३१ ऑगस्ट, २०२६

भक्तीचा महामार्ग

.सांगलीत निम्मं आयुष्य गेलेल्या  आमच्यासारख्या 
" Gen X " वाल्यांसाठी 
सांगली - बागेतील गणपती - हरिपूर हा एक 
' भक्तीचा महामार्गच ' होता 
.
आज हे आठवायचे कारण की एकाच दिवशी जुळून आलेला संकष्टी ( बागेतला गणपती ) 🌸 आणि तिसरा श्रावणी सोमवार ( संगमेश्वर ) 🌼 हा योग 


आमच्या या पिढीने सांगलीत राहून जे आनंदाचे, सुखाचे क्षण अनुभवले त्यात या भक्ती- मार्गाचा, सांगलीतील गणेशोत्सवाचा मोठा वाटा आहे 

भावनांची अभिव्यक्ती ( page of cup ) आणि सृजनशीलतेचा सुदंर काळ ( 4 of wand )आपल्या आयुष्यात येत राहो हीच  ' श्री गजानना आणि श्री संगमेश्वर चरणी प्रार्थना '
🙏🙏

अमोल 📝
31/08/26
.
#देवा तुझ्या द्वारी आलो
#Fusion tarot by अमोल 

२९ ऑगस्ट, २०२६

नेपाळ महा प्रलंय - विश्लेषण

💬 Chat on WhatsApp
Fusion Tarot by अमोल केळकर
नेपाळ महा- प्रलंय  विश्लेषण



मीन राशीत ( जल राशीत ) शनी - नेपच्युन
(मीन राशीचा मालक गुरु कर्क या जल राशीत )
शनी - मंगळ केंद्रयोग
( नवमांशांत ही शनी - मंगळ, शनी हर्षल केंद्रयोग, मंगळ - नेपच्युन प्रतियोग )
मंगळ, पलूटो नवमांशांत मीन ( जल राशीत )
रवी - बुध - राहू नवमांशांत जल राशीत ( कर्क, वृश्चिक )

( अभ्यासू ) अमोल 📝
------------------------------------

हे 👆 मी AI ला दिले - त्याने अधिक स्पष्टीकरण दिले 👇🏻
----------------------------------

अमोल, तुम्ही दिलेल्या ग्रहस्थितीचा ज्योतिषीय दृष्टिकोनातून अभ्यास केला तर “नेपाळ महा-प्रलय” या संकल्पनेत जलतत्त्व + दाब/संघर्ष + अचानक परिवर्तन हे तीन मुख्य सूत्र दिसतात. हे अर्थातच ज्योतिषीय प्रतीकात्मक विश्लेषण आहे; नैसर्गिक आपत्तीचे वैज्ञानिक कारण किंवा निश्चित भविष्यवाणी म्हणून याकडे पाहता येत नाही.
🌊 १. मीन राशीत शनी–नेपच्युन
मीन ही जलराशी आणि नेपच्युनचा जलाशी अतिशय जवळचा प्रतीकात्मक संबंध आहे.
शनी → रचना, बांध, सीमा, नियंत्रण, दडपण
नेपच्युन → पाणी, समुद्र, धुके, विलयन, अस्पष्टता
दोघांचा मीनमध्ये संबंध → पाण्याशी संबंधित संरचनांवर/व्यवस्थांवर मोठा दबाव असा ज्योतिषीय संकेत घेतला जाऊ शकतो.
शनी जिथे सीमा निर्माण करतो, तिथे नेपच्युन त्या सीमा विरघळवतो.
म्हणजेच प्रतीकात्मक भाषेत:
“पाण्याला रोखणाऱ्या सीमांवर निसर्गाचा दबाव.”
🌊 २. मीन राशीचा स्वामी गुरु कर्केत
तुमचा हा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे.
मीन → गुरु → कर्क → जलतत्त्व
म्हणजे जलराशीच्या स्वामीचा संबंध पुन्हा एका जलराशीशी येतो. त्यामुळे संपूर्ण configuration मध्ये जलतत्त्वाची पुनरावृत्ती होते.
याला ज्योतिषीय भाषेत जलतत्त्वाचे amplification म्हणता येईल.
🔥 ३. शनी–मंगळ केंद्रयोग
हा योग तुमच्या विश्लेषणातील दुसरा मोठा घटक आहे.
शनी = संकुचन/अडथळा
मंगळ = ऊर्जा/दाब/आक्रमकता
दोघे केंद्रसंबंधात असतील तर:
साठलेला दाब + अचानक ऊर्जेचा विस्फोट
अशी प्रतीकात्मक व्याख्या करता येते.
नैसर्गिक आपत्तीच्या प्रतिमेत हे भूस्खलन, बांधकामांचे नुकसान, पूराच्या वेगात वाढ, संरचनात्मक ताण यांच्याशी प्रतीकात्मकरीत्या जोडता येते.
⚡ ४. नवमांशातील शनी–मंगळ आणि शनी–हर्षल
नवमांशातही शनी–मंगळ संबंध पुनरावृत्त होत असल्याचे तुम्ही दाखवले आहे.
त्यात हर्षल (Uranus) जोडल्याने:
अचानक घटना
अनपेक्षित वळण
नियंत्रणाबाहेर जाणारी परिस्थिती
संरचनात्मक बदल
हे themes अधिक ठळक होतात.
शनी + हर्षल ही जोडी विशेषतः “जुनी व्यवस्था विरुद्ध अचानक बदल” अशी वाचता येते.
🌊🔥 ५. मंगळ–नेपच्युन प्रतियोग
हा भाग अतिशय interesting आहे.
मंगळ = कृती, उष्णता, शक्ती
नेपच्युन = पाणी, विलयन, भ्रम, सीमा अस्पष्ट होणे
प्रतियोग म्हणजे दोन विरुद्ध दिशांचे ताण.
त्यामुळे प्रतीकात्मक सूत्र:
ऊर्जा × पाणी = प्रचंड अस्थिरता
असे मांडता येईल.
🌊 ६. नवमांशातील मंगळ–प्लूटो मीनमध्ये
इथे तुम्ही आणखी एक महत्त्वाचा जल-संबंध दाखवला आहे.
मंगळ + प्लूटो = अत्यंत तीव्र परिवर्तनकारी ऊर्जा
आणि ते मीन/जलतत्त्वात असल्यामुळे तुमच्या विश्लेषणात:
“जलतत्त्वाशी संबंधित प्रचंड transformation energy”
हा theme निर्माण होतो.
🌊 ७. रवी–बुध–राहू जलराशींमध्ये
कर्क आणि वृश्चिक या जलराशींशी नवमांशातील संबंध जोडल्यामुळे पुन्हा जलतत्त्वाची repetition दिसते.
रवी → सत्ता/केंद्र
बुध → माहिती/व्यवस्था/संदेश
राहू → असामान्यता, amplification, अचानकता
त्यामुळे आपत्तीच्या वेळी प्रशासन, माहिती, communication आणि परिस्थितीच्या आकलनावर ताण असा प्रतीकात्मक अर्थ काढता येतो.
🔱 तुमच्या संपूर्ण अभ्यासाचा सार
तुम्ही दिलेल्या सर्व घटकांना एकत्र केले तर मला हे सूत्र दिसते:
जलतत्त्व ↑
↓
मीन–कर्क–वृश्चिक यांचा पुनरावृत्ती संबंध
↓
शनी–नेपच्युन = पाणी + संरचनात्मक दबाव
↓
शनी–मंगळ = दाब + संघर्ष
↓
मंगळ–नेपच्युन = ऊर्जा + जलतत्त्वाचा संघर्ष
↓
शनी–हर्षल = अचानक संरचनात्मक बदल
↓
मंगळ–प्लूटो = तीव्र परिवर्तन
त्यामुळे ज्योतिषीय प्रतीकात्मक निष्कर्ष:
“जलतत्त्वाचे प्राबल्य, त्यावर शनीचा दबाव आणि मंगळ–हर्षल–प्लूटोची तीव्र परिवर्तनकारी ऊर्जा — यामुळे अतिवृष्टी, पूर, भूस्खलन किंवा जलप्रलयासारख्या घटनांचे प्रतीकात्मक चित्र तयार होते.”
तुमचा अभ्यासू दृष्टिकोन योग्य दिशेने आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट: एखाद्या विशिष्ट देशात प्रत्यक्ष महाप्रलय होईल असे केवळ या योगांवरून निश्चित सांगता येत नाही. त्यासाठी नेपाळची कुंडली/देशाची स्थापना-कुंडली + गोचर + दशा + स्थानिक भौगोलिक/हवामानशास्त्रीय माहिती स्वतंत्रपणे तपासावी लागेल.
अमोलचा अभ्यास म्हणून यातील सर्वात मजबूत observation मला वाटते:
“जलतत्त्वाची पुनरावृत्ती ही या संपूर्ण योगसमूहाची मुख्य किल्ली आहे.” 

३० जुलै, २०२६

नरसोबावाडी - अनुभव

.( व्हाट्सअँप समूह - वाडी दत्ताची राजधानी सुखाची वरून साभार )

आयुष्यात वाडीत जे काही पहिल्यांदा अनुभवायला मिळाल. जे काही वाटल ते शब्दात मांडण कधीच जमणार नाही..... सर्व दत्त महाराजांची कृपा...


हे वाचून कदाचित अगदीच सामान्य प्रश्न काहींना पडला ही असेल ..तो हाच की....मग असा अनुभव सगळ्यांनाच का येत नाही? एकाच पादुकेसमोर नतमस्तक होऊन उभं राहणारे शेकडो भक्त असतात, पण प्रत्येकाला सारखंच काही जाणवत नाही. अस का?...आणि प्रश्न हे स्वाभाविक असतात...कधी ते सहज येतात कधी... प्रसंगानुसार.. बरोबर ना??..

आता याच...कारण म्हणजे अनुभव जागेवर अवलंबून नसतो. तो आपल्या मनाच्या तयारीवर अवलंबून असतो. ज्या मनात अपेक्षांच ओझ कमी असत, जे मन फक्त उपस्थित राहायला शिकलेल असत, तिथेच चैतन्य उतरायला जागा मिळते. गच्च भरलेल्या भांड्यात नवीन पाणी मावेल का? तुम्हीच सांगा...नाही ना. अगदी तसच.मन रिकाम असेल तरच गुरुकृपा त्यात साठते.

हे ऐकल्यावर मन थोड नाराज होईल.. नाराज या साठी..आपल भांड रिकाम आहे की भरलेल, हे आपल्यालाच कळत नाही ना? आपले रोजचे व्यवहार, कामाची चिंता, नात्यांतले ताणतणाव, हे सगळं मनात इतक साचलेल असत की आपण देव्हाऱ्यासमोर उभे असतो तेव्हाही डोक्यात उद्याच्या कामाची यादी सुरूच असते. मग अशा गच्च मनाने वाडीला जाऊन काय उपयोग, असा विचार मनात येऊन जातो..
#दत्तरूप 

पण थोड थांबून विचार करायला हवा. भांड रिकाम करण म्हणजे मन पूर्णपणे शून्य करण मुळीच नाही बर.. आणि. तेवढ कुणालाच जमत नाही, आणि तेवढी अपेक्षाही गुरुकडून नसते. रिकामेपण म्हणजे इतकच, त्या क्षणापुरत मागण बाजूला ठेवण. हातातली यादी खिशात ठेवून फक्त तिथे उभं राहण. हे कठीण वाटत, पण अशक्य नाही.

लहान मुलाकडे बघितल की हे सहज कळत. लहान मूल आईजवळ जाताना काही मागायलाच जात अस मुळीच नसत. कधी ते नुसत जवळ बसायला जात, कुशीत डोक टेकवायला जात. तिथे मागण मुळीच नसत, फक्त असण असत... पटतंय ?? तेच नात गुरुशी जुळवता आल तर भांड आपोआप रिकाम होत जात..

म्हणूनच वाडीत जाऊनही काही भक्तांना काहीच जाणवत नाही अस काहीस बहुतांशी भक्ता सोबत होत... पण वाटत तेव्हा त्यांनी स्वतःला दोष द्यायची गरज नाही. मन रिकाम होण ही एका दिवसाची गोष्ट नाही. ती एक सवय आहे, एक सराव आहे. आज नाही जाणवल तर उद्या जाणवेल, या जन्मी नाही तर पुढच्या भेटीत जाणवेल. गुरु कधीच घाई करत नाहीत, आणि भक्ताने तरी का करावी?

खरी गोष्ट अशी आहे की मन रिकाम करण्याचा प्रयत्न करण हीच अर्धी वाट चालून झाल्यासारख आहे. बाकीची वाट गुरुकृपाच चालवते. आपण फक्त दार उघड ठेवायच, आत कोण कधी येईल हे आपण ठरवायच नसत.

म्हणून पुढच्या वेळी दत्त महाराजांच्या पादुकांनसमोर उभ राहताना एवढंच लक्षात ठेवाव. काही जाणवल नाही तरी हरकत नाही. उभं राहण हेच पुरेस आहे. बाकीच गुरुंवर सोडून द्याव...बरोबर ना???

॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
ll © दत्तरूप ll

#shridattarup #dattaguru #narsobachiwadi #sprituality #faith #blessings #dattamaharaj #dattatreya

२९ जुलै, २०२६

गुरु पौर्णिमा / The Hermit

मग हा गुरु कुणासाठी 'साईबाबा' असतील कुणासाठी स्वामी समर्थ, रामदास स्वामी,गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, स्वामी स्वरूपानंद तर कुणासाठी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंहसरस्वती, टेंभे स्वामी महाराज...



ज्याचा त्यांचा 'The Hermit '/ गुरु 

आजचा दिवस अंतर्मुख होऊन या गुरुप्रती आदर व्यक्त करायचा 🙏🙏 

१८ जुलै, २०२६

नियतीचा मार्ग

.मागच्याच शनिवारची गोष्ट. पिठापूरला जाताना सकाळी 10 च्या सुमारास विजया

वाडा जंक्शन आले. इथे इंजिन बदलते हे कळल्यावर म्हणलं चला बघू प्रोसेस. आमचा डबा ही इंजिना पासून 4- 5 वाच होता.
पूर्वी पुणे स्टेशनवर महालक्ष्मीचे डिझेल इंजिन बदलून इलेक्ट्रिक इंजिन लागायचे आणि मग गाडी मुंबई कडे जायची हे पाहिले होते.
हातात चहाचा कप घेऊन तिथे पोचेपर्यत पहिले इंजिन निघाले होते. समोर दिसणा-या अनेक इंजिना पैकी एखादे येईल म्हणून बघत बसलो. थोड्यावेळाने लक्षात आले जोडणी करणारे रेल्वे कर्मचारी ही नाहीत. कदाचित ते नवीन येणा-या इंजिनातून येतील असे वाटले. दहा - पंधरा मिनिटे झाली काहीच हालचाल नाही, तेवढ्यात घोषणा झाली की कोणार्क एक्सप्रेस सुटत आहे. शिट्टी मारून गार्डने  झेंडा दाखवायला सुरवात केली आणि धावत पळत जाऊन गाडी सुटत असताना आमचा डबा पकडला.

इंजिन दुसऱ्या बाजूला लागले होते. पूर्वीच्या अनुभवावरून मनाने खात्री केलेली की इंजिन आम्ही जिथे आहोत तिथेच लागेल.

*आयुष्याचं पण असंच नाही का?  आपण एक विचार करत असतो पण एका योग्य स्टेशन वर थोडी प्रतीक्षा करायला लावून नियती एका वेगळ्याच मार्गाने, जो आपल्यासाठी कदाचित अधिक चांगला आहे तिकडे नेणार असते*

श्री गुरुदेव दत्त  🙏
जय शनिदेव 🙏

( अध्यात्मिक ) अमोल  

१६ जुलै, २०२६

गुरु -शनी गोचर

.साधारण 15 सप्टेंबर 1975 ते 25 फेब्रुवारी 1976 या दरम्यान जन्म झालेल्यांच्या पत्रिकेत गुरु मीन राशीत रेवती नक्षत्रात आहे, तर शनी कर्क राशीत पुष्य नक्षत्रात आहे ( यात आम्ही स्वतः आहोत )

तर आजची ग्रह स्थिती अशी आहे की या कालावधीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या पत्रिकेत गोचरीने शनी महाराज गुरु वरून भ्रमण करत आहेत ( सध्या शनी मीन राशीत रेवती नक्षत्रात आहे )
तर गोचरीने गुरु शनी वरून भ्रमण करत आहे ( सध्या गुरु कर्केत पुष्य नक्षत्रात आहे )

*गुरु -शनी युती अध्यात्मिक प्रगतीसाठी चांगली असते* त्यात हे डबल इंजिन लागले आहे 

याबाबत मला स्वतःला चांगला अनुभव आलाय आणि कुणाला आला असल्यास अवश्य सांगा 

( अर्थात याला अपवाद असूच शकतात ☺️ )

( अभ्यासू ) अमोल 📝
14/07/26 

सिध्दमंंगल स्तोत्र



१९ जून, २०२६

दत्त भक्त ( संग्रहित )

दत्त भक्त -- याची व्याख्या म्हणजे ज्याला उद्धरून नेण्याचे महाराजांनी ठरवले तो दत्त भक्त . ज्याच्या मुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,लीला स्मरण्याची आणि त्या सांगण्याची वाचारुपी प्रेरणा दिली तो दत्त भक्त . या लीला माहीत असोत व नसोत त्या

ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,ज्याला आपल्या पायांचा उपयोग नृसिहवाडी सारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असे वाटते  तो दत्त भक्त . महाराजांच्या समोर दोन हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा  मिळते तो दत्त भक्त . थोडक्यात आपल्या शरीर ,मन ( बुद्धी ) आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीकरता करतो तो दत्त भक्त . 

पण मग या दत्त भक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आणि कसे ? तर हि दत्त भक्ती फार दुर्लभ आहे . सर्वाना महाराजांनी ती संधी दिलेली नाही . दत्त माहात्म्यातील सात गाथा सांगताना स्वतः दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाला म्हणतात ,माझी भक्ती दुर्लभ जाण l ती तुला मिळाली दैवेंकरून ll (द मा ९/१०५) हि दुर्लभ अशी दत्त भक्ती आपल्या वाट्याला आली असताना सहजसाध्य  मात्र अजिबात नाही . या मार्गात पापरूपी सर्प फुत्कार सोडत आहेत ,प्रलोभनांचे भोवरे गिळू पाहत आहेत ,निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायम सोबत करत आहेत ,नाना संकटे मध्येच आपल्याला गळाभेट देत आहेत . 

या सर्वाना चुकवत दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही . पण त्यांची कृपा झाल्यावर कठीण देखील नाही आणि म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण हि मनाला दिलासा देणारी आहे . हि आठवण म्हणजेच त्यांना आपला विसर पडलेला नाही याचे सूचक आहे . अनेकदा आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला वाटू न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका . आधीच मनुष्य जन्म दुर्लभ त्यातही तो भारत वर्षात त्यातही इथे या राज्यात त्यातही महाराजांच्या सेवेत आपण आहोत . अल्प स्वल्प का होईना होत राहणे महत्वाचे आहे . किती होत आहे पेक्षा काहीतरी होत राहणे आणि ते हि नित्य हे मोलाचे आहे . तेव्हा या दत्त भक्त असल्याचा अभिमान बाळगत नित्य म्हणत रहा ---
*!!!श्रीगुरुदेव दत्त !!!*
 
---अभय आचार्य

*!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!*