१५ डिसेंबर, २०१८
१४ डिसेंबर, २०१८
दत्त उपासना ऑडिओ - ऍप
आवडलेल्या धार्मिक ऍप मध्ये मी याचा आवर्जून समावेश करेन . यात श्री दत्त गुरूंचे सोळा श्लोक ध्वनीफीत रूपात आहेत. ते असे
१) ५२ श्लोकी गुरुचरित्र - वेळ १०. ०५ मिनिटे
२) श्री गुरुपादुका अष्टक - वेळ ०३.१४ मिनिटे
३) करुणा त्रिपदी - वेळ ०४.०८ मिनिटे
४) श्री दत्तात्रय स्तोत्र -१ - वेळ ०४.३९ मिनिटे
५) श्री दत्त मंत्र १०८ वेळा - वेळ १७.१६ मिनिटे
६) अघोर कष्ट उद्धारण स्तोत्र - वेळ ०२.१० मिनिटे
७) श्री भृगुऋषी विरचित श्री दत्तस्तोत्र - वेळ ०५.२४ मिनिटे
८) श्री दत्त स्तोत्र - वेळ ०२.४२ मिनिटे
९) श्री दत्त स्तव स्तोत्र - वेळ ०२.४० मिनिटे
१०) श्री दत्तात्रय ध्यानमंत्र - वेळ ०३.४२ मिनिटे
११) श्री दत्तात्रय अपराध क्षमापन स्तोत्र - वेळ ०३.०१ मिनिटे
१२) श्री दत्तात्रय अष्टोत्तर शतनाम स्तोत्र - वेळ ०४.५७ मिनिटे
१३) श्री दत्तात्रय स्तोत्र -२ - वेळ ०४.४२ मिनिटे
१४) श्री शंकराचार्य विरचित श्री दत्त अष्टकम - वेळ ०४.०२ मिनिटे
१५) श्री टेबे स्वामीकृत श्री दत्त स्तोत्र - वेळ ०१.५८ मिनिटे
१६) श्री टेबे स्वामीकृत श्री दत्तात्रेय स्तोत्र - वेळ ०२.३३ मिनिटे
हे ऍप उतरून घेतल्यानंतर एखादा श्लोक एकाचा असेल तर डाउनलोड करा असा मेसेज येतो . सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे एकदम सर्व श्लोक उतरवून घेणे . यासाठी तुमच्या भ्रमणध्वनीत साधारण ५५ एमबी जागा असणे आवश्यक
पहिला श्लोक लावल्यानंतर पुढचे सगळे श्लोक क्रमाने येतात आणि साधारण १ तास भक्तीरंगात रंगून जायला होते .
श्री गुरुदेव दत्त
गुरुचरित्र ऑडिओ ऍप
दत्त जयंती जवळ आली की त्याच्या आजूबाजूला अनेक जण ' गुरुचरित्राचे पारायण करतात ' हे पारायण करताना जास्तीजास्त नियम कसे पाळता येतील हे पाहणे आवश्यक असते. मात्र हे जे ऍप आहे ते यांच्यासाठी नाही . कारण याचे वाचन शास्त्रोत्र बैठक घालून , पोथीतून वाचन अभिप्रेत आहे.
मात्र काही कारणाने ( वयोमानानुसार , फिरतीवर असणे, आजारी असणे इ इ ) ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी हे ऑप उतरवून घ्यायला हरकत नाही
हे ऍप सुरु करताच ' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ' चा श्रवणीय मंत्र लागून राहतो . त्यानंतर पुढे गेल्यावर पारायण , करुणात्रिपदी , घोरकष्टोद्धरण स्तोत्र हे पर्याय दिसतात . आपल्याला हवा तो पर्याय घेऊन ध्वनीफित ऐकता येत्तात . ध्वनीफित निवडली की लागायला थोडा वेळ लागतो
पण एकंदर हे ही दत्तभक्तांना उपयुक्त ऍप आहे . ते इथून घेऊ शकता
स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे की नाही हा ज्याच्या त्याचा श्रध्येचा प्रश्न असल्याने अधिक या विषयात न गेलेले बरे
गुरुदेव दत्त
१३ डिसेंबर, २०१८
श्री दत्तमहात्म्य कथांमृतसार - अँप
काही आवडलेली निवडक धार्मिक अँप द्यायचा विचार आहे .
नुसती लिंक न देता त्यात काय काय आहे ही ही द्यायचा प्रयत्न करेन जेणेकरून
ते स्वतः:साठी उपयुक्त आहे की नाही हे वाचणारा ठरवू शकेल
येत्या २२ तारखेला दत्त जयंती आहे. यानिमित्याने सुरवातीला या संबधीतच काही अँप
देत आहे
श्री दत्तमहात्म्य कथांमृतसार अँप - परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे स्वामी )
यांनी १८२३ मध्ये या ग्रथाची रचना केली. त्यात श्री दत्त प्रभूंचे चरित्र तसेच सहस्त्रार्जुन , परशुराम , अलर्क यदु, आयु यांसारख्या दत्त भक्तांच्या महान अद्भुत , रसाळ चरित्राचे वर्ण केले आहे.
अनेक जण या ग्रथाचे घरोघरी पारायण करतात. ही सगळी माहिती प्रस्तावनेत वाचून झाल्यानंतर मग ध्यानमंत्र दिला आहे.
त्यानंतर १ ते ५१ अध्याय ( अवतरणिका ) आहेत . वाचायला सोपे असे हे अँप दत्तभक्तांना नक्की आवडेल
४ डिसेंबर, २०१८
गर्वहरण
गर्वहरण
महाभारतात भीमाचे गर्वहरण ही ही एक कथा सगळ्यांना माहित असेल
ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी
एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ही लांबलचक शेपटी होती.
भीमाने माकडाला शेपटी बाजूला घ्यायला सांगितले. माकड म्हणाले मी आजारी आहे तेंव्हा तूच घे
भीम म्हणाला मी नाही तुझ्या घाणेरड्या शेपटीला हात लावणार.
माकड म्हणाले ठिक आहे तुझ्या हातातील गदेने तरी बाजूला करशील?
भीमाने खुप प्रयत्न केला पण त्याला माकडाची शेपटी थोडीदेखील हलवता आली नाही. शेवटी तो माकडाला शरण गेला आणि हनुमानाने त्याला दर्शन देऊन त्याचे गर्व हरण केले. अशी ही कथा
ही कथा आठवली याचे कारण सध्या अनेक राजकीय नेत्यांना/ योगी/ मुनींना हनुमान कुठल्या जातीचा आहे हे ठरवण्याची खुमखुमी आलेली आहे.
हनुनानाने असेच त्यांच्या मार्गात. वानररुपात येऊन बसावे. जी जात किंवा ज्या जातीचा समुह वाटेतील शेपूट बाजूला करेल त्या जातीचा मी असे जाहीर करून जातीरुपी भिम जो सगळ्यांच्यात संचारलाय त्याचे गर्वहरण करावे.
अनेक गोष्टी अशा आहेत की माणसांचे गर्विष्ठ भीमात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही आहे.
राजकीय नेते हे सहज दिसणारे उदाहरण. त्याखालोखाल अभिनेते, नायिका, खेळाडू, वक्ते, व्यवसायिक, लेखक, वक्ते इ.इ
मलावाटते प्रत्येकवेळी हे गर्वहरण करायाला बजरंग बली पोचू शकत नाही म्हणून 'शनी' महाराजांबरोबर युती करुन ' साडेसातीचा फाॅर्म्यूला ' नियतीने केला असावा.
शनीचा फेरा म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर माणसातील गर्वरुपी भीमाला परत माणूस बनवणे.
मारूती राया तुझी लीला अगाध आहे 🙏🏻🙏🏻🌺
📝४/१२/१८
देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.in
१० नोव्हेंबर, २०१८
लक्ष्मी पूजन आणि विपर्यास
*लक्ष्मी पूजन आणि विपर्यास*
मंडळी, गेले काही दिवस Whatsapp वर एक फोटो सगळीकडे फिरतोय. तुम्ही पण पाहिला असेलच. एक नवरोबा आपल्या बायकोला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ओवाळतोय आणि दोन विनोदाच्या स्माईली.
या वर माझ्या जे मनात आलय ते लिहितोय. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकेल
तर पहिला आक्षेप विनोदी स्माईलिंना. कारण हा विनोद म्हणून पाठवला असला तरी यातील आशय चांगला आहे.
( पण अर्थातच प्रत्येक वेळेला हिंदू धर्माच्या चालीरीतींवर चेष्टेच्या स्माईली/ विनोद पाठवणे हा आता नवीन रीतिरिवाज रुढ होतो आहे ही शरमेची गोष्ट)
तर आता चित्राचा आशय.
नवरोबा, घरची पूजा करुन नंतर आपल्या बायकोला पण ओवाळत आहेत. या मागची भावना माझ्यामते आज मी इथपर्यंत यशस्वी झालो ते तुझ्या सहकार्याने, तुझ्या पाठिंब्याने किंवा माझी जी भरभराट झाली आहे, व्यवासायात / नोकरीत यश मिळाले आहे, श्रीमंती आली आहे ती तुझ्याच पायगुणाने ( नशिबावर विश्वास नाही पण बायकोच्या पायगुणांवर आहे).
तेंव्हा तूच माझी 'गृहलक्ष्मी' म्हणून मी तुझे 'औक्षण' करत आहे
👆🏻हा विचार म्हणून चांगला आहे यात शंका नाही. पण म्हणून लक्ष्मी पूजनाला बायकोला लक्ष्मी समजून ओवाळणे हा अंमळ परंपरेचा विपर्यास वाटतो / विडंबन वाटते.
आम्ही कसे आधुनिक, जुन्या परंपरा कशा बुरसटलेल्या आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.
एखादी गोष्ट आवडली नाही पटली नाही, पर्यावरण पुरक नसेल, नासाडी होत असेल तर करु नका. उदा. सत्यनारायण करणे, दहीहंडीचे मनोरे लावणे , फटाके फोडणेे, रंगपंचमी पाणी वाया घालवणे, डाॅल्बी वाजवणे, आपट्याची पाने देणे, आणि हो देवाला लाडू चढवणे इ.इ
पण निदान ज्या चालीरीती, परंपरा म्हणून आहेत त्याचा विपर्यास तरी नको जो इथे या फोटोत दिसतो.
गृहलक्ष्मीला ( बायकोला) घरातील निर्णय घेताना मानाचे स्थान द्या, तिचे मत जाणून घ्या, तिला घरकामात मदत करा , स्वातंत्र्य द्या पण ही कसली लक्ष्मी पूजनाचा दिवशी तिलाच ओवाळायची वैचारिक घालमेल
( इथे मुद्दाम दिवाळखोरी हा शब्द वापरलेला नाही)
आता समजा एखाद्याच्या दुर्दैवाने एखाद्याची परिस्थिती नाजूक झाली असेल, आर्थिक विवंचना असेल, कर्जे झाली असतील, नुकसान झाले असेल. अशावेळी तो बायकोला ओवाळेल का?
तर अशा परिस्थितीत दोघांनी मिळून 'लक्ष्मी पूजन' करुन, देवतेला स्मरून पुढील वाटचाल अधिक जोमाने करणे योग्य ठरणार नाही का?
आपल्या धर्मात ज्या काही रीतीरिवाज , परंपरा आहेत ना त्यात नवी नवरी घरी आली की
" लक्ष्मी पूजन" ( दिवाळीतले नव्हे) करतातच.
त्यानंतर दोघांनी मिळून संसार करता करता अनेक चालीरीती , रितीरिवाज( जसे पाडवा, हरतालिका, वटपोर्णीमा, मंगळागौर इ इ) सांभाळत पुढे जायचे असते.
हे आमच्या आधुनिक नारायणरावांना कळणार आहे का?
नारायणी नमोस्तुSते 🙏🏻🌺
९/११/१८
१३ सप्टेंबर, २०१८
संग्रहित जोतिष १
श्री गणेशाय नम:
रविशशिकुजबुधगुरुसितरविजगणेशान्प्रणम्य भक्त्त्यादौ!
वक्ष्येSहं स्पष्टतरं प्रश्णज्ञानं हिताय दैवविदाम् !१!
रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र शनि व श्रीगणेशाला नमस्कार करून जोतिष्यांच्या हितासाठी मी हे प्रश्णज्ञान स्पष्ट करीत आहे
गणेशचतुर्थी
१३/९/१८
रविशशिकुजबुधगुरुसितरविजगणेशान्प्रणम्य भक्त्त्यादौ!
वक्ष्येSहं स्पष्टतरं प्रश्णज्ञानं हिताय दैवविदाम् !१!
रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र शनि व श्रीगणेशाला नमस्कार करून जोतिष्यांच्या हितासाठी मी हे प्रश्णज्ञान स्पष्ट करीत आहे
गणेशचतुर्थी
१३/९/१८
१२ ऑगस्ट, २०१८
आश्लेषा नक्षत्र आणि Parker Solar Probe
जोतिष शास्त्रात प्रत्येक नक्षत्रावर काय करावे हे फार पूर्वी सांगितले आहे. उदा. विहीर खणणे , खोदकाम इ खालच्या दिशेने करावयाची कामे अधोगामी नक्षत्रावर करावीत असे म्हणले आहे. आता असं असताना म्हणजे अधोगामी नक्षत्र असताना बरोबर उलटी गोष्ट ' उपग्रह / यान याचे उड्डाण ( जे अर्ध्वगामी आहे ) कारावे का ?
काल आश्लेषा नक्षत्र होते जे अधोगामी आहे . तसेच बुधाचे नक्षत्र आहे. बुध ग्रह एक गोष्ट परत परत घडवून आणतो . आणि ज्याची भीती होती तेच झाले
नासा ही संस्था काल सूर्य ग्रहाच्या अभ्यासातही एक यान अवकाशात पाठवणार होती. यापूर्वी ही नासाने अनेक क्षेपणास्त्रे / उपग्रह याचे यशस्वी उड्डाण केले आहे यात शंका नाही . त्यामुळे खरं तर यात काहीच वावगं नव्हतं पण काल काही तांत्रिक गोष्टीमुळे उड्डाण लांबले
Liftoff of NASA's Parker Solar Probe, now is scheduled for 3:31 a.m. EDT, Aug. 12. The launch attempt planned for Aug. 11 was postponed due to a violation of a launch limit, resulting in a hold. Liftoff atop a United Launch Alliance Delta IV Heavy rocket will take place from Space Launch Complex 37 at Cape Canaveral Air Force Station. The mission will perform the closest-ever observations of a star when it travels through the Sun's atmosphere, called the corona. The probe will rely on measurements and imaging to revolutionize our understanding of the corona and the Sun-Earth connection.
https://www.nasa.gov/image-feature/new-launch-date-for-parker-solar-probe
थोडक्यात काय
काही जणांना आपण किती मागासलेले आहोत ग्रहण , अमावस्यां यात गुरफटलेले आहोत आणि अमेरिका वाले किती पुढारलेले आहे वगैरे वगैरे यावर अती विश्वास असतो मात्र ग्रह तारे आपले काम व्यवस्थित करता असतात
काल आश्लेषा नक्षत्र होते जे अधोगामी आहे . तसेच बुधाचे नक्षत्र आहे. बुध ग्रह एक गोष्ट परत परत घडवून आणतो . आणि ज्याची भीती होती तेच झाले
नासा ही संस्था काल सूर्य ग्रहाच्या अभ्यासातही एक यान अवकाशात पाठवणार होती. यापूर्वी ही नासाने अनेक क्षेपणास्त्रे / उपग्रह याचे यशस्वी उड्डाण केले आहे यात शंका नाही . त्यामुळे खरं तर यात काहीच वावगं नव्हतं पण काल काही तांत्रिक गोष्टीमुळे उड्डाण लांबले
Liftoff of NASA's Parker Solar Probe, now is scheduled for 3:31 a.m. EDT, Aug. 12. The launch attempt planned for Aug. 11 was postponed due to a violation of a launch limit, resulting in a hold. Liftoff atop a United Launch Alliance Delta IV Heavy rocket will take place from Space Launch Complex 37 at Cape Canaveral Air Force Station. The mission will perform the closest-ever observations of a star when it travels through the Sun's atmosphere, called the corona. The probe will rely on measurements and imaging to revolutionize our understanding of the corona and the Sun-Earth connection.
https://www.nasa.gov/image-feature/new-launch-date-for-parker-solar-probe
थोडक्यात काय
काही जणांना आपण किती मागासलेले आहोत ग्रहण , अमावस्यां यात गुरफटलेले आहोत आणि अमेरिका वाले किती पुढारलेले आहे वगैरे वगैरे यावर अती विश्वास असतो मात्र ग्रह तारे आपले काम व्यवस्थित करता असतात
१६ जुलै, २०१८
१६ जून, २०१८
११ मे, २०१८
कर्नाटक निवडणूक अंदाज
एक अभ्यास म्हणून प्रश्ण सोडवतोय
भाजपला कर्नाटकात किती जागा मिळतील
पर्याय
१) ५० पेक्षा कमी
२) ५० ते ८०
३) ८० ते ११०
४) ११० पेक्षा जास्त
प्रश्ण मनात धरला ती तारिख, वेळ:- ११ मे २०१८, १५:३७
रुलिंग प्लॅनेट
लग्न - कन्या - बुध
नक्षत्र - उ.भा - शनि ( वक्री)
रास - मिन - गुरु ( वक्री)
दिवस - शुक्रवार - शुक्र
निकाल लागे पर्यत शनी, गुरु वक्रीच असणार आहेत त्यामुळे ते रुलिंग मधे पकडायला हरकत नाहीत.
बुध = ९
शनी = ३
गुरु = ३
शुक्र = ९
बेरीज = २४
एकंदर पर्याय ४
२४/४ = ६ बाकी शून्य
म्हणजे शेवटचा पर्याय ४) हे उत्तर
🌷
टिप: बुध रुलिंग मधे आल्याने उत्तर चुकण्याची शक्यता 😁
वक्री ग्रह वगळून विचार केला तर पर्याय २)
Expert comment please 😊
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







