१८ जानेवारी, २०२३

शनी- विचार

शनी - विचार 📝

शनी धक्का-  मिथुन, कर्क,मकर,कुंभ या राशी लग्नी असून शनी हा ग्रह मिथुन, कर्क,तुला, वृश्चिक , मकर,कुंभ या पैकी कुठल्याही राशीत जातकाचा असता त्याला शनी धक्का पोचतो

( संदर्भ - पद्माकर जोशी यांच्या ग्रहांचे धक्के या पुस्तकातून साभार

९ जानेवारी, २०२३

बिग बाँस कोण जिंकेल

.मराठी बिग बाँस चा अंतीम भाग काल होता. याबाबतची बातमी जेंव्हा पाहिली तेंव्हा रुलिंग प्लॅनेट वरुन प्रश्ण सोडवण्याचा विचार मनात आला. या मालिकेचा एक ही भाग न पाहिल्याने अंतीम स्पर्धक कोण आहेत ते ही नाहीत नव्हते

त्यांची नावे एका संकेतस्थळावरुन त्यांनी दिलेल्या क्रमाने घेतली आणि
८/१/२३ ला सकाळी १० .५६ वाजता असणाऱ्या रुलिंग प्लँनेटवरुन प्रश्ण सोडवला. जो बरोबर ठरला



खरे #बिग_बाँस रुलिंग प्लँनेटच

जे. कृष्णमूर्तींना 🙏🙏

अक्षय केळकरांचे अभिनंदन 💐💐 

८ जानेवारी, २०२३

पंचपक्षी ज्योतिष पध्दत

.माझा आजचा दिवस कसा जाईल? किंवा एखादे महत्वाचे कार्य आज मी कोणत्या वेळेला करु? ( मुहूर्त) 

सामान्य माणसांना हा पडणारा रोजचा प्रश्ण. या प्रश्णाचे उत्तर घेण्याचा जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. पंचांग, पेपरातले एका वाक्यातील राशी भविष्य, पत्रिकेनुसार आजचे ताराबळ,चंद्रबळ, राहू काळ,अमृत काळ,टॅरो कार्ड इ इ .
( एका दिवसासाठीच्या प्रश्णासाठी मला स्वतःला टॅरो कार्डचा अनुभव खूप चांगला आला आहे).

आज तुम्हाला मी या लेखाद्वारे दक्षिण भारतात प्रसिद्ध असणाऱ्या एका पध्दतीची माहिती सांगणार आहे जी मलाही नुकतीच समजली.
यात तुम्हाला तुमचे जन्म नक्षत्र आणि तुमचा जन्म शुक्ल पक्षात झालाय की कृष्ण पक्षात एवढीच माहिती पुरेशी आहे. 
पुढंच सगळं काम अँप वर सोपवायचं, रोजच्या दिवसातील कुठली वेळ सर्वोत्तम ,कुठली बरी, कुठली वाईट हे सगळं अँप वर बघायला मिळेल.

या पद्धतीचे नाव आहे 'पंचपक्षी' पध्दत. या पद्धतीचा थोडक्यात परिचय करुन देतो

 प्रत्येक व्यक्तीला जन्म नक्षत्र, पक्ष ( राजकीय नव्हे) नुसार गिधाड,घुबड,कावळा,कोंबडा,मोर यातील एक पक्षी मिळतो
या पक्षांची कामे ५
शासन
जेवण
फिरणे
झोप
मृत्यू

या पध्दतीत प्रत्येक दिवसाचा - रवि ते शनिवार, दिवसाचे १२ तास आणि रात्रीचे १२ तास, शुक्ल/ कृष्ण पपक्षानुसार ( पोर्णीमेचा दिवस शुक्ल, अमावस्येचा दिवस कृष्ण पक्ष)  
कोणता पक्षी कोणत्या वेळेला वरील पैकी कोणती क्रिया करणार हे ठरलेले असते. एका ठराविक वेळी वरील पाच पक्षी पाच क्रिया वाटून घेतात.
प्रतेक क्रिया २ तास २४ मिनीटाची. नंतर हे कोष्टक बदलते. असे दिवसाचे ५ टप्पे, रात्रीचे ५ टप्पे 

जेंव्हा तुमचा पक्षी ' शासन' करत असेल ती वेळ सर्वोकृष्ट
त्याखालोखाल जेवण,नंतर फिरणे,
झोपणे - ही क्रिया असणारी वेळ वाईट ,मृत्यू  - सगळ्यात वाईट



'panchpakshi' असं नाव लिहून  प्ले स्टोअर वरुन तुम्ही अँप घेऊ शकता आणि रोजच्या दिवसातील चांगल्या/ वाईट वेळेचा अंदाज बांधू शकता. 
मी वापरत असलेल्या अँप्लीक लिंक


https://play.google.com/store/apps/details?id=com.ssprabhu.panchapakshi


( अभ्यासू) अमोल 📝
#पंचपक्षी 

१८ डिसेंबर, २०२२

ब्रह्मचैतन्य_गोंदवलेकर_महाराज_पुण्यतिथी

जिथे एकच 'रंग'
नामाचा... 🌺
जिथे एकच ध्यास
'रामाचा'....🌹

तिथे आशिर्वाद 
"ब्रह्मचैतन्याचा"..।🌸

#ब्रह्मचैतन्य_गोंदवलेकर_महाराज_पुण्यतिथी
#मार्गशीर्ष_कृ_दशमी
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो 
१८/१२/२२ 📝 

९ डिसेंबर, २०२२

एकच ग्रह, एकच स्थान वेगळ्या राशी

.काल एकाने विचारलं, एकच ग्रह पत्रिकेत एकाच स्थानात पण वेगळ्या राशीत असेल तर वेगळी फळं का देतो?
म्हणलं अहो, तो ज्या राशीत आहे त्याचं कारकत्व, राशी स्वामीचे कारकत्व, त्याची पत्रिकेतील जागा, त्या ग्रहाचे राशी स्वामीशी नाते ( मित्र/ शत्रू )तो कुठल्या नक्षत्रात आहे, तत्व, ग्रहांची अवस्था वगैरे अनेक गोष्टी असतात. कळलं?
म्हणावा तसा प्रतिसाद समोरून न आल्याने त्यांना म्हणले,एक उदाहरण सांगतो.
तुम्ही लेखन करता, सोशल मिडीयावर पोस्ट करता
लेख एकच
पण 'अनुदिनीत / ब्लाॅगवर'  वाचले जाईल याची तुम्हालाही शाश्वती नाही
'व्हाटसप' वर सगळे वाचतील पण एकही लाईक मिळणार नाही

पण हेच ब्लाॅगवाले/ व्हाटसपवाले, 
' फेसबुकवर' मात्र तुम्हाला लाईक आणि प्रतिक्रिया भरभरुन देतील 

हे मात्र त्याला पटलं 😁

( प्रॅक्टिकल)  अमोल
०९/१२/२२ 📝 

२७ नोव्हेंबर, २०२२

दृष्यम की अदृष्यम

दृष्यम ( की अदृष्यम) 

एखादा सिनेमा, त्यातील एखादी पंच लाईन डोक्यात अशी फिट्ट बसते की बस रे बस! 
 नुकत्याच आलेल्या सिनेमातील  एक वाक्य जाम फिट बसलय. 👇🏻

"सवाल ये नही की, आपकी आँखो के सामने क्या है, सवाल ये है की
आप देख क्या रहो हो" 🧐

सिनेमाची सुरवात एका स्वगताने  होते त्यातील मला भावलेल्या या दोन ओळी.

अनेक मोटिव्हेशनल सेमिनार, व्यक्तीमत्व विकास शिबीरं, OBT टेक्नॉलॉजी वगैरे शिकताना अगदी कुठेही हे लागू पडेल. 

ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर हे वाक्य म्हणजे
 'ज्योतिष शास्त्राची गुरूकिल्ली ' असं म्हणले तर चुकीचे ठरू नये.

गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून ज्योतिषाचा अभ्यास करत असताना, वेगवेगळ्या पुस्तकात दिलेली माहिती वाचताना, यू-ट्यूबवरचे विविध विषयांवरचे व्हिडिओ पाहताना अनेक मान्यवर अभ्यासक, शिक्षक, लेखकांनी हे ब-याचदा या आधीच सांगितले आहे. ज्योतिषाला पत्रिका पाहताना एक खास दृष्टी पाहिजे. नामवंत ज्योतिषी व.दा भट यांनी तर त्यांच्या अनेक पुस्तकात वेळोवेळी एक उल्लेख केलाय तो म्हणजे ज्योतिषांना 'पत्रिकेतील निर्णायक घटक' ओळखता आला पाहिजे. 

समोर असणाऱ्या चौकोनाच्या १२ भागात, १२ राशी आणि त्यात वेगवेळ्या ठिकाणी किंवा काही वेळा काहीजण मिळून एकत्रीत येणारे असे एकंदर १२ ग्रह हे पत्रिकेचे दिसणारे "दृष्यम " स्वरूप.

हे सगळं तुमच्या समोर आहे पण इथे अनेक 'अदृष्यम गोष्टी ' ज्या पत्रिकेचा निर्णायक घटक ठरू शकतात त्या शोधण्यासाठी योग्य दृष्टी आणि तेवढा अभ्यास असणे आवश्यक.

 समुद्रातल्या लाटांशी आपला संबंध आपण जेवढा वेळ समुद्रात असतो तेवढाच असतो. एकदा तेथून बाहेर आलो की आपला लाटांशी संबंध संपला. पण म्हणून लाटा थांबत नाहीत. तसंच प्रत्येक क्षणी नवीन पत्रिका तयार होत असते त्या प्रत्येक क्षणाच्या पत्रिकेचा अभ्यास करणे निव्वळ अशक्य. समुद्रांच्या लाटांप्रमाणे निर्माण झालेल्या पत्रिकेतून आपल्या कडे मार्गदर्शनासाठी  पत्रिका येणे यामागे  अर्थातच नियतीचीच योजना असणार
अशा आलेल्या जातकांना मात्र योग्य न्याय देणे हे जमलं पाहिजे
यासाठी परत परत आपली तयारी वाढवायची आणि पत्रिकेच्या अदृष्यम गोष्टी, निर्णायक घटक शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी वरची पंच लाईन कायम लक्षात ठेवायची 

( अभ्यासू) अमोल केळकर
विनायक चतुर्थी ( मार्गशीर्ष)
२७/११/२२ 📝 

१२ नोव्हेंबर, २०२२

टी २० चषक इंग्लंड जिंकेल का पाकिस्तान

.रुलिंग प्लॅनेटचा अभ्यास म्हणून परत एकदा

टी २० चषक इंग्लंड जिंकेल का पाकिस्तान ? 🏏
प्रश्ण दिनांक १२/११/२२
वेळ : ११ वा २० मिनिटे
मी ठेवलेला क्रम
१) पाकिस्तान २) इंग्लंड

यावेळचे रुलिंग प्लॅनेट
L - धनू - गुरु - ३
S - आद्रा - राहू  मेष राशीत ( मंगळ) -९
R - मिथुन - बुध - ९
D - शनिवार - शनी - ३

बेरीज = ३+९+९+३= २४
बुध एकदा रुलिंग मधे ३ वजा करू
२४-३ = २१
आलेल्या संख्येस असलेल्या ( २) पर्यायाने भागू
२१/२ = बाकी १

पर्याय १ वरचा संघ विजयी ठरेल

( अभ्यासू)  अमोल 🏏
१२/११/२२ 

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या