!! ॐ नमो भगवते स्वामी स्वरुपानंदाय !!
एकदा तरी पावसग्रामी जाउनिया यावे
दर्शन कळसाचे घ्यावे !! धृ !!
समाधिमंदिर स्वरुपसुंदर
शांतिरसाचे रुप मनोहर
सो S हं भजनी तल्लिन परिसर
आळंदीचे भाग्य जणू हे प्रतिबिंबित व्हावे !! १ !!
प्रवेशद्वारी पाय ठेविता
क्षणात जाई विरुनी चिंता
समाधान ते होई चित्ता
सर्व उपाधी गळून पडती स्थान असे बरवे !! २ !!
एक पायरी वरती चढता
स्वाभिमान गळतो न कळता
दिव्यरूप ते प्रतीत होता
सभामंडपी उभे राहता भानचि हरपावे !! ३ !!
परमहंस श्रीसद्गगुरु मूर्ति
काय वर्णू मी त्यांची महती
आकांक्षांची जेथे पूर्ती
एकदा तरी आनंदाच्या सागरात न्हावे !! ४ !!
चिरंजीव होऊनि या इथे
समाधी घेऊन स्वरुपनाथे
उध्दाराया जडजीवाते
'रामकृष्ण हरि' नाम मुखाने गातचि परतावे !! ५ !!
- सौ पार्वती गं आपटे
सांगली
दर्शन कळसाचे घ्यावे !! धृ !!
समाधिमंदिर स्वरुपसुंदर
शांतिरसाचे रुप मनोहर
सो S हं भजनी तल्लिन परिसर
आळंदीचे भाग्य जणू हे प्रतिबिंबित व्हावे !! १ !!
प्रवेशद्वारी पाय ठेविता
क्षणात जाई विरुनी चिंता
समाधान ते होई चित्ता
सर्व उपाधी गळून पडती स्थान असे बरवे !! २ !!
एक पायरी वरती चढता
स्वाभिमान गळतो न कळता
दिव्यरूप ते प्रतीत होता
सभामंडपी उभे राहता भानचि हरपावे !! ३ !!
परमहंस श्रीसद्गगुरु मूर्ति
काय वर्णू मी त्यांची महती
आकांक्षांची जेथे पूर्ती
एकदा तरी आनंदाच्या सागरात न्हावे !! ४ !!
चिरंजीव होऊनि या इथे
समाधी घेऊन स्वरुपनाथे
उध्दाराया जडजीवाते
'रामकृष्ण हरि' नाम मुखाने गातचि परतावे !! ५ !!
- सौ पार्वती गं आपटे
सांगली
No comments:
Post a Comment