" चला राम घडवूया " 🚩🚩
मंडळी एक वेगळा विषय मांडतोय. उद्या रामनवमी आहे. यानिमित्यानेच मध्यंतरी एका संस्थेने निबंध स्पर्धेच आयोजन केले होते, त्यात खुल्या गटातील अनेक विषयांपैकी हा एक विषय होता. यानिमित्याने माझे काही विचार इथे मांडतोय.
//
निबंध स्पर्धेसाठी त्यातही खुल्या गटा साठी हा एक विषय . सहज इतर गटांसाठीचे ही विषय बघितले त्यात लहानगटा साठी विषय होता
" चला राम बनूया "
संकेत स्पष्ट आहेत , काय करायचे आहे दिशा स्पष्ट आहे . त्यांना ' राम बनण्यासाठी' आपणास सक्रिय सहभाग घ्यायचा आहे , त्यांना सहकार्य , मार्गदर्शन करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतः ला आधी राम तर बनायचे आहेच पण परिस्थतीनुसार / भूमिकेनुसार कधी राजा दशरथ ( वडील ) , कौसल्या ( आई ) , विश्वामित्र ( गुरु ) , प्रेमळ बंधू ( लक्ष्मण ) , निष्ठावान पत्नी ( सीता माई ) , अन्याया विरुध्द्व साथ देणारा सहकारी ( हनुमान ) तर वेळ प्रसंगी नितीमत्ता जागृत असणारा शत्रू ( बिबिषण ) या वेगवेगळ्या भूमिका समोरच्या व्यक्तीशी आपल्या नात्यानुसार निभावायच्या आहेतच.
प्रभू श्री रामचंद्राचे विशेष गुण , त्यांचे चरित्र याची जाण ठेऊन सध्याच्या जीवन पध्द्तीत ते कशा प्रकारे आचरणात आणता येतील / इतरानाही प्रवृत्त करता येईल हे पहाणे महत्वाचे.
एकनिष्ठ राम, एकबाणी राम, एकवचनी राम होणे म्हणजेच आजच्या काळातले शब्द जसे कमिटमेंट, इन्व्हॉलमेंट , फोकस होणे आहे . माझे आयुष्याचे ध्येय काय आहे ? त्यादृष्टीने माझी वाटचाल आहे का ? मी कुठे विचलीत तर होत नाही आहे ना ? माझे जे ध्येय आहे त्याचा मला फायदा होईलच पण त्याचा समाजाला पण फायदा आहे का ? माझे लक्ष मूळ ध्येयापासून विचलीत होत आहे का ? असे लक्षात आल्यास योग्य उपाययोजना काय करायची हे मी समजून घेऊन तसे मी माझ्या सानिध्यात येणा-यांसाठी ही अमलात आणीन आणि ' राम घडवण्याचा ; मनापासून प्रयत्न करेन
राष्ट्रकार्याच्या यज्ञात जर कुणी असुरी शक्ती विघ्न आणत असतील तर त्याला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य माझ्या रामात यावे, तशी त्याला बुध्दीयावी यासाठी चे बाळकडू मला त्याला द्यावे लागेल.
पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला स्वत: ला जे अपेक्षित राम राज्य आहे त्यातील एक नागरिक म्हणून आपण कुठे कमी पडतोय हे बघायचं आहे . स्वतःत सुधारणा घडवून आणायची आहे आणि दुस-याला ही त्या साठी मदत करायची आहे . व्यवस्थेने घालून दिलेले नियम , सद्विवेकबुधदी चा वापर मला करायचा आहे
रामराज्य येणे म्हणजे काय ?
जिथे सर्व प्रजानन सुखी समाधींनी आहेत, एकोप्याने रहात आहेत. कुणी कुणावर जबरदस्ती करत नाही आहे . तशी जबरदस्ती झाली गुन्हा झाला तर लवकरात लवकर न्याय मिळत आहे , गुन्हेगाराला शासन होत आहे . प्रजाजन आणि राज्यकर्ते यांच्यात सुसंवाद होत आहे
वरील जर चित्र रेखाटले तर मी स्वतः यासाठी काय करतोय ? मी स्वतः जे कायदे आहेत , नियम आहेत ते काटेकोर पणे बजावतो का ? का पळवाट काढतोय ? माझी कर्तव्य करतोय का ? का फक्त हक्क सांगतोय?
हा सगळा विचार करुन आपण चांगला नागरिक बनू या आणि इतरांनाही चांगला नागरिक बनण्यास सहकार्य करु या . घरोघरी असे प्रजानन म्हणजेच राम आणि त्यांना तयार करणारे पालक, गुरु, सहकारी , बंधू निर्माण झाले तर रामराज्य ख-या अर्थाने निर्माण होणार नाही का ?????
तेंव्हा चला
एकबाणी होऊ या , एक वचनी होऊ या 🚩
राष्ट्रप्रेम जागवू या , बंधुभाव वाढवू या 🚩
आधी राम होऊ या, असंख्य राम घडवूया 🚩
अंती राम राज्य आणू या 🚩🚩
जय श्रीराम 🙏
अमोल केळकर

1 टिप्पणी:
You need to be a part of a contest for one of the most useful websites on the internet.
I most certainly will recommend this web site!
टिप्पणी पोस्ट करा