ह.अ भावे यांच्या व्यक्तिमत्त्व आणि विकास या लेखमालेतून साभार-
संयमाची जोपासना -
काळ जरी कठीण असला तरी ईश्वरनिर्मीत या जगात प्रतीक प्रश्नाला उत्तर असतेच.
या कठिण काळावरही इलाज आहे. आणि तो इलाज खात्रीचा आहे. मानवाच्या इतिहासात असे कठीण काळ अनेक वेळा आले.
यावर उपाययोयना फार पुर्वीच सुचवली गेली आहे.ही उपाययोयना अनेक पुस्तकांत सापशेल. ती उपाययोजना बायबल मधे आहे,
ग्रंथसाहेबात आहे, वेद -उपनिषदात आहे, भगवद्दगितेत आहे. हे उपाय कालातीत व सार्वत्रिक आहेत. हे उपाय शेकडो वर्षे साठवले गेलेल्या
शहाणपणातून लिहिले गेले आहेत. परिस्थिती प्रत्तेक काळात वेगवेगळी असली तरीही हे उपाय चिरस्थायी आहेत.श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म्योगाचा
उपदेश केला, त्या उपदेशाचा उपयोग अर्जुनाला झाला, त्याप्रमाणे आजपर्यंतच्या पिढीलाही झाला. लोकमान्य टिळकांना गीतेत कर्मयोग सापडला.
शेकडो पिढ्या बदलल्या तरीही भगवदगीतेचे दीपगृह लोकांना प्रकाश दाखवतच आहे.
अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता त्या वेळी अर्जुनाने श्रीकृष्णाला दुस-य़ा अध्यायात विचारले,’बुध्दी स्थिर झालेला स्थितप्रण्य कसा असतो? कसा राहतो?
कसा बोलतो? यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला दुस-या अध्यायात पंचान्नव्या श्लोकापासून बहात्तराव्या श्लोकापर्यंत उत्तर दिले आहे.
या सर्व उत्तरात संयम कसा पाळावा, आपल्या आत्म्यावर विजय कसा मिळवावा, हेच सांगितले आहे. माणसामध्ये जो आत्मा असतो, ते परमात्म्याचेच प्रतिबिंब असते
माणसाचे शरीर नष्ट पावते पण कपडे बदलावे त्याप्रमाणे आत्मा दुसरे शरीर धारण करतो.
स्थितप्रद्न्य आणि संयमी माणूसच आत्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य प्रस्थापित करु शकतो. म्हंणूनच मानवी जीवनामध्ये स्थितप्रद्न्येला आणि संयमाला फार महत्व आहे.
संयम धोरण म्हणून स्विकारा
संयम या एका शब्दात शांतता, सहनशीलता, आध्यात्मिकता , श्रध्दा इत्यादी अनेक शब्द भरलेले आहेत. संयम हा शब्द रत्नासारखा आहे. संयम पाळल्याने तुम्हाला
अनेक गुण बाळगता येतील. तुमचं स्वत:चं जगण्याचं तत्वद्न्यान त्यातून तयार होईल. सध्याचा काळ गोंगाटाचा व गोंधळाचा आहे. त्यातून ज्याला प्रगती करुन घ्यायची
आहे त्याला संयमाशिवाय तरणोपाय नाही.
संयम हा शब्द तुमच्या जीवनात मुरला पाहिजे, संयम हे तुम्ही धोरण म्हणून स्वीकारले पाहिजे. तरच सध्याच्या कठीण काळात तुम्हाला सुखाने जगता येईल.
तुम्ही आजचा दिवस उत्तम घालवा म्हणजे तुमचे आयुष्य सुखात जाईल. ’आजचा दिवस चांगल्या प्रकारे घालवा’ हा संदेश गौतम बुध्दाने दिला होता
बुध्दाने सांगितले होते, की ’या जगात आज दिसणारे निसर्गसौंदर्य, मैत्री भावन्न, उदात्त विचार, स्फूर्ती या जीवनातील अमोल गोष्टी आहेत.’उद्याची काळजी न करता
आजचा दिवस सुंदर जगा हीच शिकवण सर्व धर्मांनी दिली आहे. उद्याची चिंता परमेश्वरावर सोडा.
No comments:
Post a Comment