गुरु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुरु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१९ जून, २०१४

गुरु

कृष्णमूर्ती पध्दतीत रुलींग प्लॅनेट  म्हणून एक संकल्पना आहे. त्यानुसार कुठल्याही एका विशिष्ठ वेळेला  काही ठराविक ग्रहांचाच अंमल असतो.  ते ग्रह म्हणजे
त्यावेळच्या उदीत लग्नाचा स्वामी , त्यावेळचा नक्षत्र स्वामी , त्यावेळी असलेल्या राशीचा स्वामी आणि त्या दिवसाचा स्वामी

यालाच   LSRD  असे म्हणतात

दिनांक १९ ' ०६/२०१४ ला  संध्याकाळी ७ ते ९ या कालावधीतील रुलिंग प्लॅनेट मधे फक्त ' गुरु ' ग्रह आला आहे

लग्न - धनू - स्वामी - गुरु ( L)
नक्षत्र  - पुर्वा भाद्रपदा - स्वामी - गुरु (S)
रास - मीन - स्वामी - गुरु ( R)
दिवस गुरुवार - स्वामी - गुरु ( D)

विशेष म्हणजे गुरु , पुनर्वसू या आपल्याच नक्षत्रात  आहे.

देवानांच ऋषीणांच गुरु कांचनसन्निभम् !
बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् !!



(अर्थात एकच ग्रह जेंव्हा रुलिंग मधे येतो तेंव्हा इतर आणखी  कुठले ग्रह रुलिंग मधे घ्यावेत हे गुरुवर्य कृष्णमुर्ती यांनी काही नियम दिले आहेत , ते परत कधी तरी )

( अभ्यासक ) अमोल 


१९ मे, २०११

गुरु स्थान - फळाचा परिणाम

जन्मे लग्ने गुरुश्चैव रामचंद्रो वनागतः !
तृतीये बळी पाताळे चतुर्थे हरिश्चन्द्रयो: !
षष्ठे द्रौपदी हरणंच हन्ति रावणमष्टमे !
दशमे दुर्योधनं हन्ति द्वादशे पांडु वनागतम् !

'गुरु' पत्रिकेत ज्या स्थानात असतो ते स्थान ज्या गोष्टींचे कारक आहे त्यासंबंधी वाईट फळ मिळते. मात्र गुरुची दृष्टी ( ५,७,९ ) ही चांगली असते. वरील श्लोक हेच स्पष्ट करतो.
जन्म लग्नी कर्कॅचा गुरु होता म्हणून रामाला वनवासात जावे लागले. तृतीयातील गुरुने बळीला पाताळात दडपले, हरिश्चंद्राला ४ थ्या स्थानातील गुरुने वनवास घडला, ६ व्या स्थानातील गुरुने द्रौपदीचे वस्त्रहरण घडले. अष्टमातील गुरुने बलाढ्य रावणाचा नाश झाला. दुर्योधनाच्या दशमातील गुरु- माता पित्यांसमोर मृत्यू. भिष्माचार्यांच्या १२ व्या स्थनी गुरु( मकरेचा ) होता. राज्याभिषेक झाला नाही. दशरथाला ५ व्या स्थानी गुरु म्हणून पुत्र् -पुत्र म्हणून मरावे लागले. विश्वामित्राच्या ९ व्या स्थानात कर्केचा गुरु - कुत्रा व्हावे लागले.

१० जानेवारी, २०११

नवग्रह स्तोत्र


जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् !
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम् !!

----------------
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव-संभवम् !
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम् !!
--------------------
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् !
कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् !!
-------------------------
प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम् !
सौम्यं सौम्य्गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् !!
----------------------

देवानांच ऋषीणांच गुरु कांचनसन्निभम् !
बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् !!
---------------------
हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परम्म गुरुम् !
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् !!
---------------
निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् !
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् !!
--------------------------------

अर्धकायं महाविर्यं चंद्रादित्य विमर्दनम् !
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् !!
----------------------

पलाशपुष्पसंकाशं तार्काग्रह मस्तकम् !
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् !!


इतिव्यासमुखोद्गितं यः पठेत सुसमाहितः !
दिवा वा यति वा रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यते !!

नरनारी नृपाणांच भवेत् दु:स्वप्ननाशनम् !
ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् !!
ग्रहनक्षत्रजा: पीडास्तस्कराग्निसमुद्भवा: !
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासोब्रूते न संशयः !!
इति श्री व्यासविरचितम् !
आदित्यादि नवग्रहस्तोत्रं संपूर्णम् !!

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या