August 1, 2012

' सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल '

  ' सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल '

 परदेशी लेखक स्टीफन कावे  यांनी लिहीलेले  हे पुस्तक  अनेकांच्या अयुष्याला कलाटणी देणारं ठरलं असे म्हणतात.  ' बेस्ट सेलर '  बुक असा लौकीक या पुस्तकाने  मिळवला होता.   या स्टीफन कावे  यांचे १८ जुलै ला  निधन झाले.  सकाळ वृत्तपत्रातील ' सप्तरंग' पुरवणीत २८ जुलैला श्री  शंकर बागडे यांनी एक  छान लेख यावर लिहिला होता .  त्यानी या सात सवयींबद्दल लिहिले आहे



१)  पुढाकार घ्या , कृतीशीलतेचे महत्व मोठे आहे

२)  कोणतही कार्य हाती घेण्यापुर्वी  अंतीम साध्या काय हवं , याचा पुर्ण व सखोल अभ्यास करुन तशी खूणगाठ
      मनाशी बांधा

३)  कामांचा अग्रक्रम ठरवा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा

४)  आपला विजय होणारच  असा सकारात्मक विचार मनावर वारंवार बिंबवत रहा

५) आपले विचार, संकल्पना , कल्पनाविष्कार, यांचा तुमच्या ध्यानी - मनी असलेला भाव, त्यांचा अर्थ
इतर लोकांना  त्याच स्वरुपात  आकलन झाला आहे ना  याची खात्री करुन घ्या.

६)  परस्परांमधे योग्य ताळमेळ ठेवा. दुस-याच्या बलस्थानाच उपयोग करा

७) शारीरिक, भावनिक, मानसिक , अध्यात्मिक  पातळीवर तावून - सुलाखून योग्य मार्गाचा अवलंब करा.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या