण अजून दोन सीटच्या मधेच उभे राहिलेले, बसायला केंव्हा मिळतय याची वाट पाहणारे अजून बराच प्रवास बाकी असणारे
३) मागच्याच स्टेशन/ स्थानकावर चढलेले,  प्रचंड घाबरलेले प्रवासी, खुपच लांबचा पल्ला गाठायचा आहे पण अजून दारातच लोंबकळणारे प्रवासी
हे  👆🏻सा रे सा थी नेहमी सर्वत्र दिसतात

हेच  उदाहरण 👆🏻 सा डे सा ती ला कसे संयुक्तिक ठरते पहा

आज  २६/१०/१७ ला रात्री ' शनी' धनु राशीत जात आहे त्यामुळे आता
वृश्चिक राशीची अडीच वर्षे शिल्लक,
धनुची ५ आणी मकरेला साडेसातिची सुरवात
वरील उदाहरणातील
प्रवासी १- वृश्चिक
प्रवासी २ - धनू
प्रवासी ३ - मकर
मंडळी अशी नेहमीची उदाहरणे दिली की जोतिष समजायला सोपं वाटतं ना?😀


तर मकर राशीला साडे साती सुरु होईल,  धनू राशीत शनी प्रत्येक नक्षत्रातून केंव्हा भ्रमण करेल ? त्यानुसार धनू राशीवाल्यांनी केंव्हा काळजी घ्यावी? उपाय, उपासना आणि इतर उपयुक्त माहिती जमेल तशी क्रमश: देईनच
तुर्त आज इतकेच

जाता जाता
भारत देशाची रास मकर आहे. तसेच खालील काही मान्यवरांच्यासाठी साडेसातीचा हा कालखंड कसा जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल
राज ठाकरे( मकर रास)
ऐश्वर्या बच्चन ( धनू)
प्रशांत दामले( वृश्चिक)
सोनाली कुलकर्णी (मकर)

सदर लेखन, शनीचरणी अर्पण 🙏
📝 अमोल
a.kelkar9@gmail.com

२२ ऑगस्ट, २०१७

गणपती प्राणप्रतिष्ठापना - पूजेची ध्वनीफीत

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी  ' गणपती प्राणप्रतिष्ठापना ' पूजेची ध्वनीफीत   इथे  ठेवली  आहे 

ही पूजा ज्ञानप्रबोधिनी  धर्मशास्त्र अभ्यासिका, पॊराहित्य प्रशिक्षक   आर्या जोशी यांनी सांगितली आहे 

इच्छूकांनी अवश्य लाभ घ्यावा 


मोरया 

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या